मुंबई: राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा (Maharashtra MLC Election Results 2023 LIVE) आज निकाल लागणार आहे. अमरावती आणि नाशिक पदवीधर आणि नागपूर, कोकण आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप दरम्यान थेट लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. या मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. ते अपक्ष म्हणून लढत आहेत. त्यांना निवडून आणण्याचे आदेश भाजपने कार्यकर्त्यांना दिले होते. तर महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील या लढत आहेत. त्यामुळे नाशिकच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
नाशिक :
नाशिकमध्ये तिसऱ्या फेरीतही सत्यजित तांबे आघाडीवर
सत्यजित तांबेंना 45 हजारांपेक्षा जास्त मतं
सत्यजित तांबे तब्बल 20 हजार मतांनी आघाडीवर
कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी पुण्यात मनसे घेणार मेळावा
सर्व स्थानिक पदाधिकारी मेळाव्याला राहणार उपस्थित
कसबा विधानसभा निवडणुकीसाठी मनसे सज्ज
मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित राहण्याची शक्यता
नाशिक :
नाशिकमध्ये मतमोजणीची तिसरी फेरी सुरु
आतापर्यंत सत्यजित तांबे आघाडीवर
तिसऱ्या फेरीत नेमका काय निकाल येणार? याकडे राज्याचं लक्ष
नाशिकच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ
दोन्ही बाजूचे मतमोजणी प्रतिनिधी अधिक झाल्याने गोंधळ
सत्यजित तांबे आघाडीवर
सत्यजित यांना 15 हजार 784 मतं
शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 मतं
अमरावती :
अमरावती पदवीधर मतदारसंघ मतमोजणी
दुसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिगांडे 1600 मतांनी पुढे
भाजपाचे विद्यमान आमदार रणजित पाटील दुसऱ्या फेरीतही पिछाडीवर
आता काही वेळातच तिसऱ्या फेरीला होणार सुरुवात
अमरावती पदवीधर निवडणूकीत भाजपची पिछाहाट
नागपूर :
भाजपला बालेकिल्ल्यात धक्का, नागपुरात मविआचा विजय
सुधाकर आडबाले 16 हजार 500 मतांनी विजयी
औरंगाबाद :
दुसऱ्या पसंतीच्या पाच फेऱ्यांत विक्रम काळे आघाडीवर
पाच फेऱ्यांत विक्रम काळे यांना मिळाली 13 मते
तर किरण पाटील यांना मिळाले 8 मते
दुसऱ्या पसंतीच्या 9 फेऱ्या बाकी
नाशिक :
– नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांची आघाडी
– आघाडीवर असल्याचे कळताच मतदान केंद्र बाहेर तांबेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
– सत्यजित तांब्यांच्या समर्थनात युवा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
– घोषणाबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी प्रवेशद्वारापासून दोनशे ते अडीचशे मीटर दूर पिटळून लावले
भाजपचे नागो गाणार यांचा पराभव
सुधाकर आडबोले यांना १४ हजारापेक्षा जास्त मते
गाणार यांना केवळ ६ हजार ३०० मते
औपचारिक घोषणा बाकी
नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांची आघाडी
महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील पिछाडीवर
मतदार संघात दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस
भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 11312 मते
माविआचे धिरज लिंगाडे 11992
680 मतांनी माविआचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर
नागपूर, अमरावती, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीची आघाडी
नाशिकमध्ये मतपत्रिका बाद होण्याचे प्रमाण अधिक
नाशिकमध्ये चुरशीची लढत सुरु
भाजपच्या कोअर कमिटीची आज मुंबईत बैठक
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी भाजपची बैठक
आज उमेदवार निश्चित होण्याची शक्यता
बैठकीत दोन्ही मतदारसंघातील उमेदवारीवर होणार चर्चा
नागपूर, अमरावती आणि औरंगाबादेत भाजपला धक्का बसण्याची शक्यता
निकाल आघाडीच्या बाजूने गेल्यास राज्याच्या राजकारणावर परिणाम होणार
पहिल्या कलामुळे आघाडीत आनंदाचं वातावरण
अमरावती पदवीधर : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर
विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर
मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या मतांचे गठ्ठे धीरज लिंगाडे यांचे
दुपारी 3 वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्याची शक्यता
बाळाराम पाटील यांनी पराभव स्वीकारला
बाळाराम पाटील ९ हजार ७०० मते
भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २० हजारापेक्षा जास्त मते
भाजपचा विजय निश्चित
कोकणाचा निकाल भाजपकडे येणार
भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २० हजारांपेक्षा जास्त मते
म्हात्रे यांना एकूण मतांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते
कोकणात शेकापला धक्का
265 टपाल मतदान, त्यापैकी अवैध मते 73 तर वैध 192 मते
सर्वाधिक अकोला जिल्ह्यातील 34 मते अवैध
टपाल मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर आता पाहिल्या फेरीला सुरवात
अमरावतीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीला सुरवात
या बैठकीत गजानन किर्तीकर, प्रतापराव जाधव, रामदास कदम, भावना गवळी, गुलाबराव पाटील, शंभूरजे देसाई हे मुख्य मार्गदर्शक असणार
येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीसाठी कशापद्धतीने काम करावे, पक्षातील लोकांच्या समस्या यावर चर्चा होणार
पक्ष प्रवेश केलेल्या लोकांचे, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख पदाच्या प्रस्तावांवर चर्चा होणार
युवा सेना कार्यकारिणी संदर्भात देखील होणार चर्चा
कोकण शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत
भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध बाळाराम पाटील लढत
निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष
अमरावती विभाग पदवीधर निवडणूक
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील टपाल मतमोजणी पूर्ण
265 टपाल मतदान; त्यापैकी अवैध मते 73 तर वैध 192 मते
सर्वाधिक अकोला जिल्ह्यातील 34 मते अवैध
टपाल मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर आता पाहिल्या फेरीला सुरवात
अमरावतीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीला सुरवात