Vidhan Parishad Election Results, Winner 2024 LIVE : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?

| Updated on: Jul 16, 2024 | 8:37 PM

Maharashtra MLC Election Results 2024 Winner Announcement and LIVE Counting in Marahti : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर. पंकजा मुंडे, अमित गोरखे आणि परिणय फुके हे विजयी झाले आहेत. तर, सदाभाऊ खोत हे 14 मते घेऊन पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

Vidhan Parishad Election Results, Winner 2024 LIVE : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?
Follow us on

MLC Election Results 2024 LIVE Updates : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज शुक्रवारी 12 जुलै रोजी मतदान पार पडत आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 उमेदवार पाहायला मिळत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. तर शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jul 2024 09:17 AM (IST)

    Marathi News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सगळीकडे पोहोचवा

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सगळीकडे पोहोचवा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थी जोडा. ही प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी आहे.

  • 12 Jul 2024 09:44 PM (IST)

    अनंत अंबानीच्या लग्नातील खास व्हिडीओ पुढे

    अनंत अंबानी हा लग्नासाठी तयार होत असतानाच व्हिडीओ पुढे आलाय. यामध्ये ईशा अंबानी ही देखील दिसत आहे.

     


  • 12 Jul 2024 09:42 PM (IST)

    अनंतच्या लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले रामदेव बाबा

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात रामदेव बाबा पोहोचले आहेत.

  • 12 Jul 2024 09:14 PM (IST)

    हार्दिक पांड्याने केला देसी स्टाईलने खास डान्स

    अनंत अंबानी याच्या लग्नात हार्दिक पांड्याने अत्यंत खास स्टाईलने डान्स केला.

  • 12 Jul 2024 07:03 PM (IST)

    पराभवाचा धक्का, जयंत पाटील मतदान केंद्रातून निघून गेले

    ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात विजयासाठी चुरस निर्माण झाली आहे. नार्वेकर फक्त एका मताने विजयापासून दुर आहेत. तर, जयंत पाटील यांना 12 मते मिळाली आहेत. त्यांना आणखी 11 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे पराभवाच्या धक्क्यामुळे जयंत पाटील मतदान केंद्रातून निघून गेले.

  • 12 Jul 2024 06:57 PM (IST)

    शिवसेनेची 2 तर कॉंग्रेसची 6 मते फुटली, भाजप आमदार संजय कुटे यांचा दावा

    विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची 2 तर कॉंग्रेसची सहा मते फुटली असा दावा माजी मंत्री आणि भाजप आमदार संजय कुटे यांनी केला आहे.

  • 12 Jul 2024 06:52 PM (IST)

    पक्षासाठी अधिक जोमाने काम करेन; विजयानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

    विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजप नेत्या पंकज मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला आनंद वाटत आहे. मी पक्षासाठी अधिक जोमाने काम करेन असे त्या म्हणाल्या.

  • 12 Jul 2024 06:47 PM (IST)

    महाविकास आघाडीला धक्का, मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील? निकाल बाकी

    महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे 22 मतांवर अडकले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्यावर उभे असलेले शेकापचे जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरु आहे.

  • 12 Jul 2024 06:43 PM (IST)

    महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?

    विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे कृपाल तृमाने, भावना गवळी आणि अजितदादा गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे उमेदवारही विजयी झाले आहेत.

  • 12 Jul 2024 06:40 PM (IST)

    सदाभाऊ खोत यांचा विजय, दुसऱ्या पसंतीच्या मतांनी केले विजयी

    विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा परभव झाला आहे. त्यांना 12 मते मिळाली आहेत. तर, भाजपचे सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीची अधिक मते घेऊन ते विजयी झाले आहेत.

  • 12 Jul 2024 06:32 PM (IST)

    भाजपचे चार उमेदवार विजयी, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयाच्या उंबरठ्यावर

    विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर. पंकजा मुंडे, अमित गोरखे आणि परिणय फुके हे विजयी झाले आहेत. तर, सदाभाऊ खोत हे 14 मते घेऊन पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना विजयासाठी केवळ एका मताची गरज आहे.

  • 12 Jul 2024 06:28 PM (IST)

    अजितदादा गटाचे दोन्ही उमेदवार विजयी

    अजितदादा गटाचे राजेश विटेकर हे 23 तर शिवाजीराव गर्जे हे 24 मते घेऊन विजयी झाले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर अजितदादा गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे.

  • 12 Jul 2024 06:28 PM (IST)

    अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी

    विधान परिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी विजय मिळवल आहे

  • 12 Jul 2024 06:23 PM (IST)

    भाजपचे तीन उमेदवार विजयी, पंकजा मुंडे विधान परिषदेवर

    विधान परिषद निवडणुकीमध्ये योगश टिळेकर, पकंजा मुंडे आणि परिणय फुके विजयी झाले आहेत. पंकजा यांना दोन जास्तीची मते मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:21 PM (IST)

    भाजपचा दुसरा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

    भाजपचा दुसरा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, अमित गोरखे यांना २२ मते मिळाली आहेत. गोरखे यांना जिंकण्यासाठी १ मताची गरज आहे.

  • 12 Jul 2024 06:20 PM (IST)

    विधान परिषद निवडणूक मतमोजणीत कोण आघाडीवर?

    विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत यातील भाजपचे योगेश टिळेकर हे 23 मते घेऊन विजयी झाले आहेत.

    – भाजपच्या पंकजा मुंडे यांना 18, सदाभाऊ खोत यांना 10, अमित गोरखे यांना 22 आणि परिणय फुके यांना 18 मते मिळाली आहेत.

    – शिंदे गटाचे कृपाल तृमाने यांना 16 तर भावना गवळी यांना 16 मते मिळाली आहेत.

    – अजितदादा गटाचे राजेश विटेकर यांना 21 तर शिवाजीराव गर्जे यांना 20 मते मिळाली आहेत.

    – ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना 17 आणि कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना 19 मते मिळाली आहेत.

    – शेकापचे जयंत पाटील यांना सर्वात कमी म्हणजे 7 मते मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:19 PM (IST)

    अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी 5 मतांची गरज

    अजित पवार गटाच्या राजे विटेकर यांना २१ मते पडली असून विजयासाठी त्यांना दोन मतांची गरज आहे.  तर शिवाजीराव गर्जे यांना २० मते मिळाली असून त्यांना जिंकण्यासाठी तीन मतांची गरज आहे.

  • 12 Jul 2024 06:16 PM (IST)

    भाजपचे योगेश टिळेकर विजयी

    योगेश टिळेकर यांनी आपला २३ मतांचा आकडा पूर्ण केला असून विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल लागला आहे.

  • 12 Jul 2024 06:12 PM (IST)

    भाजपचा पहिला विजय योगेश टिळेकर यांचा हवीत अवघी दोन मते

    भाजपचे योगेश टिळेकर यांना 22 मते मिळाली आहेत. त्यांना विजयासाठी अवघी 2 मते हवी आहेत. शिंदे गटाचे कृपाल तृमाने यांना 16 तर भावना गवळी यांना 10 मते मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:12 PM (IST)

    भाजपचा पहिल उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

    भाजपच्या योगेश टिळेकर यांना २२ मते मिळाली असून त्यांना जिंकण्यासाठी एक मताची गरज आहे.

  • 12 Jul 2024 06:02 PM (IST)

    भाजपच्या पंकजा मुंडे यांना 10 मते

    भाजपचे योगेश टिळेकर, कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर आघाडीवर आहेत. सातव आणि टिळेकर यांना प्रत्येकी 14 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना 10 मते मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:02 PM (IST)

    क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, कृणाल पांड्या अनंतच्या लग्नासाठी दाखल

    क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, कृणाल पांड्या, इशान किसन, अभिनेता रजनीकांत कुटुंबासह पोहोचले.

  • 12 Jul 2024 06:00 PM (IST)

    अमित गोरखे यांना मिळालं गोंधळाचे मत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय

    आतापर्यंत आलेल्या मतमोजणीमध्ये शेकापचे जयंत पाटील यांना 2 मते मिळाली आहेत. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना 17 मते मिळाली आहेत. त्यांना विजयासाठी सहा मतांची गरज आहे. तर समान पसंती दिल्याने एक मत बाद झाले आहे.

  • 12 Jul 2024 05:58 PM (IST)

    अनंत अंबानीच्या लग्नाला हार्दिक पांड्या पोहोचला

    क्रिकेटर हार्दिक पांड्या, अलाविया जाफरी, ए.आर. रहमान पत्नीसह लग्नासाठी उपस्थित झाले आहेत.

  • 12 Jul 2024 05:50 PM (IST)

    प्रज्ञा सातव , मिलिंद नार्वेकर यांना प्रत्येकी 7 मते

    विधान परिषद निवडणुक मतमोजणीला सुरवात झाली आहे. मतमोजणीत कॉंग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांना 7 तर ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनाही 7 मते मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरु आहे.

  • 12 Jul 2024 05:46 PM (IST)

    अनंत अंबानी पोहोचला ओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला

    बारात घेऊन अनंत अंबानी पोहोचला. अंबानी कुटुंब जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पोहोचले आहे.

  • 12 Jul 2024 05:36 PM (IST)

    25 मतपत्रिकांचा एक असे एकूण 11 गठ्ठे तयार, निकाल काही वेळातच लागणार

    25 विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. 25 मतपत्रिकांचा एक असे एकूण 11 गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. पसंती क्रमानुसार यातील मते ट्रेमध्ये टाकली जाणार आहेत. पहिली पंसती, दुसरी पसंती अशी क्रमानुसार मत पत्रिका लावली जाणार आहेत.

  • 12 Jul 2024 05:29 PM (IST)

    विधान परिषद निवडणूक मतमोजणीला सुरवात

    विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरवात होत आहे. चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतमोजणीला सुरवात होत आहे.

  • 12 Jul 2024 05:12 PM (IST)

    ममता बॅनर्जी यांची भेट ही घरगुती भेट आहे – उद्धव ठाकरे

    ममता बॅनर्जी यांची भेट ही घरगुती भेट आहे. त्या मागे देखील आल्या होत्या. आता देखील भेट घेण्यासाठी आल्या आहेत. मोदी यांच्या काळात अनेक गोष्टी बदलत आहे. त्यामुळे अशा भेटी यापुढे होतच राहतील असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

  • 12 Jul 2024 05:09 PM (IST)

    ‘मेरे यार की शादी है’ अभिनेता अर्जुन कपूर याची हटके स्टाईल

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी अनेक बॉलिवूड स्टार हजेरी लावत आहेत. अभिनेता अर्जुन कपूर हा ‘मेरे यार की शादी है’ असे लिहिलेले कपडे घालून या लग्नाला उपस्थित राहिला. सारा अली खान, इब्राहिम अली खान, खुशी कपूर आदि कलाकार या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत.

  • 12 Jul 2024 04:53 PM (IST)

    खेडकर कुटुंबियांनी अखेर त्या वादग्रस्त ऑडी गाडीवरचा 27,400 दंड भरला

    पूजा खेडकर खेडकर कुटुंबियांनी अखेर त्या वादग्रस्त ऑडी गाडीवरचा दंड भरला आहे. 27400 रूपये शासनाकडे भरला आहे. ऑनलाईन ई चलनाची पावती टीव्ही 9 मराठीच्या हाती. त्या ऑडी गाडीने तब्बल 21 वेळा केला होता वाहतुक नियमांचा भंग. दिवा लावलेली ती ऑडी गाडी खेडकर कुटुंबिय डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या नावे आहे. डॉ पूजा खेडकर या तीच ऑडी कार वापरत होत्या.

  • 12 Jul 2024 04:32 PM (IST)

    मुंबई-पुणे महामार्गावर वाशी प्लाझा ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    मुंबई पुणे महामार्गावर वाशी प्लाझा ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावरती चिखल पडल्याने मोटर सायकल व गाड्यांचे अपघात होत असल्याने मोठ्या प्रमाणा वाहतूक कोंडी. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल पाण्याचा फवारा मारत चिखल काढण्याचे काम सुरु

  • 12 Jul 2024 04:18 PM (IST)

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घेणार शरद पवार यांची भेट

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी या मातोश्रीवरुन सिल्वर ओककडे रवाना झाल्या आहेत.

  • 12 Jul 2024 04:17 PM (IST)

    25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार

    25 जून बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा. यापुढे 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू झाली होती. आणीबाणीच्या विरोधात केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

  • 12 Jul 2024 03:58 PM (IST)

    ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीत दाखल

    या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. इंडिया आघाडीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं त्यानंतर ममता बॅनर्जी या ठाकरेंच्या भेटीला आल्या आहेत. ममता बॅनर्जी यानंतर सिलव्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे.

  • 12 Jul 2024 03:33 PM (IST)

    विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

    शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाला वंदन केलं आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जाता जाता पायरीला स्पर्श करत विधान भवनाला वंदन केलं.

  • 12 Jul 2024 03:17 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांना दिलासा आणि झटका, सुप्रीम कोर्टाकडून जामीनानंतर अटी

    अरविंद केजरीवाल यांना एकाचवेळी दिलासाही मिळाला आहे आणि झटकाही लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीनानंतर महत्त्वपूर्ण अटी घातल्या आहेत. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही. दिल्ली सचिवालयामध्येही केजरीवाल यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कथित दारू घोटाळ्याप्रकरणी आज अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.

  • 12 Jul 2024 02:58 PM (IST)

    लॉबीत काय खलबतं?

    विधीमंडळाच्या लॉबीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथला आणि शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली. जवळपास १५ मिनिटे तिघांमध्ये एकत्र चर्चा झाली. त्यानंतर रमेश चेनिथला विधान भवनातून निघाले.

  • 12 Jul 2024 02:50 PM (IST)

    कोणता उमेदवार पराभवाच्या छायेत?

    एकनाथ शिंदे यांच्या ४७ आमदारांनी मतदान केले आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, शिवसेना – ३७ आमदार ,अपक्ष – ९ आमदार
    एकुण – ४७ आमदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 12 Jul 2024 02:48 PM (IST)

    गणपत गायकवाड यांना अखेर मतदानाची परवानगी

    उल्हानगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांना अखेर विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मिळाली आहे. ते नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत.

  • 12 Jul 2024 02:40 PM (IST)

    मनसेच्या आमदाराचं मत कुणाच्या पारड्यात

    विधान परिषदेच्या मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. शिंदे गटाच्या आमदारांसह इतर पाठीराखे मिळून 41 जणांनी मतदान केले आहे. तर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आणि बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • 12 Jul 2024 02:30 PM (IST)

    जयंत पाटील आणि दादांमध्ये कुठला संवाद?

    विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु असताना एक वेगळंच चित्र माध्यमांनी टिपलं. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार एकमेकांसमोर आले. त्या दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला. एकमेकांच्या हातात हात देत दोघांमध्ये चर्चा झाली. आता दोघांत काय खलबतं झाली, यावर चर्चा रंगली आहे.

  • 12 Jul 2024 02:10 PM (IST)

    क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला?

    विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत तर महविकास आघाडीचे 3 उमेदवार मैदानात आहेत. महाविकास आघाडीचे काही आमदार गळाला लागल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे. तर महायुतीविषयी महाविकास आघाडीकडून असाच दावा करण्यात येत आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला अशी चर्चा रंगली आहे.

  • 12 Jul 2024 02:01 PM (IST)

    महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील; संजय राऊत यांना विश्वास

    महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत विधान भवनात आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आजच्या निकालानंतर कोण कुठून पळून जाईल हे कळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलंय.

  • 12 Jul 2024 02:00 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या ४७ आमदारांनी केले मतदान

    एकनाथ शिंदे यांच्या ४७ आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर येत आहे. पाच ते सहा अतिरिक्त मते आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन देण्याची शक्यता आहे. शिवसेना – ३७ आमदार ,अपक्ष – ९ आमदार एकुण – ४७ आमदारांनी मतदान केले आहे.

  • 12 Jul 2024 01:42 PM (IST)

    शिंदे गटाच्या 47 आमदारांचं मतदान पूर्ण

    एकनाथ शिंदे गटाच्या 47 आमदारांनी मतदान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन अतिरिक्त 5-6 मते शिंदे गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    शिवसेना – 37 आमदार

    अपक्ष -9 आमदार

    एकुण – 47

    अतिरिक्त मते – 5 ते 6

     

  • 12 Jul 2024 01:39 PM (IST)

    विधान परिषदेसाठी आतापर्यंत 261 मते पडली

    विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत 261 आमदारांनी मतदान केलं आहे. अजून 13 आमदारांचं मतदान बाकी आहे.

    कुणाचं किती मतदान?

    भाजप-103 +अपक्ष-5 =108
    शिंदे गट-37 +अपक्ष-8= 45
    अजित पवार-40 +अपक्ष-2 =42
    काँग्रेस-37
    शरद पवार-12
    ठाकरे गट-15+अपक्ष-2 =17

  • 12 Jul 2024 01:35 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी केला काँग्रेस आमदारांना नमस्कार

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काँग्रेस आमदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आमदारांना नमस्कार करत त्यांचे आभार मानले. आज विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आमदारांची ठाकरे गटाला मदत लागणार होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी या आमदारांचे आभार मानले.

  • 12 Jul 2024 01:32 PM (IST)

    मिलिंद नार्वेकर विधानभवनात भाजप आमदारांसोबत बसले

    मतदानाच्या सभागृहात मिलिंद नार्वेकर हे पंकजा मुंडे यांच्या शेजारी बसले होते. त्यानंतर उठून भाजपचे आमदार बसलेल्या गर्दीत टेबलवर जाऊन बसले. मिलिंद नार्वेकर यांचा मतदानाच्या सभागृहात सुद्धा महायुतीच्या नेत्यांसोबत वावर पाहायला मिळतोय.

  • 12 Jul 2024 01:17 PM (IST)

    भाजपच्या 108 आमदारांचं मतदान

    भाजपच्या 108 आमदारांनी आतापर्यंत मतदान केलं आहे. कालच या आमदारांना मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी हे मतदान केलं आहे.

  • 12 Jul 2024 01:15 PM (IST)

    विधान परिषदेसाठी आतापर्यंत काँग्रेसच्या 34 आमदारांचं मतदान

    विधान परिषदेसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या 34 आमदारांचं मतदान केलं आहे. अजून काही आमदारांचं मतदान बाकी आहे.

  • 12 Jul 2024 12:49 PM (IST)

    सहकार मंत्री दिलीप वळसे यांना बजावण्यात आली अवमान नोटीस

    सहकार मंत्री दिलीप वळसे यांना अवमान नोटीस बजावण्यात आली .

    परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) थकबाकीदार विविध कार्यकारी सेवासहकारी संस्थेचे संचालक आमदार तानाजी मुटकुळे आणिआमदार अब्दुल्ला खान लतिफ खान दुर्रानी (बाबाजानी दुर्रानी) यांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

    मात्र सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनावणीच घेतली नाही. त्यामुळे दाखल झालेल्या अवमान याचिकेत दिलीप वळसे पाटील यांना अवमान नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रविंद्र घुगे, न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत

  • 12 Jul 2024 12:39 PM (IST)

    MLC Election 2024 : काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी यांनी केले मतदान

    विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  आज मतदान पार पडत आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी यांनी मतदान केलं.

  • 12 Jul 2024 12:28 PM (IST)

    MLC Election 2024 :शिवसेनेच्या अपक्ष ऊमेदवार पकडून सर्व आमदारांचं मतदान पूर्ण

    शिवसेनेच्या अपक्ष ऊमेदवार पकडून सर्व आमदारांचं मतदान  पूर्ण. एकनाथ शिंदे यांनीही केलं मतदान.  ११ अपक्ष आमदारांचा शिंदेंना पाठिंबा आहे.

  • 12 Jul 2024 12:19 PM (IST)

    MLC Election : आत्तापर्यंत झालेलं मतदान किती ? आकडेवारी आली समोर

    विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  आज मतदान पार पडत आहे.  आत्तापर्यंत झालेलं मतदान ?

    भाजप- 100

    अपक्ष- 9

    अजित पवार गट- 39 + अपक्ष2= 41

    शिंदे गट- 30

    काँग्रेस- 30

    शरद पवार गट- 12

  • 12 Jul 2024 12:05 PM (IST)

    MLC Election 2024 : भाजपकडून सत्तेचा दुरोपयोग सुरु आहे – अनिल देशमुख यांचा आरोप

    मी जेलमध्ये असताना मला कोर्टाने परवानगी दिली नाही आणि गणपत गायकवाड यांना मात्र परवानगी दिली. भाजपकडून सत्तेचा दुरोपयोग सुरु आहे , असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

  • 12 Jul 2024 12:01 PM (IST)

    MLC Election 2024 : शिंदे गटाचे आमदार मतदान करण्यासाठी पोहोचले

    शिंदे गटाचे आमदार मतदान करण्यासाठी पोहोचले. भावना गवळी आणि तृपाल तुमाने असे शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिंद गटाकडून व्यक्त करण्यात आला.

  • 12 Jul 2024 11:48 AM (IST)

    MLC Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांपैकी आत्तापर्यंत ३७ आमदारांनी केलं मतदान

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ४० आमदारांपैकी आत्तापर्यंत ३७ आमदारांनी मतदान केलं आहे. अद्याप ३ आमदारांनी मतदान केलं नाही आहे आणि २ अपक्ष आमदारांनी मतदान केलं नाही आहे

  • 12 Jul 2024 11:38 AM (IST)

    नवी दिल्ली –  हाथरस दुर्घटने प्रकरणी सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    नवी दिल्ली –  हाथरस दुर्घटने प्रकरणी सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार.  याचिकाकत्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला.  घटना दुर्दैवी आहे पण याबाबत हायकोर्ट निर्णय घेईल  असे सुप्रीम कोर्टाने नमूद केले.

  • 12 Jul 2024 11:36 AM (IST)

    MLC Election 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड विधानभवनात दाखल

    भाजप आमदार गणपत गायकवाड विधानभवनात दाखल झाले आहेत. गायकवाड यांच्या मतदानावरून काँग्रेसने आक्षेप घेतला होता. मात्र आता पोलीस हे गायकवाड यांना घेऊन विधानभवनात पोहोचले असून थोड्याच वेळात ते मतदान करतील. गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी मिळू नये, म्हणून काँग्रेसच निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं होतं.

     

  • 12 Jul 2024 11:27 AM (IST)

    MLC Election 2024 : काँग्रेस कडून प्रज्ञा सातव यांना 26 ते 28 मतांचा कोटा

    काँग्रेस कडून प्रज्ञा सातव यांच्यासाठी 26 ते 28 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. काँग्रेस मध्ये जे आमदार फुटण्याची शक्यता होती त्या आमदारांना काँग्रेस पक्ष श्रेष्ठीकडून कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

     

  • 12 Jul 2024 11:19 AM (IST)

    अबू आझमी आणि रईस शेख हे जयंत पाटील यांच्या भेटीस पोहोचले

    अबू आझमी आणि रईस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले. समाजवादी पक्ष आज कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने आमच्याशी  संपर्क साधला गेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

  • 12 Jul 2024 11:11 AM (IST)

    MLC Election 2024 : शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयात शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक

    शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयात शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक. मतदान कसं करायचं याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिदे प्रत्येक आमदाराशी वन टू वन टेबल टॉक करणार

     

  • 12 Jul 2024 10:57 AM (IST)

    Maharashtra News : आईच्या व्हायरल व्हिडिओमुळे पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार

    आता पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पूजा खेडकर यांच्या आईचा धमकी देतानाचा हा व्हिडिओ आहे. बंदुक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ आहे.

  • 12 Jul 2024 10:42 AM (IST)

    National News : अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केलाय. दिल्ली एक्साईज पॉलिसी केसमध्ये हा जामीन मिळाला आहे.

  • 12 Jul 2024 10:22 AM (IST)

    MLC Election 2024 : गणपत गायकवाडांना मतदान करता येईल का?

    गणपत गायकवाडांच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध. काँग्रेसच्या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याचा आरोप असलेले गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत.

  • 12 Jul 2024 10:09 AM (IST)

    MLC Election 2024 : गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस तळोजा कारागृहातून निघाले

    आमदार गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस तळोजा कारागृहातून निघाले आहेत. गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी मिळू नये, म्हणून काँग्रेसच निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार मतदान करु शकत नाहीत, पत्रात उल्लेख. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु आहे.

  • 12 Jul 2024 09:52 AM (IST)

    MLC Election Results 2024 : अजित पवार गटाचे आमदार मतदानासाठी निघाले

    अजित पवार  गटाचे आमदार मतदानासाठी हॉटेलमधून निघाले आहे. आमदारांची बस विधानभवनाकडे निघाले आहे. अजित पवार गटाने आपले उमेदवार उभे केले आहेत.

  • 12 Jul 2024 09:47 AM (IST)

    MLC Election Results 2024 : आमदारांना फडणवीस यांचे पुन्हा मार्गदर्शन

    देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातील पक्ष कार्यालयात सगळ्या आमदारांना सूचना दिल्या. फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. मतदानाआधी आमदार आणि मंत्री विधीमंडळ पक्ष कार्यालयात एकत्र आले होते.

  • 12 Jul 2024 09:35 AM (IST)

    Marathi News: आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढणार

    वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढणार आहे. पूजा खेडकर यांनी पुणे पोलिसांच्या नोटीसीला उत्तर दिले नाही तर पोलीस कोर्टात जाणार आहे. खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलीस कोर्टात खटला दाखल करणार आहे.

  • 12 Jul 2024 09:23 AM (IST)

    MLC Election Results 2024 : मुख्यमंत्र्यांनी आमदारांशी केली चर्चा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा सर्व आमदार सोबत फोनवरून चर्चा केली. आमदारांना निवडणूक संदर्भात पुन्हा एकदा दिल्या सूचना केल्या. मध्यरात्री मुख्यमंत्री यांनी ताज लॅंड हॉटेलमध्ये सर्व आमदारांशी चर्चा केली होती.

  • 12 Jul 2024 09:13 AM (IST)

    Marathi News: आमची मते शिंदे गटाला, बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

    प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमची दोन्ही मते शिंदे गटाला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 12 Jul 2024 09:03 AM (IST)

    Marathi News: महायुतीची मते फुटणार – नितीन राऊत

    महायुतीची मते फुटणार म्हणून आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये कैदी बनवून ठेवले आहे. आम्हाला विजयाचा विश्वास आहे. आमचे ३ उमेदवार विजयी होणार आहे, असे आमदार नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

  • 12 Jul 2024 08:54 AM (IST)

    MLC Election Results 2024 : आमचाच उमेदवार विजय होईल, अजित पवार यांना विश्वास

    MLC Election Results 2024 : आमचाच उमेदवार विजय होईल, अजित पवार यांना विश्वास

    विधानपरिषदेच्या निवडणुकीची तयारी सध्या सुरु झाली आहे. त्यातच आता आमचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

  • 12 Jul 2024 08:51 AM (IST)

    MLC Election Results 2024 : मतदानाची वेळ वाढवा, मिलिंद नार्वेकरांची मागणी

    MLC Election Results 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पाऊस असल्यामुळे मतदान एक तास वाढवावे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे. आम्हाला त्याबाबत काही कळविण्यात आले नाही. 9 ते 4 मतदानाची वेळ आहे. ती वाढविण्यात यावी अशी मागणी होती. या आधी 9 ते 5 ची वेळ असायची, त्याप्रमाणे वेळ वाढवावी अशी मागणी केली होती, असे नार्वेकर म्हणाले.

  • 12 Jul 2024 08:42 AM (IST)

    MLC Election Results 2024 : विधानपरिषदेसाठी ‘हे’ उमेदवार रिंगणात

    MLC Election Results 2024 : विधानपरिषदेसाठीचे उमेदवार

    • भाजपाचे उमेदवार : पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत
    • शिवसेना (एकनाथ शिंदे ) : भावना गवळी, कृपाल तुमणे
    • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
    • काँग्रेस : डॉ. प्रज्ञा राजीव सातव
    • शेतकरी कामगार पक्ष : जयंत पाटील
    • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : मिलिंद नार्वेकर
  • 12 Jul 2024 08:41 AM (IST)

    MLC Election Results 2024 : आजच होणार फैसला

    MLC Election Results 2024 : विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल आजच जाहीर होणार आहे.