26 April 2023 Maharashtra Temperature : पुढील आठवड्यात तापमान कसे राहणार? IMD चा अंदाज काय?

| Updated on: Apr 27, 2023 | 10:07 AM

26 April 2023 Maharashtra City-Wise Temperature : राज्यातील तापमानाचा पार सध्या थोडा कमी झाला आहे. परंतु मे महिन्यात तापमान एप्रिलसारखे वाढणार का? याची चिंता नागरिकांना आहे. सध्या तरी एप्रिलचा शेवटचा आठवडा दिलासा देणार असणार आहे.

26 April 2023 Maharashtra Temperature : पुढील आठवड्यात तापमान कसे राहणार? IMD चा अंदाज काय?
Follow us on

पुणे : राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसवर आहे. पुढील आठवड्यात heat wave असणार का?, तापमान कसे असणार?. यासंदर्भात हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. तसेच दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २६ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. संकटातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळीचे संकट कायम असणार आहे.

उष्णतेची लाट असणार का?

एप्रिल महिना उन्हाचा तडाखा चांगला बसला. आता एप्रिलचा शेवटचा आठवडा चांगला जाणार आहे. हवामान खात्याने पुढील आठवड्याबाबत आपल्या अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार देशात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. एप्रिल व मे महिन्यात राज्यात उष्णतेची लाट असते.

हे सुद्धा वाचा

 

दोन दिवस पाऊस

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीचा जवळपास असणार आहे. मध्य प्रदेशात गोलाकार वाऱ्यांची स्थिती असून ती महाराष्ट्रापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे दोन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra temperature
शहर तापमान
जळगाव 39
अकोला 39.8
मुंबई 32.7
पुणे 37.6
नागपूर 35.3
नाशिक

अमरावती

37.3

39.6

मालेगावात फळांची मागणी वाढली

तापमानाचा उच्चांक गाठला जात असल्याने शीत पेयांची मागणी वाढली आहे. पन्हे, सरबत आरोग्यासाठी लाभदायी असल्याने त्याच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत चिंच आवक वाढली आहे. तसेच फळांना मागणी आलीय. यासह शहरातील विविध भागात भरणाऱ्या आठवडे बाजारात देखील चिंच विक्रीसाठी दाखल झाली आहे. मागणी वाढल्याने चिंचेचे भाव देखील वाढले आहे. असे असले तरी गुणकारी असलेली चिंच खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.

पुणेकरांना दिलासा

राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या जवळपास असताना पुणे आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईचे तापमान ३२.७ अंशावर होते. पुणे शहराचे तापमान ३७.६ अंशावर होते. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ किंवा राज्यातील शहरांमध्ये तापमानात वाढ आहे.