ZP Election Result 2021 : प्रत्येक ठिकाणचं सत्तेचं गणित किती बदललं, कोणत्या पक्षाला तोटा, कुणाला फायदा?

| Updated on: Oct 06, 2021 | 4:41 PM

Maharashtra Zilla Parishad Election results 2021 : राज्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागलेत.

ZP Election Result 2021 : प्रत्येक ठिकाणचं सत्तेचं गणित किती बदललं, कोणत्या पक्षाला तोटा, कुणाला फायदा?
ZP And Panchayat Samiti Election Result
Follow us on

मुंबई : राज्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागलेत. नागपूर आणि नंदूरबारमध्ये जनतेने काँग्रेसच्या हाताला साथ दिली आहे. तर धुळ्यातली सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. अकोल्यात पुन्हा एकदा वंचितचा करिश्मा पाहायला मिळाला. वंचितने सर्वाधिक जागा मिळवल्या. इकडे पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भाजप उमेदवार पंकज कोरे खासदार पुत्र रोहित गावित यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले. तर वाशिममध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी बाजी मारत प्रतिष्ठेची जि.प राखली.

पालघरमध्ये कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?

शिवसेनेला 5 जागा, जिल्हा परिषदेत 2 जागा वाढल्या
राष्ट्रवादीला 5 जागा, 3 जागा कमी झाल्या
भाजपला 5 जागा, 1 जागा वाढली, माकपची 1 जागा कायम
खासदार राजेंद्र गावित यांचा पुत्र रोहित गावित जि.प. निवडणुकीत पराभूत
मनसे भाजप युतीला अपयश, सेनेला फायदा

नागपूरमध्ये काँग्रेस सुस्साट, राष्ट्रवादीचा तोटा, केदारांचं वर्चस्व कायम

नागपुरात 16 पैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या, 2 जागा वाढल्या
राष्ट्रवादीला 2 जागांचा तोटा, दोन्ही जागा गमावल्या
भाजपला 3 जागा, गेल्या वेळीच्या तुलनेत 1 जागा कमी झाली
शेकाप आणि इतर पक्षाला प्रत्येकी 1 जागा
काँग्रेसची सत्ता कायम राहणार, मंत्री सुनील केदार यांचं वर्चस्व कायम

अकोला झेडपीत सत्तेची चावी आता भाजप आणि अपक्षांच्या हाती

अकोला झेडपी पोटनिवडणुकीत वंचितने 6 जागा कायम राखल्या
वंचित समर्थक दोन सदस्य होते, समर्थक एकमेव सदस्य
भाजपच्या दोन जागा कमी झाल्या, राष्ट्रवादीची 1 जागा वाढली
झेडपीत आता वंचित आणि महाविकास आघाडीतील पक्षांना समसमान 22 जागा
अकोला झेडपीत सत्तेची चावी आता भाजप आणि अपक्षांच्या हाती

धुळे झेडपीत भाजपची सत्ता कायम राहणार, पण 3 जागा कमी झाल्या

धुळे झेडपीत भाजपची सत्ता कायम राहणार, पण 3 जागा कमी झाल्या
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा 3 जागांचा फायदा
काँग्रेस शिवसेनेने आपापल्या जागा राखल्या
भाजप आमदार अमरीश पटेल यांचं शिरपूरमध्ये वर्चस्व कायम
गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी

नंदुरबारमध्ये काय झालं?

नंदुरबार झेडपीमध्ये भाजपने 3 जागा गमावल्या, 4 जागांवर विजय
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एका जागेचा फायदा
नंदुरबार पंचायत समिती शिवसेनेने भाजपकडून हिसकावली
शहादा पंचायत समिती भाजपने गमावली, आता काँग्रेसची सत्ता
कोळदा गटातून आमदार विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित विजयी
कोपर्ली गटातून आमदार विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांचा पराभव
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी यांचयाकडून पंकज यांचा गावित यांचा पराभव
खापर गटातून मंत्री के.सी. पाडवी यांची बहीण गीता पाडवी विजयी
गीता पाडवी यांच्याकडून माजी मंत्री दीलवीर सिंग पाडवी यांचा मुलगा नागेशचा पराभव

Maharashtra ZP result