आज मंगळवार 25 जानेवारी 2022. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज घडत असलेल्या राज्यातील राजकारणासह सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर वेगवेगळ्या राजकीय घडमोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजपनं दिलेल्या प्रतिक्रियेवरुनही राजकाय तापलंय. अशातच नव्या घोटाळ्यावरुन विरोधकांनी सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांना घेरण्याचा सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे रविवारी पहाटेपासून सुरु झालेलं राज्यातील अपघात सत्र मंगळवारीही सुरु असून पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात सात विद्यार्थी दगावले आहे. तसंच गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात कमालीचे बदल जाणवले असून राज्यात पुन्हा हुडहुडी वाढली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद झाली आहे, याचाही आढावा घेणार आहोत.
माकप नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला
केंद्र सरकारकडून आज पद्म पुरस्कारांची घोषणा मात्र भट्टाचार्य यांनी आपला पुरस्कार नाकारला
राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार (Maharashtra College Reopen)अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. करोनाच्या नियमाचे (Corona) पालन करून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत.
शाहीर साबळेनी गायलेलं भारुड आठवतं विंचू चावला पण हा विंचू वेगळा आहे. विंचवचा उतारा घ्यावा लागायचा, तो उतारा नाथांनी सांगितला आहे तो उतारा घेतला पाहिजे, नाहीतर आपण उताराला लागू.
जगातून पर्यटक येऊन गार्डन पाहतील असं करतो
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं पण जनतेची सेवा करावी तेंव्हा राजकारण करू नये
इकडून तिकडे कुणी गेलं म्हणून रुसून बसायचं का.? जनतेचे काम करताना राग बाजूला ठेवायचा असतो
संभाजीनगर नावाचा सुद्धा प्रश्न आहे. आपल्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे नाव देण्याचा प्रस्ताव दिल्ली दरबारी आहे. तो अभिमान लवकरात लवकर वाटण्याचा आनंद केंद्र सरकार लवकर देईल मला खात्री आहे. इथल्या खासदारांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला पाहिजे.
मनोरंजनाची साधने महत्वाची असतात, संत एकनाथ महाराजांचे नाव असलेले नाट्यगृहला आपण एक वेगळा साज चढवला आहे, मला पहायची रुखरुख लागली आहे. मला बदलेल रूप पहायची इच्छा आहे.
पूर्वीचं संभाजीनगर आणि आत्ताच संभाजीनगर यात फरक आहे.
गुंठेवारीचे वचन दिलं होतं, मी ते पूर्ण केलं
लवकरच संभाजीनगरला येणार
संभाजीनगरला दिलेली वचनं पूर्ण करणार
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या टीकेला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय. बोलताना त्यांना भान राहत नसल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. बीड जिल्ह्याची बदनामी त्या स्वतः करतात, किमान ज्या ठिकाणी जन्माला आलो तिथला अभिमान असला पाहिजे. इतर कोणताही मुद्दा मिळाला नाही, की काहीतरी बोलायचं जर माफियाराज असेल तर नाव घेऊन बोला असे थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिलं आहे.
औद्योगीक न्यायालयाने एसटी कामगार संघटनेची मान्यता रद्द करण्याचे दिले होते आदेश,
-23 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी,
– एसटी कामगार संघटनेची मान्यता रद्द करावी यासाठी इंटक संघटनेने औद्योगीक न्यायालयात केला होता अर्ज
शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी केली आरती,
शरद पवारांच्या तब्येतीसाठी घातलं बाप्पाला साकडं !
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरती करण्यात आली,
राज्यभरात पवारांसाठी केली जातीये प्रार्थना !
माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 नगरसेवक यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी..
27 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये करणार प्रवेश…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत करणार प्रवेश..
या अगोदर माजी आमदार असिफ शेख यांनी देखील काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत केला आहे प्रवेश..
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का आहे…
महापौर बनण्याचं स्वप्न सत्यात ऊतरेल हे जनता दाखवून देईल…गेल्या निवडणुकांत चांगला जनाधार दिला… मुंबईत अमुलाग्र बदल झाला… रस्ते खड्डे , कचरा डेपो, याने मुंबईकर परेशान…
– मुंबईकरांसमोर केवळ भाजप पर्याय… कोरोनामध्ये मोदींनी केलेली काळजी, मदत, लाखो कोटी रुपये मोनो , मेट्रोला मिळाले…भाजप समर्थ पर्याय… त्यामुळे महापौर आमचाच…
सतेज पाटील यांचं कुडाळ नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर सूचक वक्तव्य
कुडाळ नगर पंचायती मध्ये भाजप सोबत जाण्याचा विषयच नाही, आम्ही शिवसेने सोबत जाऊन सत्ता स्थापन करू
काँग्रेस नगरसेवकांना सन्मानपूर्वक कोणती पदे दिली जातात यासाठी शिवसेनेसोबत चर्चा, मात्र महा विकास आघाडी म्हणून शिवसेनेसोबतच राहणार
दोन्ही नगरसेवक जनतेसाठी नॉट रिचेबल असले तरी माझ्यासाठी रिचेबल आहेत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य
मी एका गावगुंडा बद्दल बोललो तर भाजप ने राज्यभर आंदोलन केलं, गावगुंडा बद्दल त्यांच्या विचाराची प्रमाणिकता आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी करत भाजपला पुन्हा डिवचलंय. ज्या शेतकऱ्यांना गाडी खाली दाबून मारलं, त्यावर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली असती तर बर झालं असतं, असाही टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, टिपू सुलतान मैदानावरुन पुन्हा भाजपवर हल्लाबोल क भाजप नकली धर्माचा आव आणून राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी मांडणार नितेश राणेंची बाजू, सुप्रीम कोर्टात नितेश राणेंच्या जामीवारील सुनावणीदरम्यान मुकुल रोहतगी भाजप आमदार नितेश राणेच्याय बाजूने युक्तिवाद करणार, जिल्हा सत्र न्यायालयासह मुंबई हायकोर्टानंही फेटाळला होता नितेश राणे यांचा जामीनअर्ज
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली असून देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकील हजर झाले आहेत. आगामी मुंबई पालिसा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील ध्वजारोहण कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती, मानेचं ऑपरेशन झाल्यानंतर मुख्ममंत्र्यांनी अधिवेशनासह अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमात जाणं टाळलं होतं, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही मुख्यमंत्री ऑनलाईन काम करत होते, अखेर उद्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बहुचर्चित कुडाळ नगरपंचायतीवर सत्ता कोणाची? हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील ठरविणार आहेत. कुडाळमध्ये काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार की भाजप बरोबर हे ठरविण्याचा अधिकार गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांच्याकडे.
कुडाळ तालुका काँग्रेसच्या बैठकीत एकमुखी निर्णय.
सत्ता स्थापनेत असणार काँग्रेसची महत्वपूर्ण भूमिका.
कुडाळमधील बलाबल -भाजप 8,शिवसेना 7 तर काँग्रेस 2
काँग्रेसच्या नगरसेवकांकडे कुडाळमधील सत्तेची चावी.
गोव्यात परिवर्तन निश्चित आहे, पर्रीकरांचा भाजपनं अपमान केला, ज्या पक्षानं भाजपाल मोठं केलं, त्यांना डावलण्याचं काम भाजपनं केलं असल्याचं समोर आलं आहे- उदय सामंत
गोव्यात संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना निवडणुकीला गोव्यात सामोरी जाते आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सूचनेवरुन मी गोव्यातील शिवसेनेच्या कामाचा आढावा घ्यायला आलो आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते आरपीएन सिंह लवकरच भाजपात सामील होण्याची शक्यता, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक हादरा बसण्याची भीती, भाजपचं आरपीएन सिंह यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती
मुंबईत दुपारी 12 वाजताही धूरकट वातावरण दिसत असून सर्वदूर धुक्यांची चादर पसरली आहे. मुंबईच्या बांद्रा वरळी सि लिंकहून जात असताना मुंबईतील वरळी कोळीवाडा, बांद्रा, माहीम काॅस वे, दादर परिसरात दाट धुक्यांची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पदक जाहीर
पोलीस सेवा आणि शौर्य पदकं जाहीर
88 जणांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान होणार
महाराष्ट्रातल्या 4 जणांचा समावेश,
विनय कोरगावकर, प्रल्हाद खाडे, चंद्रकांत गुंडागे, अनवर मिर्झा यांचा होणार गौरव
नंदुरबारमधील चरणमाळ घाटात साखरचा ट्रक पलटला असून चालक अडकला होता. या अपघातात ट्रकचे दोन भाग झालेत. नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाटात मंगळवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास साखरने भरलेला ट्रकचा अपघात झाला. यात चालक व सहचालक गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
ई पास काढण्यासाठीच्या रांगेत उभे राहण्यावरून वाद
महिला आणि पुरुष भाविकांमध्ये झटापट
पोलिसांनी हस्तक्षेप करत नियंत्रणात वाद आणल्याची माहिती
युवा शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल 20 टन कलिंगड चोरी, इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील घटना, तोंडाशी आलेला घास गेल्याने युवा शेतकरी हतबल, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, गुन्हाही नोंदवला
बाळासाहेब थोरात यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. नीतीन राऊत ह्यांनी सातत्याने निधीचा विषय कॅबिनेटमध्ये मांडला, शेवटी पत्र लिहिले. त्यांनी पत्रात जे मांडले ती व्यावहारिक बाजू आहे, असं थोरात म्हणालेत. नाना हे नरेंद्र मोदीबद्दल बोलले नव्हते, त्यांनी मोदी समोर आणला आहे, मला वाटतं की राजकारणात व्यक्तिगत वक्तव्य नको, पण सविस्तर त्यांनाच विचारा, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. प्रत्येक पक्षाला स्वतःला वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे, पण भाजप हा देशासाठी हानिकारक आहे. उद्धव ठाकरे हे दिल्ली काबीज करायची भाषा करत असतील तर गैर नाही. राजकारण तत्वाच असलं पाहिजे द्वेषाच नाही या विचाराचा मी आहे, असंही ते म्हणालेत.
आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे गोव्यात जाणार आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. सर्व नियमांचं पालन करुन ते गोव्यात ते सभाही घेण्याची शक्यता आहे.
निवडणुकांचा निकाल आल्यानंतरही अनेकांचा निवडणुकांच्या निकालावर विश्वास उरलेला नसल्याचं ऐकायला मिळतंय. आमची मागणी आहे की पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका सुरु केल्या जाव्यात- संजय राऊत
मी ते ट्वीट मागे घेतलं असलं, तरी ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. पुनम महाजन यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. महाजन कुटुंबीयांशी आमचे चांगले संबंध आहेत. त्यांना वाईट वाटलं असेल, तर मीही अस्वस्थ झालो आहे. पण अनेकांनी आता ते ट्वीट फॉरवर्ड केलं आहे. आर के लक्ष्मण यांनी काढलेलं ते कार्टून मी शेअर केलं होतं. – संजय राऊत
भाजपच्या आताच्या नेत्यांनी नव्या हिंदुत्त्वाची भूमिका घेतली आहे. त्यांना इतिहासाच्या फाडलेल्या पानांची आम्ही वेळोवेळी आठवण करुन देत राहू- संजय राऊत
आज दिल्ली एक दोन व्यक्तींच्या हातात आहे. दिल्ली देशाची आहे. एखादी राजकीय पक्षाची किंवा एका व्यक्तीची असू शकत नाही. – संजय राऊत
पुनम महाजन यांना मी केलेलं ट्वीट आवडलं नसेल, तर मीही त्यानं अस्वस्थ झालो आहे. महाजन कुटुंबाशी आमचे चांगले संबंध आहेत. – संजय राऊत
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच, फर्ग्युसन कॉलेज आणि मैदानाच्या आवारात महिनाभरात असंख्य दारूच्या बाटल्या सापडल्या असल्याची माहिती पुणे प्लॉगर्स संस्थेने माहिती दिली आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये 15 जागांसाठी 164 उमेदवारी अर्ज दाखल, भुम तालुक्यातुन राष्ट्रवादीचे मधुकर मोटे बिनविरोध , आज उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार, 27 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार तर 20 फेब्रुवारीला मतदान तर 21 फेब्रुवारीला मतमोजणी होणार
म्हाडा परीक्षेतील सावळा गोंधळ अजूनही सुरुच आहे. विद्यार्थ्यांनं परीक्षा अर्ज भरताना केंद्र टाकलं पुणे, पण विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्र मिळालं नगर, असा अजब प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांना नगर, सांगली , कराड अशी परीक्षा केंद्र आली आहे. परीक्षा केंद्र बदलून आल्यानं विद्यार्थ्यांचा मनस्ताप झाला असून 7 आणि 9 फेब्रुवारी दरम्यान 565 पदासाठी म्हाडा भरतीची परीक्षा होणार आहे. दोन वेळा परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना गोंधळाला सामोरं जावं लागतंयय.
नाशिक – कमाल तापमानात पुन्हा घट झाली आहे. नाशिकमध्ये 6.3 तापमान नोंदवण्यात आलं आहे. तर निफाडमध्ये पारा 4.5 अशांवर तापमान पोहोचलंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कायम असलेली थंडी आजही तशीच असून नाशिककरांना आज पुन्हा हुडहुडी भरली आहे.
पुण्यात थंडीचा कडाका वाढला, पुण्याचा पारा 9 अंश सेल्सिअसवर, आणखी चार दिवस गारठ्यात वाढ होणार!
मुंबई, ठाण्यात वातावरणात कमालीटी घट नोंदवण्यात आली आहे. सकाळी मुंबईचं तापमान हे 16 अंश सेल्सिअसवर होतं. कमाल तापमान 24 अंशापर्यंत राहणार आहे. गेल्या दहा वर्षातील सगळे्त कमी तापमानाची नोंद मुंबईत करण्यात आली आहे. तसंच मुंबईत धुरकट वातावरण निर्माण झालंय. अवकाळी पावसामुळे सध्या दिवसातील तिन्ही प्रहरांत विचित्र वातावरण अनुभवायला मिळतंय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आजही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईत असंच वातावरण राहणार आहे. दोन दिवसांनंतर राज्यातील किमान तापमानात प्रत्येकी दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा : खडकपूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाची चौकशी केली जाणार आहे. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या अध्यक्षत्याखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश असून देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करण्यात आले होते. रेती माफियांनी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप करण्यात आला होता.
वर्ध्यातील भीषण अपघातात मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेला एक विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातला होता. तीन विद्यार्थी प्रत्येकी उत्तर प्रदेश आणि दोन बिहारचे होते. तर एक विद्यार्थी हा ओडिशाचा होता. सातपैकी एक इंटर्न होता. दोन फायनर इयर आणि दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या मुलाचं नाव नीरज सिंह होता. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आविष्कार रहांगडाले आणि पवन शक्ती हे देखील सोबत होते. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. हॉस्टेलला रात्री दहा वाजता विद्यार्थी येणं अपेक्षित होते. पण विद्यार्थी आले नव्हते. वाढदिवस साजरा करायला चालले होते. मात्र तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. दहावाजेपर्यंत न आल्यानं विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही बाहेर असल्याचं कळवलं होतं. सर्व विद्यार्थी एमबीबीएसचे होते. अशी माहिती सावंगी मेडिकल कॉलेज ओएसडी अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे.
चारचाकी एक्सयुव्ही वाहनावरून नियंत्रण सुटल्याने एक भीषण झाला अपघात झाला आहे. अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळंतय. देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलंय. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.