रत्नागिरी : दापोलीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. दापोली बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय याठिकाणी रात्री पाणी भरलं होतं. दापोलीकरांनी रात्र जागून काढली. रात्रभर मुसळधार पावसाचं थैमान घातलं. दापोलीच्या इतिहात पहिल्यांदाच एवढं पाणी भरलंय. दुसरीकडे चिपळूणसह परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे.
वाशिटी नदी आणि शिवनदी शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. चिपळूण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळुणकरांनी रात्र जागून काढली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले, तर पाऊस असाच सुरू राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केले आहे.
चिपळुणात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळुणात पुन्हा पाणी भरेल का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. असाच पाऊस रात्री पडल्यास नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाशिष्ठी नदी पात्राची पातळी सध्या धोक्याची नाही. मात्र असाच पाऊस पडत राहिला तर नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेले काही दिवस कुठे रिपरिप तर कुठे संततधार बरसात करीत असलेल्या पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यादृष्टीने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच जाहीर केले होते. कोकणात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात पावसाचा मुक्काम असल्यामुळे बाप्पाच्या तयारीवर परिणाम होत आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची पावसाच्या हजेरीमुळे तारांबळ उडत आहे. मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग जिल्हा परिसरात पाऊस वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.
इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहर व तालुक्यात रिमझिम अशा पावसाच्या सरी होत होत्या. मात्र शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत होता. शहर व तालुक्यात ढगाळ वातावरण होते. यानंतर इंदापूर तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
यवतमाळ शहरासह नेर तसेच पुसद परिसरात सोमवारी (6 सप्टेंबर) पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वारा व विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस बरसला. यवतमाळसह नेर तालुक्यातील वाई हातोला, पिंपरी कलगा, आनंदनगर, टाकळी सलामी या भागात पावसा दरम्यान गारपीट झाली. पावसाळ्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे बैल पोळा सण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली
Maharashtra Weather rain Live Updates Heavy rain in Chiplun Dapoli