मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. महाराष्ट्रातच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. तेलंगाणा, कर्नाटक या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा अगदीच तुटपुंजा आहे. महाराष्ट्रात 15 वर्षांपासून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 16 हजार पगार मिळतो. तर कर्नाटकमध्ये 15 वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना 30 हजार रुपये पगार दिला जातो. तेलंगणा या राज्यामध्येदेखील महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार दिला जातो. या सर्व तफावतीमुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा कोणी ऐकणार का ? असे विचारले जात आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना इतर राज्यांच्या तुलनेत अगदीच कमी पगार दिला जातो. कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त पगार दिला जातो. महाराष्ट्रात एसटी भरती झाल्यानंतर सुरुवातीला 5 हजार रुपये पगार मिळतो. तर तेलंगणात सुरुवातीलाच जवळपास 20 हजार पगार दिला जातो. कर्नाटकात हा पगार 10 हजार रुपये आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात 15 वर्षांपासून ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये पगार मिळतो. तर कर्नाटकमध्ये 15 वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना 30 हजार पगार दिला जातो. तेलंगणात महाराष्ट्रापेक्षा अधिक पगार आहे. महाराष्ट्रात एसटीत 25 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला 21 ते 22 हजार पगार मिळतो. तेलंगणात हाच पगार 48 ते 50 हजारांच्या घरात आहे. या सर्व तफावतीमुळे राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मुख्य मागणीसह राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप मिटणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. एसटी महामंडळाला रोज कोट्यवधींचा तोटा होतोय. महाविकास आघाडी सरकारनं एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केलं तर महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्य़ांचा पगार जवळपास दुपटीने वाढेल. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता राज्य सरकार दोन मागण्यांवर सकारात्मक आहे, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
इतर बातम्या :
पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी ‘बीजमाता’ राहीबाईंचा कृषी क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास
यवतमाळमधील डॉ. अशोक पाल हत्याकांडाचा उलगडा, 3 जण अटकेत, क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याचे निष्पन्नhttps://t.co/lVrWLah9wI#Yavatmal |#Murder |#DrAshokPal |#AccusedArrest
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2021