आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याची दिशा वेस्ट नार्थ वेस्ट असल्यानं त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात असेल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्या टप्प्याने याचा प्रभाव असेल. दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस असेल. त्याचा सर्वात जास्त प्रभाव नार्थ कोकणात असेल. ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला आहे. वर्तवली आहे.
चिपळूण परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे. चिपळूणमध्ये असाच पाऊस सुरू राहीला, तर मात्र समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केलीये.
जालना : परतूर तालुक्यातील बाम्हणी-वलखेड या ओढ्याच्या पुरामध्ये 4 जण वाहून गेले होते. या 4 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र 2 तासाxपासून आसाराम खालापूरे या पुरात वाहून गेल्याने व्यक्तीचा शोध सुरू आहे. अंधार असल्याने शोध कार्यात अडचण येत आहे. तरी यंत्रणा या व्यक्तीचा शोध घेत आहे.
अकोला : गेल्या 6 दिवसापासून दर्शन शुक्ला याचा वाहून गेलेला मृतदेह सापडला
मात्र, पोलिसांच्या ताब्यातून गायब झाला
आता या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली
हे दोन्ही पोलिस कर्मचारी उरळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत
झाकर्डे आणि नेमाडे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड शहरात पावसामुळे अनेक दुकानात पाणी शिरले आहे. मेन रोड अंबड, सराफा मार्केट, कोर्ट रोड अनेक सखल भागात पाणी साचल्याने व्यपाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे अनके वाहने अडकली आहेत
हिंगोली- 23 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात बेपत्ता
शेतातून घरी परतत असताना बेपत्ता
कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा ते एलकी रस्त्यातील ओढ्यावरून बेपत्ता
लखन गजभारे अस 23 वर्षीय तरुणाचं नाव
नवी मुंबई, पनवेलमध्ये जोरदार पावसाला सुरुवात
गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा हजेरी
रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी दिला सतर्कतेचा इशारा
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहा : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
मनमाड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगांव तालुक्यातील दरेल या ठिकाणी नाला बरडींग(छोटा तलाव) फुटला
संध्याकाळीच्या सुमारास फुटला तलाव
तलावाचे पाणी शिरले शेतात
पाणी शिरल्याने पिकांचे झाले नुकसान
अस्मानी संकटाने बळीराजा पुन्हा हवालदिल
येत्या 9 सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता.
हवामान खात्याने वर्तवला अंदाज
गणपती बाप्पा मोरया? & Weather:
राज्यात सध्या असलेला जोरदार पावसाच्या सिस्टिमची, 9 सप्टेंबर पासून तिव्रता कमी होण्याची शक्यता IMD ने आज वर्तवली आहे.त्यामुळे गणेश चतुर्थीला,बाप्पाच्या आगमनासाठी,भावीकांना अडचण नसेल.अधिक माहितीसाठी हवामान विभागाची वेबसाईट पहा@CMOMaharashtra pic.twitter.com/ZRYovBgSfD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2021
बीड: बीड जिल्ह्यात अतिवृष्टी
गेवराई तालुक्यातील भेंड खुर्द येथील दोन पाझर तलाव फुटले
पुराचे पाणी नंदपूर गावात शिरले
शेकडो एकर शेतीवरील पिके वाहून गेली
बीड: केज तालुक्यातील वाघेबाभुळगाव नदीला पूर
पुलावरून प्रवास करताना कार वाहून गेली
कारमधील चालक वाहून गेला
वाहताना चालक झाडाला पकडल्याने जीव वाचला
कार वाहतानाची थरारक दृश्ये मोबाईल कॅमेरात कैद
अमरावती :अमरावती जिल्ह्यासह शहरांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून अमरावती शहरातील राजकमल चौकातील मुख्य मार्केटमध्ये पाणी शिरले. त्यामुळे येथे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या मार्केटमध्ये 25 पेक्षा जास्त मोबाईलचे दुकान असून त्या मोबाईलच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण मोबाईल खराब झाले
लातुर- रेणा प्रकल्पाचे सहाही दरवाजे उघडले
रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
रेणापूर तालुक्यातील रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
नांदेड: सुमारे सोळा वर्षानंतर आज झालाय नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस
पावसामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याचे 12 दरवाजे उघडले
यापूर्वी 16 वर्षांपूर्वी उघडले होते 12 दरवाजे
नदीकाठच्या लोकांना अतिसावधानतेचा इशारा
अहमदनगर : जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात
सकाळपासून होते ढगाळ वातावरण
जोरदार पावसामुळे नगर शरतील सखोल भागात पाणी साचले
तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका
जळगाव – बहूळा धरण 100 टक्के भरले
धरणात पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणाचे 9 दरवाजे उघडले असून विसर्ग सुरू
रत्नागिरी – गुहागर तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपले
पालशेत पूल पाण्याखाली 26 गावांचा संपर्क तुटला
गुहागर-रत्नागिरी मार्ग देखील पाण्याखाली
गुहागर आरे पुलावरून पाणी त्यामुळे धोपवेकडे जाणारामार्ग बंद
गुहागर एसटी स्टँड परिसरात देखील पाणी साचलं
नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला असून गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीये
विष्णुपुरी बंधाऱ्याचे आता 11 दरवाजे उघडण्यात आल्याने नदीच्या पात्रातील पाणी वाढलंय
नांदेड शहरातील होळी भागातील गोदावरी नदिवरचा छोटा पूल पाण्याखाली गेलाय
2005 साली आलेल्या पुरासारखी स्थिती आता नांदेडमध्ये निर्माण झालीये
आता पावसाने उसंत दिली नाही तर नांदेड शहरातील नदीकाठच्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो
त्यामुळे नांदेडकरांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलंय
रत्नागिरी – मुसळधार पावसाचा फटका, गुहागर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद
आबलोली जवळील एका वळणावर नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक झाले ठप्प
गेल्या दोन तासापासून वाहतूक ठप्प वाहनांच्या लांबच्या लांब रांगा
यवतमाळ –
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या बेंबला धरणाचे 14 दरवाजे उघडले
50 सेमी ने 14 दरवाजे उघडले
742 घनमीटर प्रतिसेकंद एतका पाण्याचा विसर्ग
नदीकाठच्या गावांना सतर्कता दिला ईशारा
बाभूळगाव, कलंब, राळेगाव, मारेगाव ,या भागातील पाणी पातळीत होणार वाढ
अहमदनगर
पारनेर तालुक्यातील उत्तरेतील गावांमध्ये मुसळधार पाऊस
शेतात पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान तर गावाला जोडणारे दोनन पूल गेले वाहून
पळशी ते वनकुटे दरम्यात पळशी गावाजवळील ओढ्यावरील एक पूल तर वनकुटे ते ढवळपुरीला जोडणाऱ्या काळुनदीवरील पुलच गेला वाहून
तरी ढवळपुरी मार्गे जाणाऱ्या सर्व दोन आणि चारचाकी वाहनांनी जाऊ नये सरपंच राहुल झावरे यांनी केले गावकऱ्यांना अहवान
तर पारनेर तालुक्यातील तास ओहोळ तलाव 98%भरले
हिंगोली –
सिद्धेश्वर धरणाचे 6 दरवाजे उघडे
5 हजार 824 क्युसेसन पूर्णा नदी पात्रात पाण्याचा वीसर्ग सुरू
पूर्णा नदीकाठच्या 30 गावांना सतर्कतेचा इशारा
यवतमाळ –
यवतमाळ शहरासह जिल्हाभरात आज सकाळपासून संततधार पावसाची रिपरिप सुरू
काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलका पाऊस
संततधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत
औरंगाबाद –
कन्नडच्या नागद घाटात पुन्हा कोसळली दरड
गौताळा अभयारण्यातील नागद घाटात कोसळली दरड
दरड कोसळल्यामुळे नागद घाट झाला पूर्णपणे बंद
कन्नड चाळीस गाव घाटानंतर आता नागद घाटही झाला बंद
जळगाव चाळीसगाव धुळे वरून येणाऱ्या वाहनांसाठी झाला रस्ता बंद
कन्नड चाळीसगाव घाट बंद झाल्यामुळे नागद घाटाचा सुरू होता वापर
नागद घाट बंद झाल्यामुळे रहदारीचे दोन्ही महत्वाचे रस्ते झाले बंद
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर चिपळूण शहरातील प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते. याठिकाणी चिपळूण नगरपालिका आणि प्रशासनाने नागरिकांना मदतीसाठी संपर्क क्रमांक ही जाहीर केले आहेत. तर काही ठिकाणी बोटी सुद्धा आणून ठेवलेत आणि NDRF पथक सुध्दा चिपळूणमध्ये मदतकार्यासाठी दाखल झाल्याचं तहसीलदार त्यांनी सांगितलं.
मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले
त्यामुळे जिल्ह्यात आज सर्वत्र वाहतुकीचा खोळंबा उडालाय
भोकर, हदगाव, हिमायतनगर, मुखेड आणि अर्धापुरमध्ये पावसाने कहर केलाय
त्यामुळे या पाचही तालुक्यातील अनेक रस्त्यावरून पाणी वाहतेय
रस्ते बंद असल्यामुळे जिल्हाभरात आज दुधासह वर्तमानपत्रे अनेक भागात पोहोचले नाहीत
आता पावसाचा जोर ओसरला असला तरी ढगाळ हवामान कायम आहे
या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय
Maharashtra Rain Updates : राज्यात ठिकठिकाणी पाऊस, कुठं मुसळधार, तर कुठं सर्वदूर रिमझिमhttps://t.co/krNvTxeVvB#Rain #RainUpdates #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2021
नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला; विष्णूपुरी धरणाचे 9 दरवाजे उघडले!https://t.co/CIWPpMwDWr#Maharashtra #Rain #Nanded #Rainupdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2021
Aurgabad weather: शहरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस, आजही सूर्यदर्शन नाही, मुसळधार पावसाची शक्यताhttps://t.co/rq0ZUdSHq7#Rainupdate| #Aurangabadcityrain
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2021
नागपूरसह परिसरात मुसळाधार पाऊस
काल रात्री नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागात मुसळाधार पाऊस पडला
आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि धुक्याची चादर आहे
शिवाय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत मुसळाधार पावसाला सुरुवात झालीये
बुलडाणा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस तर काही भागात रिमझिम पाऊस सुरु
यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत
तर शेतकरी सुद्धा आनंदित झाले आहेत, पिकांना जीवदान मिळालंय
खामगाव तालुक्यात ही मुसळधार पाऊस सुरू असून फरशी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि सुटाळपुरा रस्त्यावरुनही पाणी वाहत आहे
पुराचे पाणी वाढत चालले असून जुन्या शहरातील लोकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे
तर जिल्ह्यातही अनेक नाल्यांना पूर आलाय
महत्वाचे म्हणजे धरण क्षेत्रात ही पाणी पातळी वाढली असून पिण्याची पाणी टंचाई मिटणार आहे
खडकपूर्णा प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे
त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
मनमाड – मनमाड शहर परिसरात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू
वापसमुळे जनजीवन झाले विस्कळीत
रत्नागिरी – चिपळूण शहरात NDRF चे पथक दाखल
25 जवान 4 बोटीसह दाखल
चिपळूण परिसरातील पाऊस थांबला
रत्नागिरी- संगमेश्वरमधील गड नदीला पूर
गडनदीचे पाणी शिरले माखजन बाजारपेठत
माखजन बाजारपेठत चार ते पाच फूट पाणी
दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ
सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सर्व ओढे नाले भरून वाहू लागले
सीना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे बंधारे गेले पाण्याखाली
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी – राळेरास गावाला जाणारा रस्ता ओढ्यावरुन दोन फूट वाहू लागले
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक बंधारे गेले पाण्याखाली
हत्तुर ,वडकबाळ ,राजुर, बंदगी ,संगवड औराद अशा अनेक गावांमधील शेतांमध्ये पाणी
हिंगोली – दर्शनासाठी गेले भाविक अडकले मारोती मंदिरात
मारोती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
कळमनुरी तालुक्यातील चिखली गावातील प्रकार..