मुंबई : आज दिनांक 9 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या चिन्हाचा उपयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला करता येणार नाहीये. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज काही वेगवान राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानं मनसेनं उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे एक गुण आहे तो म्हणजे चेहरा भोळा करून आपल्यावर अन्याय कसा झाला ते सांगण्याचा. मात्र त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं देखील सामर्थ्य आहे, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला आहे.