Maharashtra Vidhan Sabha Live : बीडमध्ये महिलेवर चारशे जणांनी बलात्कार केला, महिलांना सुरक्षित वाटत आहे का ?- देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 28, 2021 | 8:42 AM

Maharashtra Vidhan Sabha Live : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज चौथा दिवस आहे.

Maharashtra Vidhan Sabha Live : बीडमध्ये महिलेवर चारशे जणांनी बलात्कार केला, महिलांना सुरक्षित वाटत आहे का ?- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विधानसभा लाईव्ह
Follow us on

Maharashtra Vidhan Sabha Live Day 4: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज चौथा दिवस आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील विधिमंडळ अधिवेशनात पहिल्या दोन दिवसात उपस्थित राहिले नाहीत.  ते आज विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यासह भाजप नेते ठाकरे सरकारवर आजही हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तर, राज्यपालांनी मंजुरी दिल्यास विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होऊ शकते. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांची नाव चर्चेत आहेत. तर, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होण्याबाबत चर्चा सुरु आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Dec 2021 05:55 PM (IST)

    बीडमध्ये महिलेवर चारशे जणांनी बलात्कार केला, आपल्या महिलांना सुरक्षित वाटत आहे का ?- देवेंद्र फडणवीस

    आकडे फसवे असतात. ते कधी जास्त तर कधी कमी असतात. राज्यात सुरक्षित वाटतं का हे महत्त्वाचं आहे. पुण्यात सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार, चौदा वर्षाच्या मुलीवर त्याच भागात बलात्कार. बीडमध्ये तर चारशे जणांनी बलात्कार केला. सतरा वर्षाच्या मुलीवर हा बलात्कार झाला. पोलिसात तक्रार करायला गेल्यानंतर तिथेसुद्धा तिच्यावर अत्याचार झाला. कुठे चालला आहे आपला समाज. अशा नराधमांवर आपल्याला कारवाई करावीच लागेल. सेफ्टीचं परसेप्शन काय आहे. आपल्या महिलांना सुरक्षित वाटत आहे का ? यामध्ये आपण जोवर लक्ष घालणार नाही तोवर याच्यावर आपण नियंत्रण आणू शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 27 Dec 2021 05:50 PM (IST)

    ज्यांनी रॅकेट पकडलं त्यांच्यावरच कारवाई झाली -देवेंद्र फडणवीस

    जे पैसे देऊन वेगवेगळ्या जागेवर गेले आहेत. त्यांना घरी कसं पाठवलं जाईल हा प्रयत्न केला जाईल. हेच रॅकेट मी गृहमंत्री असताना लक्षात आलं. मी एसआयटीला सांगून मी पूर्ण पुरावे जमा केले. आम्ही छापा टाकला. ते पकडले गेले. ते पूर्ण रॅकेट पकडले गेले. आता एसआयटीने सांगितलं की रॅकेट सुरु आहेत. आता एसआयटीवरच कारवाई झाली. ज्यांनी रॅकेट पकडलं त्यांच्यावरच कारवाई झाली. यावर लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

  • 27 Dec 2021 05:47 PM (IST)

    जाणीवपूर्वक हिंदूंची दुकानं फोडली, फडणवीसांचा आरोप, दंगल घडवण्याचाही प्रयोग झाल्याचा आरोप

    मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधा नसभेत बोलत आहेत. जाणीवपूर्वक हिंदूंची दुकानं फोडली, दंगल घडवण्याचा प्रयोग झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. “राज्यात बदल्यांचा घोटाळा झाला. माझ्याकडे काही माहिती आली होती. ती मी होम सेक्रेटरी यांना दिली होती. मी काय चूक केलं. मी ती  माहिती माध्यमांना दिली नाही. मी जबाबदारीने वागलो. तुमच्याच लोकांनी ही माहिती माध्यमांना पुरवली. एकाएका पोस्टिंगसाठी किती सारे पैसै मागितले गेले. आता तपास सुरु झाला आहे. लोक आता आम्ही आमुक आमुक पैसे देऊन पदावर आलो असं अनेकजण मान्य करत आहेत. असं असेल तर अनेक पोलीस अधिकरी वसुली करतील. जिल्ह्या-जिल्ह्यात आता नेक्सस तयार झालं आहे.

  • 27 Dec 2021 04:24 PM (IST)

    पुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरला होणार

    पुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपुरला होणार आहे.

    विधीमंडळ कामकाज समितीच्या पहिल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती.

  • 27 Dec 2021 01:58 PM (IST)

    जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचं आंदोलन

    जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानात शिक्षकांच्यावतीनं आंदोलन करण्यात येत आहे. विधानभवनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

  • 27 Dec 2021 01:11 PM (IST)

    Ajit Pawar : मी कुणाच्या अध्यात मध्यात नसतो, हे म्हणतात, अजित पवारांकडे राज्य दिलं तर चार दिवसात राज्य विकतील ‘हे’ बोलतात, सदस्यांनी देखील भान राखावं

    अजित पवारांकडे राज्य दिलं तर चार दिवसात राज्य विकतील हे काय बोलतात. दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधकांनी, दोन्ही सभागृहातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील सहकाऱ्यांनी भान राखलं पाहिजे. मी शंभूराज देसाई यांच्याशी संरक्षण देण्याबाबत चर्चा केली आहे. काही सदस्य संरक्षण नाकरतात. जे कोणी दोषी असतील त्या संदर्भात योग्य ती कारवाई करु, असं अजित पवार म्हणाले.

  • 27 Dec 2021 01:06 PM (IST)

    Devendra Fadnavis : टीका करणाऱ्याला आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न होतोय : देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातील हल्ल्यावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यावर 307 लावणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत. सरकारचा या घटनेशी थेट संबंध आहे. सत्ता पक्षाच्या बापाचे पोलीस आहेत का? या राज्याचे पोलीस आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राज्यात जे चाललंय ते योग्य नाही, महाराष्ट्राला महाराष्ट्र ठेवा आणि बंगाल होऊ देऊ नका, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. गोपीचंद पडळकर यांच्यावरील 307 चा गुन्हा मागं घ्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 27 Dec 2021 12:29 PM (IST)

    अध्यक्षांनी विरोधकांकडे पाहायचं नाही, असं ठरवलंय का? देवेंद्र फडणवीस

    अध्यक्षांनी विरोधकांकडे पाहायचं नाही, असं ठरवलंय का? असा, सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.  ठाकरे सरकारला विरोधक नको आहेत का, अगोदर आमचे 12 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. आम्ही त्या कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात गेलो.  वारंवार कायदा मोडण्याचं काम सभागृहात घडत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बारा सदस्य निलंबित करण्यात आले आता आणखी एकाला निलंबित करण्याचा डाव ठरवून करण्यात येत आहे. जी घटना घडली त्याचा निषेध केलाय. आमचा सदस्य असून ही त्याला जाब विचारु, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. लोकशाहीची हत्या होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

  • 27 Dec 2021 12:27 PM (IST)

    Bhaskar Jadhav : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि हरिभाऊ बागडेंनी नितेश राणेंना त्या दिवशी रोखायला हवं होतं: भास्कर जाधव

    देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि हरिभाऊ बागडेंनी नितेश राणेंना त्या दिवशी रोखायला हवं होतं, असं  भास्कर जाधव म्हणाले.

  • 27 Dec 2021 12:19 PM (IST)

    नितेश राणेंना कायमस्वरुपी निलंबित करा, भास्कर जाधवांची आक्रमक मागणी

    जुलैमधील पावसाळी अधिवेशनात 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यावेळी अभिरुप अधिवेशनात तेव्हा नितेश राणे मागे मला बोलले होते की हा कुत्रा आहे. त्याला बिस्किट दिले तर चावायला जातो, असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांचं शेतकऱ्यांच्या मुद्यावर निलंबन करण्यात आलं होत. त्याला देखील म्हणजेच त्यावेळच्या अध्यक्षांना तोच न्याय लावायचा का असा सवाल भास्कर जाधवांनी चंद्रकांत पाटील  आणि देवेंद्र फडणवीस यांना केला. यानंतर विधिमंडळात गोंधळ झाला. सभागृह 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

  • 27 Dec 2021 12:09 PM (IST)

    नितेश राणे यांच्या वक्तव्यावर शिवसेना आमदार आक्रमक

    सुनील प्रभू

    त्या दिवशी चर्चा झाली
    तोव्हा ठरलं नेत्यांबाबत नीट‌ बोललं पाहिजे
    चुकीला माफी नाही, नितेश राणे यांना निलंबित करा

    भास्कर जाधव

    हा विषय गंभीर आहे
    मी मोदींबद्दल बोलले तेव्हा मी माफी मागितली

  • 27 Dec 2021 12:05 PM (IST)

    नितेश राणेंना निलंबित करा, सुहास कांदे विधानसभेत आक्रमक

    आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचा आम्ही आदर करतो. सुधीर भाऊ आपण फार बोलतात, मात्र, आपलसुद्धा ऐकलं जात नाही. अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो की सभागृहात किंवा सभागृहाच्या प्रांगणात बोललं गेल्यास आम्ही शांत राहणार नाही, असं शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी म्हटलं, नितेश राणेंना निलंबित करा, अशी मागणी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी म्हटलं.

  • 27 Dec 2021 12:02 PM (IST)

    विधिमंडळ अधिवेशनात  दररोज कोरोनाची चाचणी करणार केली जाणार : आदित्य ठाकरे

    विधिमंडळ अधिवेशनात  दररोज कोरोनाची चाचणी करणार केली जाणार आहे. सध्या कोविडची स्थिती असल्यानं आता आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंडळात कधी येणार यावर आदित्य ठाकरेंनी ठोस माहिती दिली नाही.

  • 27 Dec 2021 11:32 AM (IST)

    विधानसभा अध्यक्षांसाठी महाविकास आघाडी सरकारनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा

    विधानसभा अध्यक्षांसाठी महाविकास आघाडी सरकारनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली आहे. राज्य सरकार राज्यपालांना या संदर्भात पुन्हा आणखी एक विनंती पत्र पाठवणार आहे, असं कळतंय. आशुतोष कुंभकोणी यांच्यासोबत बाळासाहेब थोरात, सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी चर्चा केलीय.

  • 27 Dec 2021 11:00 AM (IST)

    आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांना कोरोनाची लागण

  • 27 Dec 2021 10:38 AM (IST)

    बांधावर येऊन मदत करण्याचं आश्वासन देणारे वांद्यात अडकले, भाजप आमदाराचा आरोप

    बांधावर येऊन मदत करण्याचं आश्वासन देणारे वांद्यात अडकले असल्याचा आरोप भाजप आमदारांनी सरकारवर केला. या सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. जनतेचे प्रश्न सुटावेत असा कोणताही विचार सरकारकडे नाही, असा आरोप भाजप आमदारानं केला.

  • 27 Dec 2021 10:35 AM (IST)

    Exam Scam : विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर परीक्षांमधील गैरप्रकारावरुन आंदोलन

    राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. परीक्षा गैरप्रकार आणि शेतकरी प्रश्न, सक्तीची वीज वसुली यावरुन  भाजप आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

  • 27 Dec 2021 10:18 AM (IST)

    ओबीसी आरक्षणात गोंधळ, मराठा आरक्षणात गोंधळ, ठाकरे सरकारच्या गोंधळावर पीएचडी होऊ शकते: चंद्रकांत पाटील

    नवी मुंबई महापालिकेवर दोन वर्षांपासून प्रशासक आहे. कोरोना आणि आता ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळं निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

  • 27 Dec 2021 10:15 AM (IST)

    राज्यपालांचा आदेश न पाळणं हा घटनेचा अपमान; हे राष्ट्रपती राजवट येण्यास कारणीभूत : चंद्रकांत पाटील

    राज्यपालांच्या अधिकाराबद्दल मी काही बोलणार नाही. राज्यपालांबद्दल उलट सुलट बोलण्याचं काम सरकारकडून करण्यात येतं. राज्यपालांनी दिलेल्या तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं हा घटनेचा अपमान आहे. घटनेचा अपमान हा राष्ट्रपती राजवट येण्यासाठी  पुरेसं असल्याचं  चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 27 Dec 2021 10:05 AM (IST)

    ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन

    ओबीसी आरक्षणासाठी थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रापाठोपाठ, मध्यप्रदेश आणि ओडिशामधील ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालंय. केंद्राच्या पुनर्विचार याचिकेत महाराष्ट्र सरकार सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

  • 27 Dec 2021 10:03 AM (IST)

    शिवाजी महाराजांचा फोटो न लावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये: विजय वडेट्टीवार

    छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो 50 वर्ष मातृसंघटनेत न लावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या केशव उपाध्ये यांना उत्तर दिलं.

  • 27 Dec 2021 09:18 AM (IST)

    विधिमंडळ कामकाजाच्या कार्यक्रमपत्रिकेत अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाचा उल्लेख नाही

    विधिमंडळ कामकाजाच्या कार्यक्रमपत्रिकेत अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधनसभा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून मंजुरी आल्याशिवाय अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

  • 27 Dec 2021 08:21 AM (IST)

    नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बाॅम्बला घाबरून अधिवेशनात भाजप बॅकफुटवर आल्याची सुत्रांची माहिती…

    नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बाॅम्बला घाबरून अधिवेशनात भाजप बॅकफुटवर आल्याची सुत्रांची माहिती…

    अधिवेशानात महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्यासाठी भाजपकडे

    पेपरफुटी प्रकरण, कायदा व सुव्यवस्था, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक, राज्यातील शेतकऱ्यांची ऊर्जा विभागाने सुरू केलेली छळवणूक, एसटी कामगारांचा संप, अनेक मंत्र्यांची प्रकरणे, ईडीच्या त्यांना नोटिसा आदी मुद्दे आहेत,

    मात्र, भाजपने यापैकी काहीही न केल्याने अनेकांच्या भूवया ऊंचावल्यायत…

  • 27 Dec 2021 07:53 AM (IST)

    भाजपकडून आमदारांसाठी व्हिप जारी

    महाविकास आघाडी सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपनं त्यांच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे.