Maharashtra Political Crisis : आताच्या घडीची मोठी बातमी, पॉवर गेममध्ये पुतण्याची काकांवर मात

| Updated on: Jul 05, 2023 | 9:11 AM

Maharashtra Political Crisis : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. त्याआधी एक महत्वाची बातमी आहे. पॉवर गेममध्ये अजित पवार बाजी मारणार असं दिसतय. कारण अजित पवारांना किती आमदारांच समर्थन आहे, ते समोर आलय.

Maharashtra Political Crisis : आताच्या घडीची मोठी बातमी, पॉवर गेममध्ये पुतण्याची काकांवर मात
Maharashtra NCP Political crisis
Follow us on

मुंबई : तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना राजकीय धक्का दिला. अजित पवार यांनी काका शरद पवार यांची राजकीय विचारधारासोडून शिवेसना-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील हेवीवेट नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते.

या राजकीय बंडाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी पक्ष संघटनेवर आपला दावा सांगितला. शरद पवार यांनी कराडचा दौरा करुन आपली राजकीय ताकद दाखवून दिली. त्याच दिवशी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड केली.

शरद पवारांसोबत आमदार असल्याच चित्र होतं

अजित पवार यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवलं. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी नियुक्त्या सुरु झाल्या. शरद पवारांसोबत आमदार असल्याच चित्र दिसत होतं. पक्ष संघटनेवर पकड मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते.

मेळाव्यांआधी एक महत्वाची बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आज मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. अजित पवार यांच्या गटाचा मेळावा बॅण्ड्रा एमआयटी येथे होणार आहे तर शरद पवार गटाचा मेळाला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांआधी एक महत्वाची बातमी आहे.

टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती

अजित पवार यांच्याकडे तब्बल 44 आमदारांच समर्थन असल्याची महत्वाची माहिती आहे. टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या 42 आणि विधान परिषेदच्या 2 आमदारांच समर्थन आहे.

अजित पवार यांची मोठी खेळी

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. याचा अर्थ शरद पवार यांच्या गटाकडे फक्त 12 आमदारांच समर्थन उरलं आहे. महत्वाच म्हणजे अजित पवार यांनी फक्त पत्रावर आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या नाहीत. त्यांनी आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेतलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाने नेमलेले प्रतोद अनिल पाटील यांचा व्हीप या आमदारांना लागू होतो. हा व्हीप मोडल्यास आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.