Maharashtra Breaking News LIVE : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू

| Updated on: Dec 12, 2024 | 9:40 PM

Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्रात मागच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याची चर्चा आहे. आज महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातील सर्व अपडेट्स आणि क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या....

Maharashtra Breaking News LIVE : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीतल्या घराबाहेर शुभेच्छांचे पोस्टर्स लागले आहेत. दिल्लीसह राज्यातल्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवार यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. बैठकीच्या निमित्ताने अजित पवार आणि सुनेत्रा पवारही दिल्लीतच आहेत. अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देणार का? याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. भारतीय राजकारणातील चाणक्य, शेतकरी नेते, विकास पुरुष असा शरद पवार यांचा पोस्टर्सवर उल्लेख आहे. आज अनेक नेते पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येणार. खड्ड्यांना कारणीभूत ठरणाऱ्या 18 ठेकेदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई. महापालिकेकडून ठेकेदारांना खड्ड्याबाबत कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या आहेत. न्यायालयाने कान टोचल्यानंतर महापालिकेने पावलं उचलली. शहरातील रस्त्यांवर अल्पावधीतच खड्डे पडल्याने जनहित याचिका करण्यात आली होती. महापालिकेला खड्डे बुजवल्याचा अहवाल सादर करण्याचा निर्देश देण्यात आले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Dec 2024 04:59 PM (IST)

    जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू

    धुळ्यातून वाईट बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनीच्या तोंडात पेनाचं टोपण अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्चना खैरनार असं या सात वर्षीय मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचं नाव आहे. धुळे तालुक्यातील निमखेडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील ही घटना आहे. त्यामुळे निमखेडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 12 Dec 2024 04:43 PM (IST)

    अंबादास दानवे यांच्या प्रयत्नाला यश, व्यापारी महासंघाकडून बाजारपेठ बंदचा निर्णय मागे

    विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रयत्नाला मोठं यश आलं आहे. व्यापारी महासंघाकडून बाजारपेठ बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी घोषणा केली आहे. अंबादास दानवे यांच्या आश्वासनानंतर व्यापारी महासंघाने बाजारपेठ बंदचा निर्णय मागे घेतलाय. त्यामुळे आता परभणीची बाजारपेठ खुली होणार आहे.

  • 12 Dec 2024 04:03 PM (IST)

    अंबादास दानवे परभणीत, दगडफेक झालेल्या दुकानांची पाहणी

    परभणीमधून मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे परभणीत दाखल झाले आहेत. दानवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात घटनास्थळी दाखल झाले असून आसपासच्या परिसरात पाहणी करत आहेत. दानवेंकडून दगडफेक झालेल्या दुकानांची पाहणी करण्यात येत आहे. दानवे पाहणीनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

  • 12 Dec 2024 03:57 PM (IST)

    चार आरोपींना पोलीस कोठडी

    भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चार आरोपींना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

  • 12 Dec 2024 03:50 PM (IST)

    लाडक्या बहिणीसाठी हिवाळी अधिवेशनात खास व्यवस्था

    नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लाडक्या बहिणी असलेल्या महिला आमदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. आमदार निवासमधील दुसरा माळा महिला आमदारांसाठी राखीव असणार आहे, अशी माहिती अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहेर यांनी दिली.

  • 12 Dec 2024 03:40 PM (IST)

    मंठा परभणी महामार्गा दरम्यान एसटीच्या 40 फेऱ्या रद्द

    जालन्याच्या मंठा शहरात दुपारनंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. आंबेडकरी संघटनेने बंद पुकारून निषेध मोर्चा काढला होता. परभणी येथील घटनेचा एस टी महामंडळाच्या बस सेवेवर परिणाम झाला होता. दुपारपर्यंत मंठा परभणी महामार्गा दरम्यान एसटीच्या 40 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. दुपारनंतर काही प्रमाणात बस सेवा सुरू झाली.

  • 12 Dec 2024 03:30 PM (IST)

    वाढीव वीज बिलाविरोधात ठाकरे गट आक्रमक

    वाढीव वीज बिलाविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मुंबईतील ग्राहकांची चालवलेली ही लूट थांबवण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीवर एक शिष्टमंडळ आज धडकले. अनिल परब आणि सुनील प्रभू यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.

  • 12 Dec 2024 03:20 PM (IST)

    धनंजय मुंडे यांच्यावर अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

    संतोष देशमुख यांचा हृदय द्रावक खून आहे. पोलिसांना हा खून रोखता आला असता. या प्रकरणात पोलीस देखील मिळालेले आहेत. इथे काही लोकांची दादागिरी आहे त्यामुळे पोलीस देखील काहीही करू शकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड ही मंडळी प्रशासनाला काही समजतच नाहीत. इथे हम करेसो कायदा सुरू आहे, अशी गंभीर टीका अंबादास दानवे यांनी केली.

  • 12 Dec 2024 03:10 PM (IST)

    प्रशिक्षणार्थी मानधनापासून वंचित

    मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले अनेक प्रशिक्षणार्थी तीन महिने लोटूनही मानधनापासून वंचित आहेत. प्रशिक्षणार्थींनी आक्रोश व्यक्त करत जिल्हाधिकारी व रोजगार उद्योजकता कार्यालयाला निवेदन देत घेरले.

  • 12 Dec 2024 03:00 PM (IST)

    लाडक्या बहिणीसंदर्भात अफवांवर विश्वास ठेऊ नका

    कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना कोणत्या आदेश शासन निर्णय निकष बदल विभागाने काढलेले नाही आहेत. लाडक्या बहिणी योजनेवरुन अदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली.

  • 12 Dec 2024 01:48 PM (IST)

    पुण्याच्या ससूनमध्येही वादग्रस्त वितरकाकडून औषध पुरवठा?

    बीडमधील जिल्हा रुग्णालयातील बोगस औषध प्रकरणानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात देखील त्याच डिस्ट्रीब्यूटर कडून औषध पुरवठा झाल्याचे उघडकीस आले आहे.मात्र, ससूनमधील त्या औषधांचा वापर थांबवण्यात आला आहे.

     

  • 12 Dec 2024 01:30 PM (IST)

    नाशिक विभागात एसटी अपघातात मोठी वाढ

    नाशिक विभागात एसटी महामंडळाच्या बसेसचे नऊ महिन्यांत १२० अपघात होऊन त्यात २२ जणांचा मृत्यू तर १९६ जण जखमी झाले आहेत

  • 12 Dec 2024 01:20 PM (IST)

    राजकारणात एकमेकांचा आदर करण्याची भावना – एकनाथ खडसे

    राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदरणीय सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहोत.त्यामुळे सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याचे आपली प्रथा आहे, या प्रतीनुसार अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घेतले आहेत असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

  • 12 Dec 2024 12:57 PM (IST)

    घुसखोरांना बाहेर काढा- राहुल शेवाळे यांची मागणी

    देशाचे स्थैर्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तातडीने बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा, अशी मागणी शिवसेनेचे माजी लोकसभा गटनेते आणि माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ही मागणी त्यांनी केली आहे.

  • 12 Dec 2024 12:42 PM (IST)

    कॅब चालकास मारहाण, संघटनेचे आंदोलन

    पुणे विमानतळाच्या जवळ असलेल्या एरो मॉल येथे कॅब चालकाला मारहाण करण्यात आली. काल रात्री मारहाण झालेला व्हिडीओ आता समोर आला आहे. या हल्ल्यानंतर भारतीय मिग कामगार मंचाच्या कॅब चालकांनी काम बंद आंदोलन केले आहे.

  • 12 Dec 2024 12:34 PM (IST)

    भिवंडी, अमरावतीमध्ये एनआयएचे छापे

    एनआयएने राज्यातील भिवंडी आणि अमरावती या दोन शहरांत छापा टाकून एका, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. अमरावतीमधून ताब्यात घेतलेला तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होता. त्याची कसून चौकशी सुरु केली आहे…सविस्तर वाचा…

  • 12 Dec 2024 12:23 PM (IST)

    फडणवीस, मोदी यांच्यात चर्चा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना सांगितले की,  महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला गतीशील ठेवणे गरजेचे आहे. केंद्र सरकार त्यासाठी पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहे.

  • 12 Dec 2024 12:20 PM (IST)

    काळमवाडी धरणाची गळती काढणार

    कोल्हापुरातील काळमवाडी धरणाची गळती काढण्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. धरणाच्या गळती काढण्याचे काम जानेवारी महिन्यापासून केले जाणार आहे. गळती काढण्याचे काम मिळालेल्या ठेकेदार कंपनीकडून तयारीला सुरवात झाली आहे.

  • 12 Dec 2024 12:05 PM (IST)

    शिवसेना उबाठाचे आंदोलन

    अदानी कंपनीच्या नवीन विद्युत मीटरच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंधेरी एमआयडीसी अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. शिवसेनेचे अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले.

  • 12 Dec 2024 11:50 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदींच्या भेटीला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. फडणवीस मोदींची भेट घेणार आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदेत अमित शाह यांची भेट घेतली.

  • 12 Dec 2024 11:40 AM (IST)

    साडेअकरा वाजले तरी परभणीची बाजारपेठ बंदच

    परभणी- साडेअकरा वाजले तरी परभणीची बाजारपेठ बंदच आहे. काल झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर व्यापारी आज आक्रमक होताना दिसून येत आहेत. व्यापारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी एकवटले आहेत. मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी शिवाजी चौकात जमले आहेत. शिवाजी चौक येथून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी व्यापारी जातील.

  • 12 Dec 2024 11:30 AM (IST)

    कोल्हापूर- पंचगंगा नदी प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप

    कोल्हापूर- पंचगंगा नदी प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मृत माशांचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेराव घालत जाब विचारला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांना तेरवार बंधाऱ्यावर बसवून ठेवत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. भीमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंकुश पाटील यांना धारेवर धरलं.

  • 12 Dec 2024 11:20 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांची घेतली भेट

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. संसदेत अजित पवार आणि अमित शाह यांची भेट झाली.

  • 12 Dec 2024 11:10 AM (IST)

    “जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी होतात तेव्हा राज्यात जातीय तणाव निर्माण केला जातो”

    “जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतात तेव्हा तेव्हा राज्यात जातीय तणाव निर्माण केला जातो,” भिमा कोरेगाव, कोपर्डीतील घटना त्याची उदाहरण असल्याचं धक्कादायक विधान करत भाजपचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

  • 12 Dec 2024 10:44 AM (IST)

    महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार – सूत्रांची माहिती

    महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार येत्या 14 तारखेला होण्याची शक्यता असून  30 ते 35 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे 15 ते 15 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर शिवसेना शिंदे  गटाचे आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी 8 ते 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील असे समजते.

  • 12 Dec 2024 10:31 AM (IST)

    मंत्री मंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा राहणार

    मंत्री मंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा राहणार, गृह व अर्थ खाते भाजपकडेच राहणार.

    नगरविकास खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादीच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता आहे.

    सार्वजनिक बांधकाम खातेही सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.  एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा होणार आहे.

  • 12 Dec 2024 10:15 AM (IST)

    मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार ? अजित पवारांनी थेट तारीख सांगितली

    आज साहेबांचा वाढदिवस, त्यांना सर्वजण शुभेच्छा द्यायला येतात. मीही शुभेच्छा दिल्या, जनरल चर्चा झाली, राजकीय विषयावर नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

    येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊन शपथविधी होण्याची शक्यता आहे, अजित पवारांनी सांगितली तारीख.

  • 12 Dec 2024 09:55 AM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 12 Dec 2024 09:39 AM (IST)

    शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस, अजित पवार, सुनेत्रा पवार शुभेच्छा देण्यासाठी दाखल

    अजित पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार हे दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले आहेत.

  • 12 Dec 2024 09:35 AM (IST)

    पंचगंगा नदीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत अवस्थेत

    कोल्हापूर : पंचगंगा नदीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत अवस्थेत सापडले आहेत. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा परिसरातील ही स्थिती पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीत सांडपाणी तसेच रासायनिक्त पाणी थेट सोडल्याने पाणी दूषित झाले आहे. पंचगंगा नदीतील पाणी काळेकुट्ट, फेसाळलेले पाहायला मिळत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पंचगंगा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. वारंवार नदीतील पाणी प्रदूषित होत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे.

  • 12 Dec 2024 09:32 AM (IST)

    शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 12 Dec 2024 09:30 AM (IST)

    संजय राठोड यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महाआरती

    सोलापूर – शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावे यासाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करण्यात आली. राष्ट्रीय बंजारा परिषद, ऑल इंडिया बंजारा संघ इत्यादी संघटनेकडून ही महाआरती करण्यात आली. स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावे असे साकडे घालण्यात आले.

  • 12 Dec 2024 09:05 AM (IST)

    राज्याला अजूनही गृहमंत्री नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण हाताळणार – सुषमा अंधारे

    परभणीत कालपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचे समजते. राज्याला अजूनही गृहमंत्री लाभलेले नाहीत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी घटना घडण्याला कारणीभूत होण्याला पोलीस व्यवस्था आणि गृहखाते आहे. कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी अनुयायी पिढ्या बरबाद करण्याचा आम्ही निषेध करतो, असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.

  • 12 Dec 2024 08:52 AM (IST)

    शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी

    कोरोनाकाळापासून साई मंदिरात हार, फुलं, प्रसाद घेण्यास घालण्यात आली होती बंदी. आता साई भक्तांना मंदिरात नेता येणार फुले. ना नफा, ना तोटा दरात साई संस्थान कर्मचारी सोसायटीकडून होणार हार, फुलं प्रसादाची विक्री. आज माजी खासदार सुजय विखे पाटील, साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी, साईसंस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि शिर्डीचे प्रमुख ग्रामस्थ यांच्या हस्ते होणार फुलं, हार प्रसादाच्या स्टॉलचे उद्घाटन.

  • 12 Dec 2024 08:50 AM (IST)

    कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर ठाणे परिवहन सेवा अलर्ट मोडमध्ये

    वाहनचालकांची दररोज मद्यप्राशन केले आहे का? याची तपासणी करण्यात यावी, असे आदेश ठाणे परिवहन प्रशासनाने ठेकेदारांना काढले आहेत. मुंबईत घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वेळीच ठाणे  परिवहन सेवेने सुरक्षेची  उपायोजना योजली आहे. संबंधित चालकाला किमान दोन वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. चालकाला  कोणत्याही परिस्थितीत एका दिवसात डबल ड्युटी देऊ नये. त्याप्रमाणे नियमितपणे साप्ताहिक रजा देणे,ठेकेदाराला बंधनकारक असणार आहे

  • 12 Dec 2024 08:19 AM (IST)

    Maharashtra Cold : महाराष्ट्रात कुठे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली

    राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तर भारतातून थंड वा-याच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी पसरली आहे. राज्यात अनेक भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली पोहोचले. उत्तर महाराष्ट्रात तर तापमान 4-5 अंशावर पोहोचले होते. देशातील उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. राज्यात धुळ्यासह निफाड, गोंदिया, नागपूर, वर्धा येथील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढत आहे.

  • 12 Dec 2024 08:10 AM (IST)

    Sharad Pawar Birthday : अजित पवार आज शरद पवारांना शुभेच्छा देणार का?

    महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. बैठकीच्या निमित्ताने अजित पवार आणि सुनेत्रा पवारही दिल्लीतच आहेत. अजित पवार आज शरद पवारांना शुभेच्छा देणार का? याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

     

  • 12 Dec 2024 08:01 AM (IST)

    Maharashtra Govt : ठरलं, ‘या’ तारखेला होऊ शकतो राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

    राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत काल झालेल्या बैठकीत मंत्रिपदांच्या नावांवर शिक्कामोर्तब. दुपारनंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार मुंबईला रवाना होणार आहेत. आज रात्री फडणवीस, शिंदे, पवार यांच्यात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजपचे जवळपास 20 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती.