मुंबई : आज बुधवार, 16 नोव्हेंबर, 2022. 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलाय. आधी विवियाना मारहाण प्रकरणी आणि त्यानंतर विनयभंगाचा गुन्हा आव्हाडांवर दाखल करण्यात आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आजही महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यताय. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींसोबत राज्यासह देशात श्रद्धा हत्याकांड (Shraddha Aftab News) प्रकरण गाजतंय. या हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज काय खुलासे होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या महत्त्वपूर्ण घडामोडींसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह महत्वाच्या शहरांमधील ताज्या घडामोडी आणि ब्रेकिंग न्यूजचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबरला पुण्याचा दौरा करण्याची शक्यता
एन डी एच्या पासिंग परेडला उपस्थित राहण्याची शक्यता आहे
मात्र 23 तारखेला पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत दौरा कन्फर्म होणार
30 नोव्हेंबरला पंतप्रधान पुण्यात येण्याची शक्यता आहे
सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
Marathi News LIVE Update
कापसाचे उत्पादन वाढले, पण तरीही कापसावर येणार संक्रात
निर्यातीवर परिणाम, कापसाचे भाव कोसळण्याची भीती
बांगलादेशासह इतर खरेदीदारांनी फिरवली पाठ
इतर देशांच्या कापसाचे दर भारतीय कापसापेक्षा कमी
भारतीय कापसाचे भाव 10 टक्क्यांनी जास्त
Marathi News LIVE Update
संजय राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी राऊतांवर आरोप
राऊत सध्या जामीनावर बाहेर
ईडीने घेतली आहे हायकोर्टात धाव
राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने दाखल केली याचिका
Marathi News LIVE Update
राहुल गांधींना सावरकरांविषयी काहीच माहिती नाही
गांधींना सावरकरांविरोधात लिहून दिल्या जाते
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
काँग्रेस सावरकरांबाबत रोज खोटं बोलते
हिंदुत्व ही एक व्यापक संकल्पना आहे
सावरकर ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत हा हिंदुत्वाचा धागा आहे
Hardik Pandya: हार्दिक पंड्याने प्रश्न विचारणाऱ्यांची बोलती बंद करणारं उत्तर दिलं. वाचा सविस्तर….
Marathi News LIVE Update
आता या बँकांमधून तुम्हाला आयकर भरता येणार नाही
आयकर विभागाने या बँकांची यादीच केली जाहीर
सरकारी आणि खासगी 11 बँकांचा यादीत समावेश
करदात्यांना कर भरण्यासाठी इतर पेमेंट पर्याय
Marathi News LIVE Update
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवली पाहिजे
राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राहुल गांधींची एक क्लिपही शेवाळे यांनी दाखविली
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्यावं
शेवाळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ‘मातानी पचेडी’ भेट
‘मातानी पचेडी’ म्हणजे हाताने बनवलेले कापड अशी ओळख
मंदिरात देवीला हे अर्पण केलं जातं
गुजरातमध्ये पचेडीला मोठं महत्व
अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी वेगवेगळे गिफ्ट दिलेत
Shoaib Akhtar: चित्रपटाच शूटिंग कुठे होणार? आणि कधी रिलीज होणार चित्रपट? वाचा सविस्तर…..
Marathi News LIVE Update
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात मास्क सक्ती नाही
केंद्र सरकारने हटवली विमानातील मास्कसक्ती
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने घेतला निर्णय
बुधवारी केंद्र सरकारने याविषयीची नियमावली केली जाहीर
Mask no more compulsory during air travel but passengers should preferably use them: Govt
— Press Trust of India (@PTI_News) November 16, 2022
योग्य संधी आणि तयार केल्यास लवकरच टीम इंडियामध्येही दिसू शकतो. वाचा सविस्तर….
Marathi News LIVE Update
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून आनंद वार्ता
एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मंजूर
एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
सरकारने या संदर्भातील पत्र एसटी महामंडळाला पाठवलं
एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
स्मारकाचं 50 टक्के काम पूर्ण झालं
बाबासाहेबांचा 450 फुटांचा पुतळा उभारण्यात येणार
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/Yuex7Guhbm
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 16, 2022
Marathi News LIVE Update
Blue Tick साठी पुन्हा मोजा पैसे
29 नोव्हेंबरपासून ब्लू टिक सेवा सशुल्क
गडबडींमुळे सेवा झाली होती खंडीत
आता महिन्यांच्या अखेरीस ब्लू टिक साठी मोजावी लागेल रक्कम
एलॉन मस्क यांनी ट्विट करत दिली माहिती
Marathi News LIVE Update
संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी पुन्हा हायकोर्टात
ईडीच्या वतीने सुधारीत याचिका दाखल
राऊतांचा जामीन रद्द करण्याची केली मागणी
सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात ईडीची पुन्हा धाव
IPL 2023: टीम इंडियाला त्रास देणाऱ्या ऑलराऊंडरला विकत घेण्यासाठी पैशांचा पाऊस पडणार एवढ निश्चित. वाचा सविस्तर…
Marathi News LIVE Update
भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदूच
प्रत्येकाचा डीएनए एकच आहे
मोहन भागवत यांचे वक्तव्य
हजारो वर्षांपासून आपले पूर्वज एकच असल्याचा केला दावा
Marathi News LIVE Update
लग्न सराईच्या हंगामात सोन्याचे दर वाढले
सोन्याने भाव पुन्हा वधरले, चांदी फिक्की
सोन्याची वाटचाल 55 हजारांकडे, आज सोन्याचे भाव 52 हजारांच्या पुढे
चांदीचे भाव किलोमागे 486 रुपयांनी घसरले
19 नोव्हेंबर रोजी नितीन गडकरी आणि शरद पवार यांना डी लिट पदवीने केलं जाणार सन्मानित
19 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होणार
1 लाख 2 हजार 809 विद्यार्थ्यांना दिली जाणार पदवी
IND vs NZ T20 Series: न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजमध्ये टीम इंडियाला या प्रश्नाच उत्तर मिळू शकतं. वाचा सविस्तर….
राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर पक्ष सोडण्याच्या तयारीत
आज दुपारी 4 वाजता पक्ष सोडण्याबाबत जाहीर करणार भूमिका
वैजापूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते भाऊसाहेब चिकटगावकर
2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून पक्ष सोडणार असल्याच्या होत्या चर्चा
भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील शेवटचे आमदार
भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतेने निर्माण झाली खळबळ
Hardik pandya कॅप्टन बनताच बोलून गेला एक मोठी गोष्ट, वाचा सविस्तर….
औरंगाबादमध्ये रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना, राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल, पोलिसांना अहवाल सादर करण्याचे निर्देश, वाचा सविस्तर
उस्मानाबाद येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले
एक घटक, एक अर्ज ही अट रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक
विद्यार्थीनींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून सरकारचा निषेध
ज्या प्रमाणे आमदार अनेक मतदारसंघात निवडणुका लढवू शकतात, एकच मंत्री अनेक जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकतो त्याप्रमाणे पोलीस भरतीला अनेक जिल्ह्यात अर्ज भरण्यास परवानगी द्यावी
दिल्ली पोलिसांचा साकेत कोर्टात अर्ज
आफताबची नार्को टेस्ट करण्यासाठी दिल्ली पोलिसांचा साकेत कोर्टात अर्ज
कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी अफताबची नार्को टेस्ट केली जाणार
तंबाखू खाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना, 23 वर्षीय आरोपी अमोल बारकु खिल्लारी याला हत्येच्या आरोपाखाली अटक, अधिक तपास सुरु
रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पोलंडमधील दोन नागरिक ठार
क्षेपणास्त्र पोलंडच्या हद्दीत डागल्याचा पोलंडचा दावा
नाटोन बोलावली आपत्कालीन महत्त्वपूर्ण बैठक
आज दुपारी 3 वाजता बैठक होण्याची शक्यता
रशिया दूतावासातील अधिकाऱ्यांनाही बैठकीला बोलावलं
नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडच्या तक्रारीवरून ही महत्वपूर्ण बैठक बोलावली
मुंबईकडून येणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या लोकल ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवाशांचा झाला उद्रेक
संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे पटरीवर उतरून सकाळी 8.19 ची लोकल थांबवली
रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहचून प्रवाशांना हटवले
पुण्यात सीएनजी दरात वाढ, आजपासून एक रुपयांनी वाढला सीएनजी, आता सीएनजी मिळणार ९२ रुपये किलोने, दीड महिन्यानंतर सीएनजीच्या दरात वाढ
शिंदे गटाकडून केंद्रात 2 मंत्रिपद, 2 राज्यपालपदाची मागणी, विश्वसनीय सूत्रांची tv9 मराठीला माहिती
अमित शाहांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी- सूत्र
शिंदे गटाच्या मागणीवर अमित शाहा आज निर्णय घेण्याची शक्यता
गजानन कीर्तिकरांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता
ठाण्यानंतर आता औरंगबाद जिल्ह्यातही रिक्षा चालकानं संतापजनक कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, घाबरलेल्या मुलीची धावत्या रिक्षातून उडी, घटनेत अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली उमेदवारी
2024 च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठी जाहीर केली उमेदवारी
अमेरिकेला पुन्हा महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर करतोय- ट्रम्प
पिंपरी-चिंचवड : विवाहबाह्य संबंठ ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या, गळफास घेऊन आयुष्य संपवलं, आत्महत्या केलेल्या विकास माळवे यांच्या सुसाईड नोटमधून महिलेवर सनसनाटी आरोप
कोयत्यासोबत रील्स बनवणं पडल महागात, पिंपरी-चिंचवड येथे शस्त्रविरोधी पथकाची कारवाई, तरुणांवर गुन्हा
जितेंद्र आव्हाड आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता, 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल झाल्यानं जितेंद्र आव्हाड नाराज, आव्हाड-फडणवीस भेटीकडे सगळ्यांचं लक्ष