मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) 4 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2020 घेण्यात आली होती. या परीक्षेमधून सहायक कक्ष अधिकारी (Assistant Cell Officer) पदासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल 30 नोव्हेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या पदासाठी पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांसासह नावाची यादी आणि गुणांची सीमारेषा आयोग्याच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/iRbqKnrPVs pic.twitter.com/bpp7U85vtd
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 30, 2021
>> या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
>> आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
>> मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1 दिनांक 22 जानेवारी, 2022 आणि पेपर क्रमांक 2 हा दिनांक 5 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
>> या परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्द्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/ मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
>> या पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवण्यात येईल.
>> मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसंच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेसाठी स्वीकारार्ह ठरतील.
इतर बातम्या :