मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यांच्यासह 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणातील समीकरणे बदलली आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाने काल मोठं शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली आहे. यावेळी अजित पवार यांच्याकडे सर्वाधिक आमदार उपस्थित होते. तर शरद पवार यांच्याकडे कमी आमदार होते. त्यामुळे सध्या तरी अजित पवार गटाचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.
विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटाचे नेते प्रथमच समोरासमोर येत आहे. अजित पवार आणि जयंत पाटील समोरासमोर येणार आहे. पावसाळी अधिवेशासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शिर्डीला साई बाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मंदिराच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आतापासूनच तैनात करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के बसले आहेत. हिमाचलच्या लाहौल स्पिती जिल्ह्यात हा भूकंप झाला आणि त्याची तीव्रता 3.7 इतकी होती. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.
शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यातील भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधान आलं आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर राहुल गांधींच्या भेटीने आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
कोविड काळात घोटाळा झाला आहे तर पीएम फंडचाही घोटाळा बाहेर काढा. कोविड काळात केलेल्या कामाचं कौतुक करता येत नसेल तर बदनामी तरी करू नका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
माणूस म्हणून ओळख महत्त्वाची, आता विरोधात बोलूच दिलं जात नाही. माझ्याकडे मुख्यमंत्रीपद असताना मला प्रशासनाचा काही अनुभव नव्हता पण अनुभवी माणसं माझ्यासोबत होतीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची बैठक पार पाडली. ही बैठक पार पडल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटीला आले आहेत.
निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचेही संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीये. याबद्दल देखील बोलताना शरद पवार दिसले.
आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर दिल्लीतील बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शेवटी बैठकीमध्ये काय निर्णय झाले हे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
नव्या पक्षाच्या अध्यक्षामध्ये काहीच तथ्य नसल्याचे देखील शरद पवार यांनी स्पष्ट करत म्हटले आहे की, मीच पक्षाचा अध्यक्ष आहे. बाकी अध्यक्ष नेमल्याबद्दल मला काही कल्पना नाहीये.
पत्रकार परिषदमध्ये शरद पवार यांनी हे देखील स्पष्ट केले की, पक्षाला चांगल्या स्थितीमध्ये नेणार आहे. काही लोक पक्षाच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे.
मी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असल्याचे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी म्हटले की, कोणी कोणाची नियुक्ती केली हे महत्वाचे नाहीये. कारण मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे.
आज दिल्ली येथे एक मोठी बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावर शरद पवार यांनी स्पष्ट केली की, मी पक्षाचा अध्यक्ष आहे. पक्षविरोधी निर्णय घेतल्याने कारवाई करण्यात आली असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी पक्ष एकमताने विरोधकांसोबत राहणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे वाढती महागाई आणि बेरोजगारी याबाबत केंद्राचा निषेध करण्यात आलाय. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर मोठ्या घडामोडी या राज्यात बघायला मिळत आहेत.
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच असणार आहेत. प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. यासह 9 आमदार आणि 2 खासदार देखील निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
शिरूर लोकसभा, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेसाठी भाजप वरिष्ठाचा निर्णय अंतिम, तो आम्हाला मान्य. अजित पवार आणि आमच्यात मतभेद नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला प्रभावित होऊन अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. त्यामुळे आमच्यात मतभेद व्हायचं कारण नाही. महाविकास आघाडीने जुळवून घेतलं, तर आम्ही आता विकासाठी एकत्र येऊ. पालकमंत्री कोण होतय यापेक्षा शहराचा विकास महत्वाचा, मी आमदार असताना अजित पवार पालकमंत्री होतेच, मी काम केलंच. अजित पवार आणि आमचा एकच उद्देश आहे पिंपरी- चिंचवड शहरच सर्वांगीण विकास व्हावा.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा. राष्ट्रपती मुर्मू सिद्धीविनायक मंदीरात दाखल.
मुसळधार पावसाने रस्त्यावर झाड उन्मळून पडले. मुंबईसह अनेक भागात सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. बोरिवली पश्चिम हरिदास कंपाऊंड शिंपोली रोडवर पावसात अचानक झाड पडले. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक लोकांच्या मदतीने हे झाड रस्त्यावरून हटवण्यात आले आहे.
सुनील तटकरे, प्रफुल पटेल पक्षातून निलंबित. दिल्लीतल्या बैठकीत हा ठराव मंजूर. एकमताने ठराव मंजूर. दिल्लीच्या शरद पवारांच्या बैठकीत ठराव मंजूर.एस. आर. कोहली सुद्धा पक्षातून निलंबित. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा. थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहचतील. द्रोपदी मुर्मू घेणार सिद्धिविनायकाच दर्शन
वरळीमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक, संपादक जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोह. जवाहरलाल दर्डा यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त लोकमत समूहाकडून जवाहर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित .
अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय आहे. आगामी निवडणुकांसाठी नेत्यांच्या आदेशाचे पालन करणार. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे जेष्ठ नेते यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. बैठकीत सांगितलं की शिंदे गटातील लोकसभेच्या सदस्यांना सन्मान दिला जाईल. त्यांच्या मतदार संघात तिकीट दिले जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी ही स्पष्ट सांगितलं आहे की मावळ लोकसभेसाठी बारणेच उमेदवार असतील. निवडणुकीला सामोरे जात असताना आजचा विरोधक उद्याचा मित्र असू शकतो. हे राजकारणात चालत असत. त्याचा सामना करू
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठ गणपतीची महाआरती करण्यात आलीय. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे पदाधिकारी महाआरतीला उपस्थित
रमेश पाटील यांनी सुभाष भांबरे यांना फोन केला होता. अजित पवार यांना पक्षात का घेतलं? असा सवाल त्यांनी केला आहे. लोकसभेवर जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे तडजोडी कराव्या लागतात, असे उत्तर सुभाष भामरे यांनी पाटील यांना दिलं. अजित दादांपेक्षा देवेंद्र बाबू भारी आहेत, असे सुभाष भामरे म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दोन वेळा सविस्तर चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकी संदर्भात प्रस्ताव तयार करून द्यावा, अशी मागणी केली होती. वंचित संदर्भातील प्रस्ताव फक्त मुंबई संदर्भात आला आहे. राज्यातील इतर ठिकाणी निवडणुकी संदर्भात काय प्रस्ताव असणार हा अद्याप येणे बाकी आहे. उद्धव ठाकरे यांना अल्टीमीटर देणे योग्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी अल्टीमीटर देऊ नये सुसंवादातून हा प्रश्न सोडवावा. चांगला सुसंवाद असेल तर भविष्यामध्ये चांगलं घडू शकतं. शिंदे गटाचे आमदार मी केलेले विधान खोडून काढणार. शिवसेनेकडे परत येणाऱ्या आमदारांची संख्या वाढते आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय आहे. आगामी निवडणुकांसाठी नेत्यांच्या आदेशाचे पालन करणार. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे जेष्ठ नेते यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. बैठकीत सांगितलं की, शिंदे गटातील लोकसभेच्या सदस्यांना सन्मान दिला जाईल. त्यांच्या मतदारसंघात तिकीट दिले जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी ही स्पष्ट सांगितलं आहे की, मावळ लोकसभेसाठी बारणेच उमेदवार असतील. निवडणुकीला सामोरे जात असताना आजचा विरोधक उद्याचा मित्र असू शकतो. हे राजकारणात चालत असत. त्याचा सामना करू. शिंदे गटातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार, खासदार नाराज नाहीत. ही चर्चा मीडिया घडवून आणत आहे, असे श्रीरंग बारणे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही एकत्र होतो. त्यावेळी विचित्र परिस्थिती होती. आमचं पटायचं नाही. त्यांची माझी वैयक्तिक दुष्मनी नाही ते एक कार्यक्षम प्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय हा आंबेगाव तालुक्यातील विकास कामासाठी घेतला असेल, असे मला वाटते. आम्ही एकत्र काम करू. तालुक्यातील विकासासाठी एकत्र राहू, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटलांवर आढळराव पाटील यांनी दिली.
तेव्हाही मुख्यमंत्री आमचे होते, आताही आमचे आहेत. मात्र यामधे अमूलाग्र फरक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणारे आहेत. मागील वर्षभर त्यांनी जी ताकद दिली. आता अजित पवार हे अर्थमंत्री असोत किंवा पालकमंत्री यामधे काही फरक पडणार नाही. अजित पवार हे विकास कामासाठी निधी कमी पडून देणार नाही, असा विश्वासही शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
देशाचे सरकार आणि राज्यातील सरकार हे आश्वासक काम करतात. शाश्वत विकास काम सुरू आहे. पंतप्रधान म्हणून मोदी यांची कणखर नेतृत्वाची गरज असल्याने बऱ्याच जणांना वाटत आहे की, मोदींच्या विचाराकडे जावे. म्हणून राष्ट्रवादी काँगेस सरकारमध्ये सहभागी झाले आहे. फोडाफोडीचे राजकारण हे काही नवीन नाही आणि निदान शरद पवार यांना हे काही नवीन नाही. राष्ट्रवादी काँगेस सरकारमध्ये आल्याने बळकटी येवून विकास कामना अजून घोडदौड येईल. निवडणूक आयोगाकडे दावा करण्यात आला, त्यावर आमदारांना काही माहितीच नव्हती.
माझ्या वाचनात आलं की, 30 तारखेला सह्या करण्यात आल्या. त्यादिवशी सुप्रिया ताईंचा वाढदिवस होता, त्यांना काहींनी उपहार दिला. दादांचं काल भाषण पाहिलं. पहिल्यादा असं भाषण पाहिलं. आपल्याला वडिलाला रिटायर्ड करणं अशी भूमिका कोणताच मुलगा मांडत नसतो. दादा असं कसं म्हणू शकतात, त्यावर आमचा विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया शिवाजी आढळराव पाटील यांनी दिली.
भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत. जेव्हा महाविकास आघाडी झाली, तेव्हा छगन भुजबळ यांना पहिली शपथ दिली होती. पक्षात जी घटना आहे, त्यानुसार तरतूद होते. कुठल्याच अध्यक्षाची थेट नियुक्ती करता येत नाही. आमसभा घ्यावी लागते, ती घेऊन निवड करता येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ अजिबात गोठवलं जाणार नाही. मुख्यमंत्री एका रात्रीत नागपूरवरून मुंबईत आले. अजित पवारांनी शपथ घेतली, त्यानंतर आमदारांची अस्वस्थता वाढली. असं ऐकलं आहे की, मुख्यमंत्री पण अस्वस्थ आहेत. काही आमदारांमध्ये हमरीतुमरी झालीय असं ऐकलंय.
काही दिवसांपूर्वी काही आमदारांनी शपथ घेतली हे योग्य नाही. ज्यांनी शपथ घेतली त्यांच्यावर कारवाई व्हावी असं आम्ही पत्र अध्यक्ष यांना दिलं आहे. काल अनेक बातम्या आल्या की राष्ट्रीय अध्यक्ष बदलले आहेत पण हे असं नाही. काहींनी आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत, त्यानंतर आम्हाला फोन आले. विधिमंडळ पक्ष कधीच मूळ पक्ष नसतो. राष्ट्रवादी पक्ष 24 ठिकाणी कार्यरत आहेत. कुठल्याही प्रदेश अध्यक्ष यांची निवड होत असताना अनेक गोष्टी ग्राह्य धरल्या जातात.
बच्चू कडू नाराज नाहीत. बच्चू कडूंसोबत मुख्यमंत्री चर्चा करतील. मंत्रिपदावरुन शिवेसेनेच्या मंत्र्यांमध्ये कोणताही वाद नाही. शिवसेनेच्या आणि भाजपच्या आमदारांमध्ये राजकीय समंज्यसपणा आहे. वेळ लागेल पण मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री राजीनामा देणार ही अफवा आहे. आगामी निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार आहोत. ठाकरे गटाकडून आमची बदनामी सुरु आहे. शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या केवळ अफवा आहेत. अजित पवार मुख्यमंत्री होणार ही चर्चा खोटी आहे. विधानसभा अध्यक्ष विचारपूर्वक निर्णय घेतील.
पंकजा मुंढे यांच्या संदर्भात एक मोठं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असे पटोले म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेवर विचारलेलेल्या प्रश्नावर नाना पटोले यांनी उत्तर दिले.
लोकशाहीचा आणि विचारांचा गळा घोटण्याचे काम भाजपकडून सातत्याने केले जात असल्याचा आरोप काँग्रेस पदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजप जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी पटोले यांनी केला. भाजप विरोधी मोठा लढा निर्माण करणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला असल्याचे नाना पटोले म्हणाले.
अजित पवार यांनी सत्तेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे. खोके म्हणणारे आता ओके झाले आहेत असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला. शेवटी आलेल्यांना पहिले जेवण मिळालं असं म्हणत त्यांनी खाते वाटपावर नाराजीही व्यक्त केली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा आहे. 2014 आणि 217 मध्ये आमच्याकडून प्रस्ताव गेला होता, मात्र ठाकरे गटाकडून नकारात्मक प्रतिक्रीया आली होती अशी प्रतिक्रीया मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली आहे. अद्याप युती संदर्भात कुठलाही प्रस्ताव आमच्याकडून गेलेला नाही असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. तसेच एकत्र येण्याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असेही ते म्हणाले.
माझी संजय राऊत यांच्यासोबत झालेली भेट वैयक्तिक कारणासाठी होती, असे सांगत मनसे नेते अभिजीत पानसे यांनी युतीच्या चर्चा फेटाळल्या. युतीचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोण कोणाच्या गळ्यात हात घेऊन जात आहे तेच कळत नाही दोन दिवसापूर्वी टीका करतात आणि पुन्हा एकत्र येतात. आधी सख्खे वैरी होते ते आता भाऊ भाऊ होऊन बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
अजित पवार गटाचे नरेंद्र राणे यांची राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांनी ही नेमणूक केली आहे.
अजित पवार गटाकडून राज्यभरात नेमणुकांचं सत्र सुरू. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतदेखील शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली असून महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करत अधिकाऱ्यांचा निषेध केला.
शहरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न आहे, मात्र यावर निवेदन देऊनही महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला. शहरात पाण्याचं वितरण करणाऱ्या ocw या कंपनीची हकालपट्टी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
आमदारांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे मुख्यमंत्री नागपूरवरून आले ही बातमी चुकीची आहे, या सर्व अफवा मुद्दाम पसरवल्या जात असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे यांची बदनामी करणे, वैयक्तिक टीका करणे आणि सरकार पाडायची तारीख द्यायची हा अजेंडा आहे. पण त्यांचे मनसुबे अजिबात यशस्वी होणार नाहीत.
ज्या पक्षातून ऊठाव झाला तिथे कुणी जाणार नाही अन् तिथून कुणी येणारही नाही.
आम्हाला आमच्या महायुतीवर विश्वास आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला कुठलाही धोका नसल्याचे उदय सामंत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार ही अफवा आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. हा एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
तसेच अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा खोटी असल्याचे सांगत त्यांनी महायुतीवर ठाम विश्वास आहे, असे स्पष्ट केले.
तुम्हाला साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, अशी टीका रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली आहे.
मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली. जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफविरोधात नेहमी उभे राहणारे समरजित घाटगे यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील माझे गुरु आहेत. मी गुरूंना कधीही सोडणार नाही. हेळसांड, कुचंबना झाली म्हणून गुरु बदलणारा मी नाही, असे घाटगे यांनी म्हटले आहे.
मनसे नेते अभिजित पानसे यांनी संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युतीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर हा प्रस्ताव घेऊन संजय राऊत मातोश्रावर दाखल झाले आहे. यामुळे राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर आता चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीची गुरुवारी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीसाठी केरळ मंत्रीमंडळाचे सदस्य ससींद्रन शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या प्रमुख सोनिया दुहन, युवक अध्यक्ष धिरज शर्मा हे सुद्धा शरद पवार यांच्या घरी पोहोचले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट युतीबरोबर आला आहे. त्यानंतर शिवसेना आमदार नाराज झाल्याच्या बातम्या आल्या. त्यासंदर्भात शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, या बैठकीत काही घडलंही नाही. यावेळी सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी आमदारांमध्ये भांडणे झाली होती, ही खोटी बातमी असल्याचा दावा त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना तपासून हा निर्णय देणार आहे, असे उल्हास बापट यांनी सांगितले. परंतु लोकांना राज्यपाल आणि निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाहीय, विश्वास फक्त सुप्रीम कोर्टवर आहे, असे बापट यांनी सांगितले.
राष्ट्रवादीवर आणि चिन्हावर अजित पवार यांना दावा करता येणार नाही, असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले. 40 आमदार जरी अजित पवारांकडे असले तरी अजित पवार पक्षावर दावा करता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला आहे. मनसे अभिजीत पानसे हा प्रस्ताव घेऊन गेले आहे. संजर राऊत यांच्याकडे हा प्रस्ताव दिला आहे.
नागपूर महापालिकेवर काँग्रेसचा मोर्चा
आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे
पालिकेच्या बाहेर मोठी गर्दी झाली आहे
कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली सुरु झाली आहे.
शरद पवार यांची आज दिल्लीत चार वाजता पत्रकार परिषद घेणार, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
भाजप नेते समरजीत घाटगेंचं कोल्हापूरात शक्तीप्रदर्शन
कागलमध्ये आज ते कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहेत
आज आपली भूमिका स्पष्ट करणार
राष्ट्रवादीवर आणि चिन्हावर अजित पवारांना दावा करता येणार नाही
40 आमदार जरी अजित पवारांकडे असले तरी अजित पवार पक्षावर दावा करता येणार नाही.
निवडणूक आयोग राष्ट्रवादीची घटना तपासून निर्णय देणार
मात्र लोकांना राज्यपाल आणि निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही.
विश्वास फक्त सुप्रीम कोर्टवर आहे, कोर्टाने निर्णयात स्पष्टता असावी असं घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले.
मंत्रिमंडळासाठी घटनेने कुठलाही रेशो ठरवून दिलेला नाहीय, मात्र एकूण आमदारांपैकी 15 टक्के म्हणजेच 43 लोकांना मंत्री करता येते
शिवसेनेच्या वेळी जो घटनात्मक पेच निर्माण झाला होता, तोच पेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत निर्माण झाला आहे
राष्ट्रवादीचा गट आल्यानंतर काय करायला पाहिजे याबाबत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. राजकीय घडामोडींवर आमची चर्चा झाली. शिवसेना आमदारांमध्ये बाचाबाची झाली ही बातमी खोटी आहे असंही ते म्हणाले. जागा वाटपाचं गणित निवडणुकीच्या तोंडावर ठरेल
अजित पवारांच्या बंडाबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती होती – शंभूराज देसाई
शिवसेनेच्या आमदारांमध्ये कसल्याही प्रकारची नाराजी नाही
चर्चा आता फक्त पसरवल्या जात आहेत.
४० आमदार अजित दादांसोबत सहभागी झाले
ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते अशा पद्धतीच्या अफवा पसरवत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसही फुटीच्या मार्गावर आहे. काँग्रेसमधील 20 आमदार सरकारसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा वर्षा निवास स्थानावरून एअरपोर्टच्या दिशेने रवाना झाला आहे. थोड्याच वेळात राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहणार उपस्थित राहणार आहेत.
आज दुपारी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक
बैठकीला मोठे नेते उपस्थित राहणार
राष्ट्रवादीचं चिन्हं जाऊ देणार नाही
खासदार विनायक राऊत यांचा मोठा दावा
शिंदे गटातील सात ते आठ आमदारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला आहे, असा दावा खासदार विनायक राऊत केला आहे.
वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या
अजित पवारांची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची आणि देश हिताची आहे.
अजित दादांनी काल सत्य परिस्थिती मांडली
अजित दादांनी काल मांडलेली परिस्थिती लोकांना समजेल
जोपर्य़ंत निवडणुका लागत नाहीत, तोपर्यंत जागावाटपाचा कुठलाही निर्णय होत नाही
काल मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे
रत्नागिरी : उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असं म्हटलं आहे. सध्या एकदम खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे. महाराष्ट्राची ही बदनामी आहे. किळसवाणे राजकारण, सगळे महाराष्ट्राकडे तुच्छतेने पाहत आहेत.
अजित पवार गटाकडून पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी दिपक मानकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिपक मानकर यांच्या नावाची आज दुपारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर महिला शहराध्यक्षपदी रूपाली ठोंबरे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाकडून पुण्यात शहर कार्यालयाची शोधा शोध सुरू आहे. पुणे शहर कार्यालयावर अजित पवार गट दावा करणार नाही, अशी माहिती आहे.
अजित पवारच राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख राहतील, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आम्ही शेवटपर्यंत गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न करत होतो. शरद पवारांनी भाजपची चर्चा करून सातत्याने शब्द बदलला. अजित पवार यांनी वयामुळे मला थांबण्यास सांगितलं तर मी थांबेन, असंही भुजबळ म्हणालेत.
पुणे शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या झालेल्या बैठकीत पुण्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक होती. पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे मात्र आता समोर येऊन भूमिका मांडण्यास पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा नकार आहे.
कोल्हापूरात समरजीत घाटगे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. घाटगे समर्थकांनी भाजपच्या वरिष्ठांना थेट सवाल केलाय. समरजीत घाटगेसारखं चारित्र्यसंपन्न नेतृत्व भाजपला नको आहे का?, असं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजे सांगतील तेच तोरण सांगतील तेच धोरण म्हणत समर्थकांनी समरजित घाटगे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. समरजित घाटगे गटाचा आज कागलमध्ये मेळावा सुरू आहे. मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा भाजपच्या नेतृत्वावर संताप व्यक्त करत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या फोटो व्हॉट्सॲपवर स्टेटस म्हणून धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. पनवेलमधल्या लक्ष्मण मलिक या व्यावसायिकाला धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोहन भागवत यांचा फोटो स्टेटसवरून काढून टाक, ते मुस्लिमांचे शत्रू आहेत अशा आशयाचा मजकूर असलेला संदेश पाठवण्यात आला. त्यांना अलीभाई नावाच्या एका व्यक्तीने धमकीही दिली आहे. यानंतर त्यांनी याबाबत खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापुरातील ठाकरे गटातील अंतर्गत धुसपुस चव्हाट्यावर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं आता बोललं जात आहे. स्वतःच्या पक्षातील जिल्हाध्यक्षाच्या विरोधात मोहीम उघडली आहे. आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्याकडे तक्रार केला आहे. जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबईत सेनाभवनवर जाऊन देवणे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. वरिष्ठांनी योग्य निर्णय न घेतल्यास वेगळा विचार करण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.
कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे आज कागलमध्ये आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत. समरजित घाटगे आज मेळावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्याने घाटगे गटाची कोंडी झाली आहे. राज्यातील सत्ता नाट्यानंतर संपर्क बाहेर असलेली घाटगे आज पहिल्यांदाच लोकांसमोर भूमिका मांडणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज राजधानी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला 40 सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला सगळ्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, योगानंद शास्त्री, पीसी चाको बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जयंत पाटील बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
सामान्य माणसासोबत शरद पवार यांचीच नाळ घट्ट आहे. सामान्य माणसांसोबतची नाळ महत्वाची असते. साहेबांच्या बाबतीत ती अधिक घट्ट आहे. त्यामुळेच शरद पवार यांचे जनमाणसातील स्थान अढळ आहे. हे प्रेम, स्थान असंच अढळ राहील, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार यांनी विरोधी गटावर निशाणा साधला आहे.
सामान्य माणसासोबतची ही नाळ महत्त्वाची असते… साहेबांच्या बाबतीत ती अधिक घट्ट असल्याने साहेबांचं स्थान अढळ आहे.. राहील.. आणि हीच साहेबांची ताकद आहे…. pic.twitter.com/FyFmRLbIGs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2023
दिल्ली येथील शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर पोस्टर वॉर सुरु झाले आहे. शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवार यांच्याविरोधात गद्दार असे पोस्टर झळकले आहे. शाब्दिक चकमकीनंतर आता शरद पवार गटाकडून पोस्टर वार करण्यात येत आहेत. दोन्ही गटात वाद पेटला असून आता येत्या काही दिवसांत त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात दिसणार आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी दाखवला. काँग्रेस पक्ष फुटणार असल्याच्या अफवा असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाने संधी दिल्यास विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली.
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांना दिलासा मिळाला. हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली. विभागीय जात पडताळणी समितीच्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हायकोर्टाने विभागीय जात पडताळणी समिताचा निर्णय रद्द ठरवला
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीतील दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशन पण यावेळी गाजण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये पण एक गट आता नाराज असल्याने उद्याच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही आहेत. दिल्लीत आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष दिल्लीतील पवारांच्या बैठकीकडे लागलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेलं बंड, राज्यातील बदलती समीकरणं या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व कार्यक्रम रद्द केले होते. यावेळी त्यांनी आमदारांची बैठक बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर आजही त्यांनी गडचिरोलीचा दौरा रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कालच्या बैठकीने शिंदे गटाचे आमदार समाधानी नाहीत काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
अजित पवार यांच्या गटाने थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान दिलं आहे. शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे. तसेच जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवडही बेकायदेशीर होती म्हणून त्यांची पदावरून हकालपट्टी केल्याचं अजित पवार गटाने म्हटलं आहे. या संदर्भात अजित पवार गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेलं बंड आणि राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही तातडीची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज सकाळी 11.30 वा. गरवारे क्लब हाऊस, वानखेडे स्टेडियम मुंबई येथे होणार आहे. काँग्रेसच्या आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीला स्वत: शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
मुंबई :
आमदार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे. त्यांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.
मुंबई :
शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली. त्यानंतर आता शरद पवारांनी उद्या दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.
पक्षाचा ताबा घेणं लोकशाहीत अयोग्य आहे. पुलोद सरकार बनवलं होतं. विठ्ठल म्हणायचं आणि दुर्लक्ष झालं सांगायचं. अंतःकरणात पांडुरंगाचं नाव घ्यावं. बघून घेतो असं भुजबळांनी सांगितलं आणि शपथ घेतली. इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असं अजित पवार म्हणाले होते. आज त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसले. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावायचं काम फडणवीसांनी केलं. वेगळ्या विदर्भाची मागणी फडणवीसांनी केली, शब्द पाळला नाही.
23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी, असे शरद पवार म्हणाले.
चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. आम्ही घड्याळ, हात, चरख्यावर लढलो. माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, असे पवार पुढे म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकाराणात पक्ष चोरण्याचा प्रयत्न झाला. कानात सांगितलं असतं तरी प्रदेशाध्यक्ष पद सोडलं असतं. 25 वर्षात पक्ष मोडण्याचा अनेकांकडून प्रयत्न झाला. शिवसेनेसोबत घडलं ते आज राष्ट्रवादीसोबत घडलं, असं जयंत पाटील म्हणाले.
रविवारी घडलं ते पहिल्यांदा घडलं नाही. यापूर्वी मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये घडलं आहे. आमिष किंवा आपण पकडले जावू या भितीमुळे हे सर्व घडलंय. जर मनातून भक्ती केली असती तर पांडुरंग पावला असता. मात्र बडव्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. राजकारणातील नैतिकता, विश्वास, जबाबदारी यामुळे मला राजिनामा देण्याची तयारी दाखवली. जेव्हे देवेंद्रला अविर्भार देण्याचे नाकारले, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला. नवीन कार्यालय प्रतापगड या बंगल्यात स्थापन केले गेले. मला लगेच इतिहासाची आठवण झाली. असाच खंडूजी खोपडे अफझलखानाला शरण गेला होता, असे अमोल कोल्हे म्हणाले.
न्याय प्रक्रियेत जाणार नाही, अशी पवारांची भूमिका आहे. पवारांमागे काही जणांचा उद्योग सुरु आहे. जर गेलेच तर आम्ही कायदेशीर लढाईला समर्थ आहोत. 95 टक्के आमदारांचं आम्हाला समर्थन आहे. राज्यात सेना, नागालँडमध्ये भाजपसोबत गेलो, आता अडचण काय? असा सवाल पाटील यांनी केली. आम्ही राष्ट्रवादी आमचाच व्हिप असेल. 100 टक्के लोकांशी संपर्क केला आहे, असा दावा उमेश पाटील यांनी केली आहे.
रविवारी झालेल्या हसन मुश्रीफ यांच्या मंत्री पदाच्या शपथविधीनंतर नाराज असलेले समरजीत राजे समोर आले आहेत. तब्बल तीन दिवसानंतर व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना त्यांनी साद घातली. आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार आणि तेही सर्वांसमोर असं समरजीत घाटगे यांनी सांगितले. उद्या सकाळी कागल येथे सर्वांना एकत्र जमण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. समरजित राजे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक सुरु आहे. बैठकीत अजित पवार मार्गदर्शन करत आहेत. वांद्र्यातील बैठकीआधी देवगिरीवर बैठक घेत आहेत.
शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोडेकर, शांताराम मोरे, अभिजीत अडसुळ, दत्तात्रेय सावंत, श्रीकांत देशपांडे यांच्यासह काही ग्रामीण भागातील खासदार आणि आमदार वर्षा बंगल्यावर दाखल झाले. आज सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान सर्व आमदारांची तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे. या बैठकीसाठी सर्व आमदार आल्याची माहिती मिळते. बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आमदार खासदारांशी चर्चा करून महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे कळते.
माजी आमदारांची बैठक उद्धव ठाकरेंनी घेतली. या सर्वांशी संघटनात्मक चर्चा केली आहे. आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. शिवसेनेच्या मदतीशिवाय कोणतीच जागा महाविकास आघाडीला लढता येणार नाही. जागा लढण्यासाठी शिवसेनेची मदत लागलीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
मातोश्रीवर आज माजी आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आपापल्या विभागात जाऊन विभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवावे आणि विभागातील काम करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. 9 जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात कुठलीही जाहीर सभा होणार नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.
प्रत्येक वेळी करिश्माई नेतृत्त्वाची गरज असते असे म्हणत अजित पवारांनी इंदिरा गांधी यांचा दाखला दिला. काँग्रेसमध्ये फुट पडली आणि पुलोदची स्थापना झाली तेव्हा शरद पवार 38 वर्षांचे होते असेही अजित पवार म्हणाले. प्रत्येकाचा काळ येत असतो अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
अजित पवारांनी केलेल्या बंडाला इतीहासाचा दाखला दिलेला आहे. 1978 साली शरद पवारांनी इंदिरा गांधी सरकारमधून बाहेर निघून पुलोदची (पुरोगामी लोकशाही दल) स्थापना केली. यामध्ये जनसंघही सामील झाला होता असे अजित पवार म्हणाले.
काम करताना कुणासोबतही अय्या होणार नाही याची काळजी घेणार आहे. विरोधकांमध्ये बसून काही निर्णय होत नाही. सत्तेमध्ये काम करून लोकांचे प्रश्न सोडवता येत असतील तर का सोडायचे नाही? २०१७ मध्ये काही वेगळे करण्याचा प्रयत्न झाला. प्रफुल भाई यांनी सांगितले आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देतो आम्ही गप्प बसलो. देवेंद्र यांचा शपथविधीला गेलो.
त्यावेळी जायचं नव्हतो तर जायला का सांगितलं? पुन्हा जे काही घडले. अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, भुजबळ आणि भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत दादा असे चौघे जण होतो. सगळं काही ठरलं. पालकमंत्री ठरले. मी कधी खोटे बोलणार नाही. खोटे बोललो तर पवारांचाही औलाद सांगणार नाही.
अजित पवार यांच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना संबोधीत करत आहेत. शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे असे ते म्हणाले. माझ्यावर लहानपणापासूनच साहेबांचे संस्कार झाले असल्याचेही अजित पवार म्हणाले. सत्तेसाठी नाही तर लोकांच्या हितासाठी असा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न होतं. ते स्वप्न आपल्याला लोकशाहीमध्ये साकार करता आलं पाहिजे याकरता आपण काम करत असतो.
आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात 1962 ला केली. विद्यार्थी दशेमध्ये 72 ला राज्यमंत्री झाले. 75 ला मंत्री झाले. पण, 78 ला अशाच पद्धतीने एक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार बाजूला करून 78 ला पुलोद स्थापन केला. त्यावेळेस साहेब 38 वर्षाचे होते. त्या दिवसापासून महाराष्ट्राने साथ दिलेली आहे.
78 चा काळ गेला 80 चा काळाला 80 ला पुन्हा मध्ये जनसंघ पण सामील होता. जो आता भाजपा आहे. उत्तमराव पाटील मंत्रीमंडळामध्ये होते. इतरही शेतकरी कामगार पक्षाचे नेट होते. स्वर्गीय गणपतराव देशमुख होते. सगळेजण तुम्ही काँग्रेसमध्ये आलं. सरकार गेलं निवडणुका झाल्या. त्यामध्ये इमर्जन्सीच्या नंतर 77 मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या.
तुमच्या माझ्या देशाला कुणी टाकून एकदा फक्त जनता पक्षामध्ये जयप्रकाश नारायण यांचा ऐकून जनता पक्षाला निवडून दिले. 77 ला देश पातळीवर निवडून आलेला जनता पक्ष आता कुठे आहे का? करिष्मा असणारा नेता त्या पक्षाला नव्हता. त्याच्या नंतरच्या काळामध्ये 80 चा उल्लेख केला. 85 ला पुन्हा त्यावेळेस सुरुवातीला समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पक्ष साहेबांनी काढले. आपण सगळ्यांनी साथ दिली.
त्याच्यानंतरच्या काळामध्ये 85 ला काय पुन्हा आपण विरोधी पक्षांमध्ये गेलो. मित्रांनो प्रत्येकाचा काळ असतो इथं बसणाऱ्या माझ्या प्रत्येक महिलेचा प्रत्येक तरुणाचा वडीलधाऱ्यांचा काळ आपण साधारण वयाच्या 25 पासून साधारण 75 पर्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतो. समाजाकरता काही तरी करून दाखवण्याची जिद्द असते अशा पद्धतीने प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतच असं नाही. परंतु, हे सगळं घडत असताना काय झालं मला माहित नाही.
अजित पवार गटाच्या सभेत प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांचे भरभरून कौतूक केले. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या निर्णयाचे समर्थन केले. अजित पवार यांच्या मागे अनेक जण खंबीरपणे उभे असल्याचे ते बोलले. अजित पवार जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रफुल्ल पटेल जाईल असेही ते म्हणाले.
वळसे पाटील साहेबांना, झिरवाळ साहेबांना विचार मांडायचे होते. परंतु, बराच वेळ झालेला असल्यामुळे ते म्हणाले दादा तुम्हीच बोला. मित्रांनो ! ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? आपण सगळ्यांनी इतक्या दिवस मला आठवतंय एकंदरीतच मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झालो. घडलेलो आहे.
त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. त्याबद्दल आमचा प्रत्येकाचे तेच मत आहे. पण, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एकंदरीतच आज काय राज्य पातळीवर राजकारण चाललंय. शेवटी एखादा पक्ष आपण कशाकरता स्थापन करतो. लोकांची विकासाची कामी होण्याकरता. सर्व जाती-धर्माला न्याय देण्यासाठी काम पक्ष करतो.