मुंबई: भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं सांगितलं आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडटासह आणि ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे आहे.
Nowcast warning at 1300hrs, 7 Sept:
Intense spells of rain very likely to occur at isol places in districts of #Ratnagiri,#Nasik,#beed, #Parbhani,#Latur,#Nanded,#Osmanabad next 3-4hrs.
Possibility of thunder/lightning with gusty winds in some areas. TC
-IMD MUMBAI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2021
रत्नागिरी, नाशिक, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातही पुढील तीन ते चार तासात पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Intense spells of rain very likely to occur in the districs of Ratnagiri, Nasik, Beed,Parbhani, Latur, Nanded & Osmanabad during next 3-4 hrs.Moderate to intense spells very likely over Dhule,Nandurbar,Jalgaon, Aurangabad & Solapur. Possibility of thunder/lightning in some areas pic.twitter.com/CMVW69AAi3
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 7, 2021
लातूर जिल्ह्यातल्या रेणा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. रेणा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आला आहे. रेणा नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या चार दिवसा पूर्वीच रेणा प्रकल्पाचं क्षेत्रात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते. संततधार पावसाने रेणापूरचा रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे . त्यामुळे रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस कोसळतो आहे ,त्यामुळे नदी-ओढ्याना पुराची स्थिती आहे. वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने ऊस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातली मुख्य नदी असलेली मांजरा नदी,पूर्णपणे प्रवाहित झाली आहे .
अहमदनगरला पारनेर तालुक्यातील उत्तरेतील गावांमध्ये मुसळदार पाऊस पडलाय. शेतात पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान तर गावाला जोडणारे दोन ठिकाणचे पूल वाहून गेल्याने नागरिकांची हाल होतेय. पळशी ते वनकुटे दरम्यात पळशी गावाजवळील ओढ्यावरील एक पूल तर वनकुटे ते ढवळपुरीला जोडणाऱ्या काळुनदीवरील पुलच गेला वाहून गेलाय. तरी ढवळपुरी मार्गे जाणाऱ्या सर्व दोन आणि चारचाकी वाहनांनी जाऊ नये सरपंच राहुल झावरे यांनी गावकऱ्यांना अहवान केलाय. तर पारनेर तालुक्यातील तास ओहोळ तलाव 98%भरले असून. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, बाजरी, मुग, वांगी, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालाय.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकणातील गुहागर तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय या पावसाचा फटका गुहागर तालुक्यातील अनेक भागांना बसलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. या मध्ये पालशेत पूल पाण्याखाली 26 गावांचा संपर्क तुटला तर गुहागर-रत्नागिरी मार्ग देखील पाण्याखाली गेले आहेत. गुहागर आरे पुलावरून पाणी त्यामुळे धोपवेकडे जाणारामार्ग बंद तर गुहागर एसटी स्टँड परिसरात देखील पाणी साचलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. पण, त्याचवेळी भरतीची वेळ असल्यानं चिंता आणखी वाढली आहे. सध्या समुद्राला उधाण आलं असून लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. चिपळूणला 22 जुलै रोजी आलेल्या पुराला समुद्राला आलेली भरती हे देखील एक कारण पुढं आलं होतं. त्यामुळे पाऊस आणि भरतीची एकच वेळ आल्यानं चिंता काही प्रमाणात का असेना नक्कीच वाढताना दिसून येत आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Rain Update IMD predicted rain fall at Madhya Maharashtra and North Maharashtra