मुंबईः राज्यात जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची वारे वाहू लागलेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून त्या निवडणुकांकडे अनेक राजकीय नेत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे.
? धुळे – 15
? नंदूरबार – 11
? अकोला – 14
? वाशिम -14
? नागपूर -16
? पालघर पोटनिवडणूक –
? धुळे -30
? नंदूरबार -14
? अकोला -28
? वाशिम -27
? नागपूर -31
? 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार होता
? 21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार होती
? 29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार होता
? 5 ऑक्टोबरला मतदान
? 6 ऑक्टोबरला निकाल
? जिल्हा परिषदेच्या 85 जागा
? पंचायत समितीच्या 144 जगाा
अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे मदान यांनी सांगितले.
नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघांसाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघांसाठी उद्या पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केलीय, तर धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत असून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे पालघर जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होतेय.
इतर बातम्या :
FRP चे तुकडे पाडण्याची आघाडी सरकारने केलेली शिफारस ऊस उत्पादकांसाठी घातक, अनिल बोंडेंचा आरोप
सोमय्यांची अडवणूक करु नका, त्यांना येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन
Maharashtra Zilla Parishad Election 2021 live updates 85 zilla parishad seats and 144 panchayat samiti voting latest news poll percentage in marathi