Maharashtra New CM Government Formation LIVE : एकनाथ शिंदे साताऱ्याहून ठाण्यात दाखल

| Updated on: Dec 03, 2024 | 8:23 AM

Maharashtra New CM Government Formation LIVE : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांची बैठक आज रात्री होणार असल्याची चर्चा आहे. याबाबतचे ताजे अपडेट्स...

Maharashtra New CM Government Formation LIVE : एकनाथ शिंदे साताऱ्याहून ठाण्यात दाखल
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशात एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगावात आहेत. तिथून ते मुंबईत आज येणार आहेत. त्यानंतर ते काही महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर महयुतीचीदेखील महत्वाची बैठक होणार आहे. राज्यातील विविध शहरात कमी तापमानाची नोंद होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा प्रथमच तापमानाचा पारा 10.6 अंश सेल्सिअस पर्यंतखाली घसरला आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. धुळ्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. 6.1 अंश जिल्ह्याचे तापमान आहे. यंदाच्या हंगामात सर्वात कमी तापमानाची आज नोंद झाली आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Dec 2024 04:50 PM (IST)

    एकनाथ शिंदे साताऱ्याहून ठाण्यात दाखल

    काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याहून ठाण्यात दाखल झाले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी दरे येथे होते. त्यानतंर आता पु्न्हा एकदा शिंदे ठाण्यात आले आहेत.

     

  • 01 Dec 2024 04:05 PM (IST)

    शिंदे सेनेचे आमदार आमश्या पाडवी यांचा विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

    नंदुरबारमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सेनेचे आमदार आमश्या पाडवी यांचा विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. महिलेच्या विनयभंग मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी आदिवासी समाजात प्रचंड संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात मोलगी गावात निषेध मोर्चा काढण्यात आला. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. यावेळेस आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


  • 01 Dec 2024 03:42 PM (IST)

    जालन्यात आल्याच्या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

    जालन्याच्या भोकरदन मधील धावडा,वालसावंगी आणि पिंपळगाव सह आसपासच्या परिसरात आल्याच्या पिकावर बदलत्या वातावरणामुळे करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

  • 01 Dec 2024 03:35 PM (IST)

    शिंदे गटाच्या नेत्यावर सांगलीत हल्ला

    सांगलीतील मिरजेत शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा युवा समन्वयक मतीन काझी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

     

  • 01 Dec 2024 03:25 PM (IST)

    मुख्यमंत्री कोण याचा निर्णय मोदी आणि शाह घेतील – एकनाथ शिंदे

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय मोदी आणि शाह घेतील असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सातारा येथील दरे गावातून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

  • 01 Dec 2024 03:20 PM (IST)

    नाफेडकडून सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात झाली

    जालन्यात नाफेडकडून सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात झाली असून  एकूण 9 खरेदी केंद्रावर 10 हजार क्विंटल पेक्षा अधिक सोयाबीनची  खरेदी झाली आहे.

  • 01 Dec 2024 02:59 PM (IST)

    काही ठिकाणी कमी पडलो मान्य करावे लागेल – अंबादास दानवे

    शिवसैनिक विधानसभेला चांगल्या पद्धतीने लढली आहे, आणि शिवसेनेने सर्व ठिकाणी ताकतीने मतदान घेतले आहे, पैठण मध्ये मागच्या विधानसभेपेक्षा 30 ते 35 हजार मतदान जास्त पडले आहे. आम्ही काही ठिकाणी कमी पडलो हे मान्य करावे लागेल शिवसैनिकांच्या जिद्दीच्या बळावर आम्ही एवढी मते मिळवली, परंतु ज्या ज्या कमतरता राहिल्या आहेत, त्यामध्ये आम्ही सुधार करू असे अंबादास दानवे म्हणाले.

  • 01 Dec 2024 02:50 PM (IST)

    फडणवीस सरकारच्या शपथविधीला पंतप्रधानांची हजेरी

    देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे बडे नेते उपस्थित असतील. या शपथविधीला संत-महंत पण हजेरी लावणार आहेत.

  • 01 Dec 2024 02:40 PM (IST)

    रक्ताने पत्र लिहिण्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही-रावसाहेब दानवे

    सगळं ठरल्याप्रमाणेच होणार आहे. प्रसंग, वेळ पाहून आम्ही सगळं करत असतो वेळही ठरवली आहे तारीखही ठरवली आहे. जो कोणी आमचा नेता निवडला जाईल तो आमचा मुख्यमंत्री असेल. सगळं ठरलं आहे बॉसचा शिक्का झाला की सगळं समजेल. कार्यकर्त्याप्रमाणे अनेक गोष्टी करत असतात त्याला आमची मान्यता नसते. रक्ताने पत्र लिहिण्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही, असा टोला भाजपचे रावसाहेब दानवे यांनी लगावला.

  • 01 Dec 2024 02:30 PM (IST)

    पैशांचा वारेमाप वापर- बाबा आढाव

    मी उपोषण केलंय. मी 1952 सालापासून निवडणुका पाहतोय. मी येवढा पैश्याचा वापर कधी पहिला नाही माला हे अजब वाटत. अदानींना अमेरिकेतली कोर्टात पकड वॉरंट काढलं आहे. निवडणुकीतील तांत्रिक दोष हा माझ्यासाठी गौण आहे. पण परिकीय हस्तक्षेप झालाय का नाही? मोदी कित्येक दिवस पत्रकारांसोबत बोलायला देखील तयार नाहीत. सरकारने एकदा आयोग नेमला पाहिजे आणि तपास केला पाहिजे. परकीय हस्तक्षेप आतापर्यंतच्या निवडणुकीत कधी झालाय का? हे सरकार मस्तावले आहे. हे धोकादायक आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी केले आहे.

  • 01 Dec 2024 02:20 PM (IST)

    ठाकरे फुटले नसते तर आता सर्वाधिक बहुमत – रावसाहेब दानवे

    ठाकरे त्यावेळी फुटले नसते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं, असे मत रावसाहेब दानवे यांन व्यक्त केले आहे.

  • 01 Dec 2024 02:10 PM (IST)

    जे निकाल लागले आहेत ते अनपेक्षित – पृथ्वीराज चव्हाण

    जे निकाल लागले आहेत ते अनपेक्षित होते. मी जवळ जवळ 7 सार्वत्रिक निवडणुका लढलो आहे. कार्यकर्ताना अंदाज येत असतो, असे ते म्हणाले. लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. बाबा आढाव यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी मुंबईहून येथे आल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

  • 01 Dec 2024 02:00 PM (IST)

    प्रत्येक दाम्पत्याला किमान तीन मुलं हवीत-मोहन भागवत

    प्रत्येक दाम्पत्याला तीन मुलं व्हायला हवी. 2.1 च्या खाली हे प्रमाण नको, असे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक  मोहन भागवत यांनी विधान केले आहे.

  • 01 Dec 2024 01:55 PM (IST)

    बुलढाणा शिवसेनेतील मतभेद समोर

    विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यात बुलढाणा मतदार संघातून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा अवघ्या 800 मतांनी विजय झाला. मात्र हा काठावरील विजय त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसत आहे. त्यांनी आपल्याच पक्षातील नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना माझ्याशी त्यांनी गद्दारी केल्याचे म्हटले आहे.

  • 01 Dec 2024 01:48 PM (IST)

    एकनाथ शिंदे दरे गावातून निघणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात साताऱ्यातील दरे गावातून निघणार आहे. त्यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर गावात दाखल झाले आहे. संध्याकाळी होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत.

  • 01 Dec 2024 01:37 PM (IST)

    जळगावात तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी संपवले जीवन

    जळगावात दीड महिन्याच्या अंतरात एकामागून एक तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तिघेही मयत अल्पवयीन विद्यार्थी एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येच्या या घटनांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

  • 01 Dec 2024 01:13 PM (IST)

    भाव नसल्याने कापूस पडून

    जालना जिल्ह्यातील कापसाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोकरदन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने आपला कापूस घरातच ठेवला आहे. खरीप हंगामात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केली होती. मात्र भावात अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात वेचणी झालेला शेकडो क्विंटल कापूस तसाच पडून आहे.

  • 01 Dec 2024 01:13 PM (IST)

    पुण्यात थंडीची लाट

    पुणे शहरात कडाक्याची थंडी सुरु आहे. या थंडीमुळे कात्रज प्राणी संग्रहालयातील वन्यजीवन गारठले आहे. वन्यजीवांना हिटर, हिट लॅम्प, ब्लॅंकेट, सुक्या गवताचा आधार दिला जात आहे.

  • 01 Dec 2024 01:04 PM (IST)

    दानवे यांच्यासाठी मोदी-शहांना पत्र

    राज्यात मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मात्र दुसरीकडे जालन्यातील एका तरुण कार्यकर्त्यांने भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, अशी मागणी केलीय. कृष्णा गायके असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

  • 01 Dec 2024 12:50 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनाचा हंगाम तेजीत

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनाचा हंगाम तेजीत सुरू आहे. डिसेंबर- जानेवारी नववर्षानिमित्त ताडोबा गाभा क्षेत्रसह बफर भागातही पर्यटकांची गर्दी होत आहे. बफरक्षेत्रात सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे पर्यटकांची बफर क्षेत्रालाही मोठी पसंती मिळत आहे.

  • 01 Dec 2024 12:40 PM (IST)

    पुण्यात थंडीची लाट… कात्रज प्राणी संग्रहालयातील वन्यजीवन गारठलं

    पुण्यात थंडीची लाट असून कात्रज प्राणी संग्रहालयातील वन्यजीवन गारठलंय. वन्यजीवांना हिटर, हिट लॅम्प, ब्लॅंकेट, सुक्या गवताचा आधार देण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीपासून कात्रज प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात वाघ, सिंह यांच्यासाठी हिटर बसण्यासाठी लाकडी पाठाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मगर, सुसर आणि कासवासाठी हिटलॅम्प, ब्लॅंकेटची व्यवस्था करण्यात आली आहे. हरण, काळवीट, गव्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी सुक्या गवताची चादर तयार करण्यात आली आहे.

  • 01 Dec 2024 12:30 PM (IST)

    आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची दिल्लीत लाॅबिंग सुरू

    आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची दिल्लीत लाॅबिंग सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नरहरी झिरवळ यांच्या पाठोपाठ धर्मराव बाबा अत्रामही दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्टींची ते भेट घेणार आहेत. राज्यात आदिवासी मंत्रालय आपल्यालाच मिळावं यासाठी दोन्ही नेते आग्रही आहेत.

  • 01 Dec 2024 12:20 PM (IST)

    राऊतांनी फिरवलेल्या लिंबूचा उतारा करण्यासाठी शिंदे दरेवारी- संजय शिरसाट

    “राज्यात चांगलं काम व्हावं यासाठी खात्यांवरती आम्ही दावा केलेला आहे. संजय राऊत आणि त्यांच्या पक्षांनी आमच्यावर जो लिंबू फिरवला होता, त्याचा उतारा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी गेले आहेत. शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान करणं हे एकच काम संजय राऊत यांना आहे. त्यांच्यामुळेच शिवसेना ठाकरे पक्ष संपला,” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

  • 01 Dec 2024 12:10 PM (IST)

    पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे- संजय शिरसाट

    “आज दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये दाखल होत आहे. त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल. उद्या दुपारपर्यंत कोणती खाती कुणाला मिळतील यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 01 Dec 2024 11:54 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस

    देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केला आहे. यावेळी त्यांनी फोन करुन एकनाथ शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदेंमध्ये इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

  • 01 Dec 2024 11:32 AM (IST)

    रवी राणा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा सुरु

    रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणीस यांच्या सागर निवासस्थानी रवी राणा हे पोहोचले आहेत. त्यांची बंद दाराआड काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरु आहे.

  • 01 Dec 2024 11:31 AM (IST)

    संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, फेर मतमोजणीवर चर्चा करणार

    शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरवर संजय राऊतांनी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी ते फेरमतमोजणीवर चर्चा करणार आहेत.

  • 01 Dec 2024 11:28 AM (IST)

    बुलढाण्यात फटाके फोडण्यावरुन वाद, पोलिसांकडून शांततेचे आवाहन, 33 जणांवर गुन्हा दाखल

    बुलढाण्यात काल रात्री धाड या गावी एका मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्यावरून उद्भवलेल्या वादातून प्रचंड दगडफेक व वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीसांनी 33 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. सध्या धाड या गावात तणाव पूर्ण शांतता असून पोलीसांचा मोठा बंदोबस्त गावात पाहायला मिळत आहे. सध्या पोलिसांकडून दंगेखोरांची धरपकड सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

  • 01 Dec 2024 11:19 AM (IST)

    रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा, जालन्यातील तरुणाची मागणी

    राज्यात मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. तर दुसरीकडे जालन्यातील एका तरुण कार्यकर्त्यांना भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. कृष्णा गायके असे या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याने स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. दरम्यान रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत विविध पदे भूषविली असून तळागळातल्या लोकांशी त्यांचा जणसंपर्क असल्याचही या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.

  • 01 Dec 2024 10:59 AM (IST)

    Maharashtra News: शेतात काढून ठेवलेल्या नवीन लाल कांद्यातून पाच क्विंटल कांद्याची चोरी…

    येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील कांदा चोरीची घटना… कांद्याचे दर चढे असल्यामुळे चोरट्यांचा कांद्यावर डल्ला… शेतकऱ्यांचे 25 ते 30 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान… चोरट्याला पकडून कडक कारवाई करण्याची शेतकऱ्यांची पोलिसांकडे मागणी…

  • 01 Dec 2024 10:47 AM (IST)

    Maharashtra News: दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्वर मेडल प्राप्त

    सोलापूरची कराटे खेळाडू आर्या यादव हिने कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले आहे… दक्षिण आफ्रिकेमध्ये अकराव्या कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे… या स्पर्धेमध्ये 39 देशांचा समावेश असून यात भारताकडून 53 किलो वजनापर्यंत असलेल्या स्पर्धकांमध्ये आर्या यादव हिने घवघवीत यश प्राप्त केले आहे… या यशामुळे आर्याने देशाची मान उंचावली आहे…

  • 01 Dec 2024 10:35 AM (IST)

    Maharashtra News: कडाक्याचे थंडीने भाजीपाल्याचे भाव कडाडलेत

    पौष्टिक मानल्या जाणाऱ्या शेवग्याचे दर गगनाला भिडले आहेत… शेवग्याच्या दराने चिकनला देखील मागे टाकलं आहे. पिंपरी-चिंचवडच्या भाजी मंडईत शेवग्याचे दर प्रति किलो 400 ते 450, वाटाणा 100 ते 120 आणि मिर्ची 50 ते 60 रुपये प्रति किलो झाली आहे…

  • 01 Dec 2024 10:18 AM (IST)

    Maharashtra News: मंत्र्यांनाही भेटत नाहीत, शिंदेंची प्रकृती किती नाजूक आहे बघा – संजय राऊत

    मंत्र्यांनाही भेटत नाहीत, शिंदेंची प्रकृती किती नाजूक आहे बघा… शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 01 Dec 2024 10:12 AM (IST)

    Maharashtra News: चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करुन देशात आग लावली – संजय राऊत

    चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करुन देशात आग लावली… घटमाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाचं संरक्षण… राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य… निकाल लागून 10 दिवस, अजून सरकार स्थापनेचा दावा नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 01 Dec 2024 09:57 AM (IST)

    मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर

    विधानसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पहिल्यांदा धाराशिव दौऱ्यावर येत आहेत. जरांगे पाटील आज दुपारी तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचे दर्शन घेवून पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी जाणार आहेत. दरम्यान धाराशिवमध्ये मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव ते तुळजापूर अशी बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

  • 01 Dec 2024 09:45 AM (IST)

    मनसेचा ईव्हीएमविरोधात ठराव

    मनसेच्या बैठकीत ईव्हीएमविरोधात ठराव करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जबाबदारीचे लवकरच वाटप होणार आहे. ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील सर्व निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निराशा झटकून पुन्हा कामाला लागण्याच्या नेत्यांनी सूचना दिल्यात.

  • 01 Dec 2024 09:30 AM (IST)

    सोलापूरच्या आर्याचं घवघवीत यश

    दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्वर मेडल प्राप्त झालं आहे. सोलापूरची कराटे खेळाडू आर्या यादव हिने कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये अकराव्या कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 39 देशांचा समावेश आहे. यात भारताकडून 53 किलो वजनापर्यंत असलेल्या स्पर्धकांमध्ये आर्या यादव हिने घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशामुळे आर्याने देशाची मान उंचावली आहे.

  • 01 Dec 2024 09:30 AM (IST)

    एकनाथ शिंदे आज पुन्हा मुंबईमध्ये परतणार

    दोन दिवस दरेगावमध्ये आराम करायला गेलेले महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा मुंबईमध्ये परतणार आहेत. मुंबईत परतल्यानंतर काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पदाबाबत राज्यात आज संध्याकाळी महायुतीची महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 01 Dec 2024 09:15 AM (IST)

    धुळ्यात तापमानाचा पारा घसरला

    धुळ्यात तापमानाचा पारा घसरला आहे.  6.1 अंश जिल्ह्याचे तापमान आहे. यंदाच्या हंगामात सर्वात कमी तापमानाची आज नोंद झाली आहे. तापमान कमी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पहाटे पांझरा नदी किनारी फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. थंडी वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहेत. वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. वाळलेल्या थंडीमुळे वृद्धांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचा आवाहन करण्यात आलं आहे.