राज्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस (Rain) कोसळतोयं. राज्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. कोकण आणि विदर्भात 12 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाकडून दिला गेलायं. तर मराठवाड्यात देखील पावसाने हजेरी लावलीय. काही ठिकाणी या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले असून दोन ते तीन दिवसांपासून पिके पाण्यात (Water) असल्याने बळीराजा चिंतेत दिसतोयं.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात मच्छिमारांच्या एका जहाजाचं इंजिन बंद पडलं होतं. राजगडजवळील मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ हे जहाज बंद पडलं होतं. अशावेळी रत्नागिरी कोस्ट गार्डने खलाशी आणि जहाजावरील मच्छिमारांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं. त्यामुळे 10 मच्छिमारांचे प्राण वाचले.
गोंदिया जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक नदी नाले तुडू्ंब भरुन वाहत आहेत. या पावसामुळे तिरोडा तालुक्यातील पांजरा इथे बुरुड समाजातील एक जोडपे अडकून पडले होते. या जोडप्याला रामेश्वर चौधरी आणि प्रदीप मडावी यांनी लाकडाच्या सहाय्यानं पाण्यातून बाहेर काढलं. त्यामुळे या जोडप्याचे प्राण वाचले.
भामा आसखेड धरण जलाशयातील पाणीसाठी 100 टक्के झाल्यानं प्रकल्पाच्या चार वक्र दरवाज्यातून 620 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भामा नदीत सोडण्यात येणार आहे. अशावेळी नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, नतीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत अशा सूचना भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
भामा आसखेड धरण जलाशयातील पाणीसाठा 100 टक्के झाल्याने प्रकल्पाच्या चार वकद्वारातून 620 क्यूसेक एवढा विसर्ग भामा नदीत सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले.
इचलकरंजी शहराची पंचगंगा नदी सध्या 66 फुटावर वाहू लागली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं. शेतामध्ये पुराचे पाणी घुसले असून राधानगरी धरणातून पाणी विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढू लागले तसेच श्री क्षेत्र नरसेवाडी मंदिरामध्ये कृष्णा व पंचगंगा नदीचे पाणी आले आहे तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागला आहे.
भंडाऱ्यात पावसाने कहर केलायं. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचले आहे. जिल्ह्यात 45 गांवमार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसाचे पाणी अनेक लोकांच्या घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले असून रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहे. पाणी घरात शिरल्यामुळे अन्न धान्याचे सुध्दा नुकसान झाले आहे.
नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातून वाहणाऱ्या वेणा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. नदीचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालीयं. वेणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहेत. यामध्ये गुमगाव, वागधरा, जामठा, धानोली, कान्होली, कोथेवाडा, शिवमडका गावांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यातील येत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसडून वाहत आहे. या पावसामुळे तिरोडा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या पांजरा येथील नाल्याच्या पुरात अडकलेल्या एका जोडप्याला लाकडाच्या सहाय्याने वाचवण्यात यश मिळाले आहे. जोडप्यांना पांजरा येथील रामेश्वर चौधरी व प्रदीप मडावी यांनी लाकडाचा आधार घेऊन वाचवले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारमधील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पुर्णा नदीला मोठा पुर आलायं. पिंपरी थुगाव ते शिरजगाव कसब्याला जोडनाऱ्या पुलावरून वाहू लागल्याने संपूर्ण वाहतूक ही बंद करण्यात आलीयं. पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं.
भंडाऱ्याच्या मोहाडीत पुराच्या पाण्यात कार गेल्याची धक्कादायक घटना घडलीयं. वेळीच लोकांची मदत मिळाल्याने कार सहित 2 लोकांचे वाचले प्राण आहेत. नसीब बलवत्तर होते म्हणून कार मधील दोन्ही लोक बचावले आहेत. मात्र, कार पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.
कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा तिसरा स्वयंचलित दरवाजा आज उघडण्यात आलायं.
दुपारी 2.30 मिनिटांनी तिसरा दरवाजा उघडला आहे. सध्या 3, 5 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले आहेत. यामुळे नद्यांना पूर येण्याची दाट शक्यता असून नदी काठच्या गावांना सर्तक राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं.
वाशिम यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
रत्नागिरीमध्ये एक मोठी घटना घडलीयं. कॉस्ट गार्डने 10 मच्छीमारांचे प्राण वाचवले आहेत. खोल समुद्रात बंद पडलं होतं मच्छीमारी नोकरीचे इंजिन. रायगड जवळच्या मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ ही घटना घडलीयं. खलाशी आणि लवकर तांडेलना हेलिकॉप्टरक्या साह्याने केलं रेस्क्यू करण्यात आले.
मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत 24 तासात 124 मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सकाळी 2.30 ते 8.30 या सहा तासात 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलायं. आज मुंबईमधील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलीयं.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून 5-6 किमी अंतरावर 50 लोकं पुराच्या पाण्यात अडकले, काही जनावरंही अडकले. पण 12 तास लोटूनंही रेस्क्यू ॲापरेशन राबवलं नाही. अशी स्थिती आहे राज्याच्या उपराजधानीतली. आता या सर्व घटनेनंतर प्रशासनावर टिका होताना दिसते आहे.
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र तेलंगणावरील पोडसा पुल पाण्याखाली गेलायं. यामुळे महाराष्ट्र-तेलंगणाचा संपर्क तुटलायं. चंद्रपूर-गडचिरोली जिल्हाला जोडणारा आष्टी पुल पाण्याखाली गेल्याने मार्गावरील वाहतुक बंद झालीयं. भोयगाव – धानोरा , वरोरा – वणी मार्ग ठप्प झालायं. राजुरा – बल्लारपूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीयं.
दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले 22 पर्यटक मुसळधार पावसामुळे अडकून पडले होते. अचानक पाणी वाढल्यानेअडकून पडले होते. काल मध्यरात्री 22 पर्यटकांचे करण्यात आले रेस्क्यू. मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पर्यटकांना करण्यात आले रेस्क्यू स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक ट्रेकर्स आणि पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री करण्यात आल रेस्क्यू ऑपरेशन
कोल्हापूर जिल्हात मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे जिल्हातील सर्वच नद्यांना जवळपास पूर स्थिती निर्माण झालीयं. गगनबावडा रोडवर कुंभी नदीच्या पुराचे पाणी आल्याने मोठी तारांबळ उडालीयं. लोंघे गावाजवळच्या रस्त्यावर पाणी हे नदीचे पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झालीयं.
नागपूर शेजारी विहीरगाव परिसरात पुराचं पाणी शिरलंय. यामुळे रात्रीपासून 50 पेक्षा जास्त नागरीक अडकले असून यांचं रेस्क्यू ॲापरेशन राबवणं गरजेचं आहे. याच पुराच्या पाण्यात तीन गाई अडकल्या असल्याची माहिती देखील मिळते आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिली आहे. वर्धा नदीवरील वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील मोठी धरणे ओसंडून वाहत आहेत.
दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरच्या गोसेखुर्द धरणातुन विसर्ग सुरू आहे.
परिणामी जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत झालीये वाढ झालीयं. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची दारे देखील उघडली गेल्याने शहराच्या सखल भागात शिरले आहे.
आळंदीचे वारकरी आज राष्ट्रपतींना भेटणार
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना देणार विठ्ठलाची मुर्ती भेट
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे घडवून आणणार भेट
12 वाजता राष्ट्रपती भवनात भेटणार राष्ट्रपतींना
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला आहे. जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. इतकेच नाही तर रस्त्यांवरही गुडघाभर पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. मुसळदार पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहे.
मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातल्या भोर आणि वेल्हा तालुक्यातल्या घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडतोय. भोर तालुक्यातील वरंधघाट, शिरगाव परिसरात सर्वाधिक 337 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झालीय. त्यामुळे नीरा नदी, तालुक्यातले ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. हवामान खात्यानं आणखीन दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे .त्यामुळं भोर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.