मुंबई : आज रविवार, 13 नोव्हेंबर 2022. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाला असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुटकेनंतर आव्हाड यांनी विरोधकांवर टीका करतानाच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. शिंदे गटाचे नेते आमदार सुहास कांदे यांची नाराजी. पदाधिकारी नियुक्त्यावंर व्यक्त केली नाराजी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोलीत पोहोचली आहे. या सर्व महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या जाणून घेण्यार आहोत.
Marathi News LIVE Update
तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट
या बॉम्बस्फोटात 4 लोकांचा मृत्यू
तर अनेक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त
वर्दळीच्या ठिकाणी हल्लेखोरांनी केला बॉम्बस्फोट
Marathi News LIVE Update
मुकेश अंबानींची इंग्लंडमध्ये नवी इनिंग
प्रसिद्ध फुटबाल क्लब Liverpool ताब्यात घेण्यासाठी तयारी
लिव्हरपूलच्या मालकीसाठी अंबानींनी कंबर कसली
हा क्लब 381 अरब रुपये किंमतीला विक्रीचा प्रस्ताव
अनेक जण क्लब खरेदी करण्यासाठी इच्छूक
Marathi News LIVE Update
खाद्यतेलाची लवकरच स्वस्ताई, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
गेल्या आठवड्याच्या शेवटी बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण
आयात पाम, पामतेलाच्या किंमतीत झाली घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचा परिणाम
सूर्यफूल, सोयाबीन, तीळ तेलबियांचा बाजारात तुटवडा
Marathi News LIVE Update
वाय जंक्शन पुलावरुन शिंदे-आव्हांडामध्ये श्रेयवाद
श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हांडामध्ये वाकयुद्ध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच दोघांमध्ये वाकयुद्ध
पुलावरुन श्रेयवादाची लढाई
Marathi News LIVE Update
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा पुलांचं लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर
या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी सूटण्याचा दावा
ठाणेकरांना मिळणार दिलासा -शिंदे
उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर स्फोट
13 दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन
स्फोटामुळे ट्रॅकच झाला उद्धवस्त
मार्गावरील अनेक रेल्वे रुळांना तडे
Marathi News LIVE Update
कळवा पूलाचा खर्च आव्हाडांनी वैयक्तिक केला नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आव्हाडांच्या टिकेला उत्तर
पुलाचा खर्च महानगरपालिकेने केल्याचे केले स्पष्ट
कळवा पूलाचा श्रेयवाद रंगला
बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंबरनाथमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय
पनवेलमधील पंढरीशेठ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यात वाद
फडके गटाने पाटील गटावर केला अंदाधुंद गोळीबार
15 ते 20 गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती
अंबरनाथ MIDC तील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना
शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल
राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी दाखल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची रंगत वाढणार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयाचा उद्या उद्घाटन समारंभ
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवेंच्या हस्ते होणार उद्घाटन
भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसस ,शिवसेना असा होणार थेट सामना
सावित्रीबाई फुले प्रगती पँनल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं पँनल
भाजपाच्या विद्यापीठ विकास मंच भाजपाचं पँनल
विद्यापीठ निवडणूकीही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी , शिवसेना सामना
शहाजीबापू पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंनी आखली नवी रणनिती
लक्ष्मण हाकेंकडे दिली शिवसेना उद्ध् बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी
जबाबदारी मिळताचं हाकेंनी शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात थोपटले दंड
शहाजीबापू पाटील यांना पुढच्या विधानसभेला पराभूत करणार
तानाजी सावंत , अनिल बाबर यांना पराभूत करणार
शिंदे गटातील गद्दार आमदारांना बाळासाहेब ठाकरेंच नाव घेतल्याशिवाय चालत नाही
भाजपही राज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या करिष्म्यावर उभा राहिला
गद्दारी कोणी केली हे महाराष्ट्राला माहिती आहे
ऊसतोड कामगाराच्या मुलाला ठाकरेंनी प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली ती मी पार पाडणार
लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया
Marathi News LIVE Update
ब्लू टिकची सेवा पुन्हा सुरु होणार
पुढील आठवड्याच्या शेवटी ही सेवा सुरु होण्याची शक्यता
एलॉन मस्कने केले सेवा सुरु करण्यासंबंधीचे ट्विट
बनावट खाते उघडल्याने ब्लू टिकची सशुल्क सेवा केली होती खंडीत
भाजप युवा मोर्चा नेते प्रवीण नेत्तरू हत्या प्रकरण
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एनआयएने राबवली शोधमोहीम
हत्या प्रकरणातील 15 व्या आरोपीला अटक
National Investigation Agency (NIA) has conducted search operation in Dakshina Kannada district of Karnataka and arrested 15th accused in BJP Yuva Morcha leader Praveen Nettaru murder case.
— ANI (@ANI) November 13, 2022
संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भांडुप आणि कांजूर गावात उत्साहाचं वातावरण
राज्यातील अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते आणि नेते संजय राऊत यांची भेट घेणार
पहाटे 6 वाजल्यापासून संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी पक्षातील सर्व नेते आणि पदाधिकारी घेणार संजय राऊत यांची भेट…
त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून सरकार आणि योद्धा नावाचे दोन स्पेशल केक तयार
63 किलोचा केक तयार केला जाणार असल्याची माहीती
वाढदिवसाच्या दिवशी संजय राऊत हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची घेणार भेट
सामना ऑफिसमध्येही होणार ग्रॅंड सेलिब्रेशन
Marathi News LIVE Update
विम्यांचा दाव्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक नाही
कोणतीही विमा कंपनी केवळ पीयूसी प्रमाणपत्राअभावी विम्याचा दावा नाकारु शकत नाही
मात्र नवीन विमा खरेदी करताना पीयूषी प्रमाणपत्र आवश्यक आहे
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याविषयीचे निर्देश दिलेले आहेत
MCD निवडणूक: तिकीट न मिळालेल्या AAP नेत्याचा हायव्होल्टेज ड्रामा
पूर्व दिल्लीतील गांधीनगर मतदारसंघाचे ‘आप’चे माजी नगरसेवक हसीब-उल-हसन चढले टॉवरवर
“पक्षाने तिकिटही दिलं नाही, कागदपत्रंही ठेवली”, हसीब-उल-हसन यांचा आरोप
Former AAP councillor climbs tower after party denied him MCD polls ticket
Read @ANI Story | https://t.co/yS9DIJjmPo#DelhiMCD #HaseebUlHasan #AAP #Delhi #MCDElection #ArvindKejriwal pic.twitter.com/14QzM7mm8l
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2022
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा महाराष्ट्रातही प्रचार
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आवाजातील संदेशाच्या ध्वनिफितीचा मोबाईल फोनवर प्रसार
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत आहेत व्यस्त
मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांची अनुपस्थित जाणवू नये यासाठी काँग्रेस धुरिणींनी लढवली शक्कल
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पाच तालुकाअध्यक्ष गेले होते शिंदे गटात
आज पुन्हा त्यातील दोन तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीत आले आहेत
त्यामुळे राष्ट्रवादीचे ताकद वाढली आहे
काही शिंदे गटाचे कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहे ते देखील लवकरच येतील असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी व्यक्त केलंय
नियाज शेख व अरुण कांबळे यांची परत घरवापसी
मुंबई- धोबीघाट परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण
मारहाणीप्रकरणी एका व्यक्तीला अटक
झोपी गेलेल्या वृद्ध महिलेची बॅग चोरण्याचा आरोपीकडून प्रयत्न
महिलेला जाग येताच केली बेदम मारहाण
मुंबई पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल
A man arrested for beating a 65-yr-old woman beggar to death in Dhobi Ghat area. She was sleeping when he attempted to steal her bag & beat her to death when she woke up. Case registered u/s sec 302 (murder) IPC. Several cases are already registered against him: Mumbai Police
— ANI (@ANI) November 13, 2022
पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आज वर्ल्ड कपची फायनल रंगणार आहे. ऐतिहासिक मेलबर्नच्या स्टेडियममध्ये हा फायनल सामना खेळला जाणार आहे. वाचा सविस्तर…
डिव्हाईन कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट
स्फोटामध्ये पाच कामगार भाजल्याची माहिती
कामगारांना चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं
चेन्नई, तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू
शहरात आजही वादळी वाऱ्यासह पाऊस
भारतीय हवामान खात्याने वर्तवला अंदाज
Heavy rains continue across Chennai, Tamil Nadu
City to experience thunderstorm with rain today, as per India Meteorological Department. pic.twitter.com/8kkVWhMsng
— ANI (@ANI) November 13, 2022
आज T20 वर्ल्ड कपचा फायनल सामना रंगणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन टीम्स फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. फायनल का होणार नाही, वाचा सविस्तर….
कोल्हापूरची अभिनेत्री कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू
मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा इथं डंपरने दिली होती धडक
तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणी जाधवनं केलं होतं काम
कल्याणीने अलिकडेच हालोंडी फाटा इथं नव्याने सुरू केलं होतं हॉटेल
मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने दिली धडक
राहुल गांधी यात्रेत स्वतः असताना कार्यकर्ते पक्ष कां सोडत आहे हा चिंतनाचा विषय आहे.
काँगेस नेत्यांनीच यात्रा हायजॅक केलीय, यात्रेत सर्वसामान्य कार्यकर्ते फार कमी दिसत आहेत
यात्रेची फलश्रुती काही दिसत नाही
काँगेस-राष्ट्रवादीत मोठी निराशा आहे, ते सत्तेशीवाय राहू शकत नाहीत
2024मध्ये राष्ट्रवादीमधील असंतोषाची मोठी यादी समोर येईल
काँगेस-राष्ट्रवादी साठी आगामी काळात लोकसभा, विधानसभासाठी उमेदवार भेटणार नाहीत
गजानन कीर्तिकर सारखे निष्ठावंत सोडून जात असतील तर यावर उद्धव ठाकरे यांनी विचार करायला हवा
हर हर महादेव चित्रपटाच्या लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकाला वकिलांमार्फत नोटीस
संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी दिलेली नोटीस निर्माता दिग्दर्शकांना मिळाली
वकिल विकास शिंदे यांच्या मार्फत देण्यात आली नोटीस
नोटीसीद्वारे घेण्यात आलेल्या आक्षेपांवर उत्तर देण्याची मागणी
उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली,
7 दिवसांत उत्तर दिलं नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल करणार
पुण्यातील कॅम्प परिसरातील घटना
पुण्यातील कॅम्प परिसरातून एका भुरट्याच चोराने सायबेरियन हस्की प्रजातीच्या कुत्र्याला पळवून नेलं
याप्रकरणी आता पोलिसात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे
28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोराने मेसी नावाच्या श्वानाची केली चोरी
ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे
उद्वव ठाकरे यांनी केली प्रा. लक्ष्मण हाके यांची नियुक्ती
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात हाके यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी
प्रवक्तेपदी नियुक्ती केल्याने प्रा. लक्ष्मण हाके यांना मिळालं बळ
राज्यात गाजलेल्या अनेक प्रकरणाचा घोटाळा बाहेर काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली
पुणे पोलीस दलातील अधिकारी भाग्यश्री नवटके यांची अखेर बदली
आरोग्य भरती घोटाळा म्हाडा भरती पेपर फुटी आणि टीईटी घोटाळा बाहेर काढणाऱ्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूरला बदली
निरोप देताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी झाले भावूक
फुलांचा वर्षाव करत महिला पोलीस अधिकाऱ्याला निरोप
खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला
राजन पाटील आणि धनंजय महाडिक गटात लढत
निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास- महाडिक
कळवा खाडीवरच्या पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात दोघांनाही निमंत्रण
अटक नाट्यानंतर दोघे एकत्र येणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा आदेश
शहरातील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी सुरु
आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख तपास अधिकारी
वजीर शेख यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घ्यावा
प्रकरणाची चौकशी प्रामाणिक अधिकाऱ्याकडून करण्यात यावी
कालपासून बँकॉक विमानसेवेला झाली सुरुवात
दर मंगळवार, शनिवारी आणि रविवारी असणारी सेवा उपलब्ध
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं उद्घाटन
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं काम लवकरच पूर्ण करणार सिंधिया यांची माहिती
कार्गो एअरपोर्ट डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार
महाविकास आघाडीच्या सरकारमुळे हे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले
गेलेल्या प्रकल्पापेक्षा जास्त रोजगार महाराष्ट्राला मिळेल
काळा तलावाचे सुशोभीकरण महिन्याभरात पूर्ण होणार
अद्ययावत काळा तलाव नववर्ष भेट ठरणार
कुलगुरू निवड शोध समितीनं जाहिरात केली प्रसिद्ध
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विद्यापीठ कायद्यातील बदल राज्यपालांनी न स्विकारल्यानं कुलगुरू निवड प्रक्रीया लांबणीवर पडली होती
आता कुलगुरू निवड शोध समिती स्थापन केल्यानंतर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांचा या समितीत समावेश आहे
ज्या गावात काम तिथंच मिळणार महिन्याचं रेशन
कार्ड पोर्टेबिलीटीची सुविधा केली जाणार उपलब्ध
राज्यात 10 लाख ऊसतोड कामगार आहेत
गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांनाच मिळणार सुविधा
समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांची माहिती …
नवी मुंबईतील घणसोली सेक्टर 4 मध्ये नशा करणाऱ्या तीन जणांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला
अन्य दोघे कोमात गेले.
पोलीस घटनास्थळी पोहोचले दाखल
पुढील तपास तपास चालू आहे