Tv9 EXCLUSIVE | महायुतीच्या जागावाटपातली सर्वात मोठी बातमी, कुणाला किती जागा?

| Updated on: Mar 06, 2024 | 6:26 PM

महायुतीच्या जागावाटपातली इनसाईड स्टोरी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक 37 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अजित पवार गटाला केवळ 3 जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Tv9 EXCLUSIVE | महायुतीच्या जागावाटपातली सर्वात मोठी बातमी, कुणाला किती जागा?
Follow us on

मुंबई | 6 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीतील इनसाईड बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला हा 37-8-3 असा असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजपला 37, शिंदे गटाला 8 आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण राष्ट्रावादी अजित पवार गट 9 जागांवर आग्रही आहे. विशेष म्हणजे याआधी भाजप 36 जागांवर निवडणूक लढवेल, अशी चर्चा होती. पण आता हाच फॉर्म्युला बदलल्याचं बघायला मिळत आहे. आता महायुतीचा 37-8-3 असा जागावाटपाचा फॉर्म्युला असणार आहे. भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील तब्बल 5 जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामती, रायगड आणि शिरुर या तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटाच्या ताब्यातील तब्बल 5 जागा या भाजपला जाऊ शकतात. यामध्ये हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर, पालघर, यवतमाळ-वाशिम या जागांचा समावेश आहे.

शिंदे गटाच्या ‘या’ जागा भाजपला जाणार

हिंगोली – भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत
उ.प. मुंबई – भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत
कोल्हापूर – भाजप धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्याची शक्यता
पालघर – राजेंद्र गावित भाजपकडून लढण्याची शक्यता
यवतमाळ-वाशिम – भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत

शिंदे गटाला ‘या’ जागा मिळू शकतात

  1. दक्षिण मध्य मुंबई
  2. कल्याण
  3. हातकणंगले
  4. रामटेक
  5. बुलढाणा
  6. शिर्डी
  7. नाशिक
  8. मावळ

राष्ट्रवादीचाला ‘या’ तीन जागा मिळणार

  1. बारामती
  2. रायगड
  3. शिरुर

महायुतीचं जागावाटप कसं ठरवण्यात आलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली. अमित शाह यांची महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत काही निकषांवर जागावाटप निश्चित करण्यात आलं. जिंकू शकण्याच्या मेरीटवरच जागावाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे जितके विद्यमान खासदार तो फॉर्म्युला लागू राहणार नाही, असं या बैठकीत ठरलं. भाजपची मुंबईमधील 6 पैकी 5 जागांवर उमेदवार देण्याची तयारी आहे. त्यामुळे शिंदे गटाला मुंबईत एकच जागा मिळण्याची शक्यता आहे.

उमेदवारांच्या मेरिटपुढे तीनही पक्षांनी एक-एक पाऊल मागे घ्यावं, असं अमित शाह यांनी या बैठकीत सांगितलं. तीनही पक्षांच्या उमेदवारांनी आम्ही लढू हा हट्ट धरु नये, असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं. या जागावाटपात फॉर्म्युल्याच्या आकड्यापेक्षा विजयाची खात्री असलेल्या संधी देण्याचा निर्णय झाला.