मोठी बातमी समोर आली आहे. मंगलप्रभात लोढा दादरमधील हनुमान मंदिरात दाखल झाले आहेत. लोढांकडून या हनुमान मंदिराची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच काही वेळानंतर किरीट सोमय्या आणि रवी राणा पोहचणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भिवंडीत शेतकरी बिल्डरविरोधात आंदोलन करत आहेत. भिवंडी तालुक्यातील काल्हेर कोपर येथील दोस्ती बिल्डर विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनस्थळी खासदार बाळ्या मामा हे बिल्डरच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ती आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका शेतकऱ्यांना घेतली आहे. तसेच बिल्डरांच्या बाजूने पोलीस शेतकऱ्यांवर दादागिरी करतात, असा आरोप खासदार बाळ्या मामा यांनी पोलिसांवर केला आहे.
माजी सैनिकांच्या न्याय व हक्कासाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी धरणे आंदोलन करत आहेत… 355 माजी सैनिकांची एस. जी ट्रेडिंग नावाच्या एका खाजगी कंपनीत 30 कोटी पेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केलीय…. याचा रीतसर गुन्हा दाखल असून पुणे पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या पत्नी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसल्या आहेत.
परभणीच्या एसपीवर कारवाई व्हायला हवी… परभणीच्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो… परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना… यावर निषेध व्यक्त करतो… महाराष्ट्रात हिटलरशाही चालू देणार नाही… असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण… केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर… कर्तव्यात कसूर केल्याचा देशमुख कुटुंबाचा होता आरोप… पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या निलंबनानंतर महाजन सक्तीच्या रजेवर…
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे… आडवाणी यांना गेल्या ५ महिन्यांत चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं… डॉक्टरांकडून आडवाणी यांच्यावर उपचार सुरू
“मंत्री मंडळाचा विस्तार कधी होईल हे देव जाणे, म्हणण्यापेक्षा मोदी आणि शाह जाणे. जनतेसाठी महविकास आघाडीचा लढा सुरूच राहील. मासाजोग सरपंच हत्याकांडात सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत. स्फोट नक्की होईल, महाविकास आघाडी स्फोट करेल नागपूर अधिवेशनात, ते तेव्हाच कळेल” असं अंबादास दानवे म्हणाले.
“नव्याने पक्ष बांधणीची गरज आहे. भाजपची कुठलीही लाट नसताना काँग्रेसचे केवळ 16 आमदार निवडून आले” असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
“सरपंच संतोष पाटील यांच्या हत्येचा मी निषेध व्यक्त करते. ही दुर्देवी घटना घडायला नको होती. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी. देशमुख हत्या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी राजकारण विरहित मागणी केली पाहिजे. पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे” असं खासदार रजनी पाटील म्हणाल्या.
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या नगरीत दत्तजयंतीनिमित्त भक्तांची मांदियाळी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रातून हजारो भाविक दाखल. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वर्षानुवर्षे आम्ही इथे येतो, स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आम्हाला ऊर्जा मिळते. आमच्या सर्व मनोकामना स्वामी समर्थ पूर्ण करतात. आम्ही वर्षानुवर्षे अक्कलकोटला येतोय, दत्तजयंतीनिमित्त स्वामींचे दर्शन घेतल्याने आनंद झाला. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पहाटेपासून रांगेत थांबलो होतो, आता दर्शन झाले आनंद झाला अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली.
दिपक केसरकर, तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. काल 5 तास थांबूनही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना निराश होऊन परतावे लागले. या दोघांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
केज तालुका अध्यक्ष पदावरून विष्णू चाटे यांची हकालपट्टी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेंमार्फत खंडणी मागितल्याचा होता आरोप. या प्रकरणी गुन्हा दखल झाल्यानंतर चाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने विष्णू चाटे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली.
इगतपुरी शहरात दत्तजयंतीचा उत्साह, खालची पेठ येथील दत्तमंदिरापासून भव्य शोभा यात्रेला सुरुवात.
जोगेश्वरी येथील कानिफनाथ मंदिरापर्यंत जाणार शोभायात्रा. महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले हजारो भक्त मिरवणुकीत दाखल झाले आहेत.
महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीत पोहोचली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतूनच मंत्र्याच्या खाटेवाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. कोणाला, कोणतं खातं मिळणार, कोण मंत्री होणार आणि कोणाला डच्चू मिळणार हे दिल्लीत ठरणार असून सर्वांचंच त्याकडे लक्ष लागलं आहे.
जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळणी, देवठाण, उस्वद यासह आसपासच्या परिसरात मागील काही दिवसापासून अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक केल्याचा प्रकार समोर येत आहे. विशेष म्हणजे हिरवी, डेरेदार मोठी झाडे भरदिवसा तोडून त्यांची खुलेआम पणे ट्रॅक्टरमधून वाहतूक सुरू आहे.
पण या संपूर्ण प्रकाराकडे वनविभागाच्या अधिकाऱ्याचं आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येतंय.
भाजपला बाळासाहेबांनी हिंदुत्व शिकवलं. भाजप म्हणजे हिंदुत्वाचे बाप बनले आहेत का? अजित पवार हे स्वत: गडबडलेले आहे. तिन्ही पक्ष एकमेकांच्या फाईल समोर आणणार आहेत. मला राज्याची चिंता आहे. राज्याचे काय होणार याची मला चिंता – संजय राऊत
दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस बजावणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकालगत असलेल्या या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज भेट देणार आहेत. आज संध्याकाळी 4.30 वाजता मंदिरात येऊन आदित्य ठाकरे हनुमानाचे दर्शन घेणार आहेत.
कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यावर हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. तेरवाड बंधारा परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नदीचं पाणी देखील काळ झालं आहे. पंचगंगा नदी काठावरील अनेक गावांमध्ये कावीळची साथ पसरली आहे. तसेच शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदी काठावरील गावातील लोकांचं आणि जनावरांचा आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या चार दिवसापासून मासे मृत होत असताना देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
रत्नागिरी- जेएसडब्ल्यू वायू गळती प्रकरणात जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. जेएसडब्ल्यू पोर्टच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली होती. जयगड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेंटेनन्सचे काम करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकाराला कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रांग लागली आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरात धार्मिक विधी आणि महाअभिषेक सुरु आहे. तसेच कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेलं दृश्य वाडीतील दत्तमंदिर हे दत्त भक्तांचे आहे प्रमुख श्रद्धास्थान आहे.
इगतपुरी : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होताना दिसत आहे. कुठे थंडीचा जोर आहे, तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचे जाणवत आहे. मागील आठवडाभरापासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या इगतपुरी तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात थंडीचा जोर वाढत असून हवेत गोठवणारा गारवा निर्माण झाला आहे. यामुळे तालुक्यात सर्वत्र थंडीचा कडाका दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्याकरिता नागरिक ठिकठिकाणी शेकोटीचा आधार घेत आहेत
राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत रब्बी हंगामात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४१ लाखांपर्यत पोहोचली आहे. यातून 29 लाख 40 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारला १ हजार १२९ कोटी रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे. या योजनेत गहू,हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी सहभागाची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे. उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठीच्या सहभागाची मुदत ३१ मार्च आहे.
पुणे शहरातील कोंढवा, येरवडा आणि शिवाजीनगर भागात शुक्रवारी दुपारी चार ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. कोंढवा परिसरातील येवलेवाडीत सोफानिर्मिती करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला.
पुणे शहरातील १०५ बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची नोटीस देऊन कामे थांबविण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरात बांधकामे करत असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०५ बांधकाम प्रकल्पांची कामे महापालिकेने थांबविली आहेत. यामध्ये अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या तसेच काही नामांकित शिक्षण संस्थांच्या बांधकाम प्रकल्पांचाही समावेश आहे.
नांदेडमध्ये ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांच्या अपहरणाची घटना घडली होती. अपहरण झाल्यानंतर काही तासात कोडगीरे यांना सोडून देण्यात आले. नांदेड शहरातील चंदासिंग कॉर्नर येथून पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील नायक आणी त्यांच्या टीमने कोडगीरे यांना ताब्यात घेऊन इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्यानंतर फिर्यादी कोडगीरे यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे. ज्या लोकांनी अपहरण केलं होतं त्यांनी राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली, तसेच प्रॉपर्टीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद कर अशा प्रकारची धमकी देल्याची तक्रार कोडगीरे यांनी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी नागपुरात होणार आहे. 35 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 43 मंत्रिपदांपैकी भाजप स्वत:कडे 21 मंत्रिपदं ठेवणार असल्याचं कळतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळू शकतात.
महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होताना दिसत आहे. कुठे थंडीचा जोर आहे, तर कुठे ढगाळ वातवरण असल्याचे जाणवत आहे. मागील आठवडाभरापासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतली आहे. मुंबईत सकाळच्यावेळी हवेत मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत आहे. दरम्यान बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 43 मंत्रिपदांपैकी भाजप स्वत:कडे 21 मंत्रिपदं ठेवणार असल्याचं कळतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळू शकतात. कल्याणमध्ये बनावट नोटांच्या व्यवहाराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कल्याण पूर्वेतील सारस्वत बँकेत 500 रुपयांच्या 45 बनावट नोटा भरण्याचा प्रयत्न झाला. रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.