महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी, भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85, अजित पवार गट 55 ते 60 जागांवर लढणार?

| Updated on: Sep 24, 2024 | 11:13 PM

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर येथे देखील महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतही भाजपचे प्रमुख नेते होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. या बैठकीत जागावाटपाबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी, भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85, अजित पवार गट 55 ते 60 जागांवर लढणार?
महायुती
Follow us on

महायुतीच्या जागावाटपाबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी आज दुपारी नागपुरात विदर्भातील विधानसभेच्या सर्व जागांचा आढावा घेतला. यानंतर अमित शाह छत्रपती संभाजीनगर येथे आले. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर येथे देखील महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतही भाजपचे प्रमुख नेते होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. या बैठकीत जागावाटपाबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत. या बैठकीत जवळपास एक तासांपासून जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. सूत्रांकडून या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची आधी बैठक पार पडली. यानंतर महायुतीची बैठक पार पडत आहे. या बैठकीत जागावाटपावर प्राथमिक चर्चा सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत भाजपला 155 ते 160 जागा, शिंदे गटाला 80 ते 85 जागा, अजित पवार गटाला 55 ते 60 जागा देण्यात येण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “जागावाटपाबाबत आमच्यात कोणाताही वाद नाही. समोपचाराने चर्चा होत आहेत. अंतिम जागावाटप होईल तेव्हा कोणती जागा कोण निवडेल ते आम्ही जाहीर करु”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली.

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

या बैठकीदरम्यान, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे बाहेर आले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “अमित शाह यांचा दौरा हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोजित करण्यात आला आहे. विधानसभेची तयारी करण्याच्या दृष्टीने हा दोरा आहे. दुपारी नागपूर, संध्याकाळी संभाजीनगर, उद्या दुपारी नाशिक आणि संध्याकाळी कोल्हापूर असा अमित शाह यांचा दौरा आहे. विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी या बैठकीचं आयोजित करण्यात आलं होतं. आगामी निवडणूक भाजपला जिंकण्यासाठी एक रचना तयार करण्यात आली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आगामी निवडणुका भाजप नक्की जिंकेल”, असा विश्वास आम्ही अमित शाह यांना दिला.