मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab cyclone ) मराठवाडा (Marathwada rain) आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं (Rain in Maharashtra) धुमशान पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात कालपासून तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याचा प्रभाव पुढील 48 तास राज्यावर पाहायला मिळणार आहे. इकडे मुंबईसह ठाणे आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे.
येत्या 24 तासात,मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतीवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे.
पुढील 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. धुळे , पालघर , ठाणे , मुंबई , रायगड , नाशिक , अहमदनगर , पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे.
पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि जालना या 5 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदूरबार
हिंगोली- कन्हेरगाव नाका येथील पैनगंगा नदी काठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन
बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे 25 सेमी.09 गेट उघडल्याने स्थलांतरित होण्याचे आवाहन
ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाचे आवाहन
उस्मानाबाद – जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 459 लोकांना सुरक्षित बाहेर काढले
जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस
जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के
अतिवृष्टीत 20 लहान आणि 17 मोठ्या जनावरांचा मृत्यू तर 180 झोपड्या-घरांची अंशत: पडझड
जळगाव : जामनेर येथे पुराच्या पाण्यात वाहून जाणार्या वनविभागातील नीलगायीला ग्रामस्थांनी वाचवले
मांडवे बुद्रुक येथे आलेल्या पुरात निलगाई वाहून जात असताना ग्रामस्थांनी कौतुकास्पद कामगिरी करत नीलगायीला वाचवले
ग्रामस्थांनी उपचारार्थ निघायला वन विभागाच्या स्वाधीन केल्याची प्राथमिक माहिती
पोलीस पाटलासह ग्रामस्थांनी पुरात जीव संकटात टाकून नील गाईला वाचवले
नंदूरबार : नंदुरबार शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असं सध्यातरी दिसून येत आहे. मात्र मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
वाशिम : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाची 9 वक्रद्वारं 25 सेंटी मीटरने उघडली
पैनगंगा नदीपात्रात होत आहे 8280 क्यूसेक प्रति सेकंदने पाण्याचा विसर्ग
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येऊन नदी काठच्या शेतात पाणी घुसून नुकसान होण्याची शक्यता आहे
जळगाव : पावसामुळे कुऱ्हा काकोडा गोरक्ष गंगा नदीला आला पूर
मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनविभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर
कु-हा काकोडा गोरक्ष गंगा नदीला आला पूर
औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाना अक्षरश: धुंमाकळू घातला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या भागातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून फक्त 48 तासांत तब्बल दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या पावसामध्ये 200 जनावरे वाहून गेले आहेत.
यवतमाळ- उमरखेड बस दुर्घटना
तब्बल 8 तासानंतर सापडले 2 मृतदेह
आणखी 1 जण बेपत्ता
एकूण मृतांची संख्या 3
तर 2 जणांना वाचविण्यात यश आले होते
अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
नाशिक – रामकुंड परिसरात वाहून जाणाऱ्या पर्यटकाला जीवरक्षक दलाच्या तरुणांनी वाचवलं
पाणी वाढल्याने पर्यटक जात होता वाहून
पर्यटक आणि रहिवाशांनी पाण्याजवळ न जाण्याचे प्रशासनाकडून आवाहन
औरंगाबाद : नदीवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या नागरिक जात होते पुराच्या पाण्यात वाहून
गावकऱ्यांनी वेळेतच धाव घेऊन वाचवले 2 जणांचे जीव
ढोरकीन बालानगर रोडवरील कापुसवाडी नदीच्या पुलावरील प्रकार
वाहत असताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना वाचविण्यात आले यश
पुराच्या पाण्यात जीव मुठीत धरुन करतायेत नागरिक प्रवास
बुलडाणा : पेठच्या पुलावर अजूनही 3 ते 4 फूट पाणी
सकाळी 4 वाजेपासून वाहतूक अद्यापही बंद
12 तासानंतरही पुलावरून वाहत आहे पाणी
दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम
तर पैनगंगा नदीकाठच्या शेतात घुसले पाणी
दिवठाणा, सोमठाणा, पेठ , सवणासह अनेक गावातील शेतकऱ्यांचे नुकसान
नाशिक – गंगापूर धरणातून आज सकाळपासून 3 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
धरणातून पाणी सोडल्यानंतर गोदा घाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ
रामकुंडावरचा दुतोंड्या मारुती अर्धा पाण्याखाली
संध्याकाळी आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता
परिसरातील दुकानदारांना दुकान हटवण्याच्या सूचना
औरंगाबाद : शिवना टाकळी धरणातून पाण्याचा मुसळधार विसर्ग सुरू
शिवना नदीला पूर आल्यामुळे धरणाचे उघडले चार दरवाजे
चार दरवाजातून 16 हजार क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू
मुसळधार पाणी नदीत कोसळत असल्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका
कोसळणाऱ्या पाण्याचं चित्र पाहून चुकतोय काळजाचा ठोका
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे नदी नाले ओढ्यांना जोरदार पुर आला आहे. हिंगोली शहरातील बावन्न खोली, रेल्वे फाटक पूल परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहत आहे. वसमत औंढा कळमनुरी सेनगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. वसमत तालुक्यातील टेम्भुर्णी, किन्होळा गावात पाणी शिरले आहे. काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झालं आहे.
नाशिकला (Nashik) पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur dam) शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज मंगळवारी (28 सप्टेंबर) दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेला अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, पश्चिम उपनगरात मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. याशिवाय दक्षिण मुंबईतही तुफान पाऊस कोसळत आहे.
येत्या 24 तासात,मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतीवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे. पुढील 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. धुळे , पालघर , ठाणे , मुंबई , रायगड , नाशिक , अहमदनगर , पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे.
गुलाब चक्रिवादळाचे आता राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48तास राज्यावर दिसतील. येत्या 24तासात,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे पण.विदर्भात प्रभाव कमी. उद्या उ कोकण व उ मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील
-IMD pic.twitter.com/sb2syKG56i— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 28, 2021