मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात बदल केल्यानंतर योजनेचा कोटा प्रथमच 100% पूर्ण भरण्यात आला. आता याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. घरगुती कामं करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब महिलेचा मुलगा परदेश शिष्यवृत्तीच्या बळावर लंडनला शिकायला निघाला आहे. त्यावेळी त्याने खास कवितेतून धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. (maid’s son and first girl in Meghwal community, will go abroad for education)
लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील एका घरगुती काम करणाऱ्या आईचा योगेश बडेकर हा मुलगा, लंडन मधील इंपेरिकल कॉलेजमध्ये इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करण्यासाठी त्याची निवड झाली. मुंडेंच्या निकषात सुधारणा करण्याच्या निर्णयामुळे त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. ‘वडील बालपणीच गेले, 3 बहिणी व मी असा चार भावंडांचा सांभाळ आईने लोकांच्या घरी धुनी-भांडी करून केला. परदेशात शिकायचं आज माझं स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण होतंय’, अशा शब्दात त्याने मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसंच योगेशने मुंडेंसाठी खास कविता लिहिली आहे.
“मोलकरणीचा मुलगा निघाला शिकाया आज लंडनला।
नाही लागणार आईला आता दुसऱ्याची घरं झाडायला।।
कारण आपल्या खात्याने पाठवलं मला पुढं शिकायला।
शतशः आभार या आपल्या खाते समाजकल्याणला।।
राहील ऋणी मी सदा या आपल्या कार्याला, या आपल्या कार्याला।।
शेवटी एक लहानशी कविता आपल्यासाठी,
मोलकर्णीचा मुलगा निघाला शिकाया आज लंडनला ||
नाही लागणार आईला आता दुसऱ्याची घरं झाडायला ||
कारण आपल्या खात्याने पाठवलं मला पुढे शिकायला,
शतशः आभार या आपल्या खाते समाजकल्याणला !
राहील ऋनि मी सदा या आपल्या कार्याला , या आपल्या कार्याला !
— Yogesh Badekar (@YogeshBadekar) August 13, 2021
सुरेश मारू या सफाई कामगार असलेल्या वडिलांची देवयानी ही मुलगी, मेघवाल समाजातील परदेशात शिकायला निघालेली पहिली महिला ठरली आहे. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर परदेशातील विद्यापीठाकडून विनाअट ऑफर लेटर लवकर उपलब्ध होत नव्हते त्यामुळे जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली. या निर्णयामुळे तळागाळातील विध्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळाली, पर्यायाने या वर्षी 310 अर्ज प्राप्त झाले होते. म्हणजे जास्तीत जास्त गरीब आणि गरजू विध्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे, त्याचबरोबर क्यूएस रँकिंगमध्ये असलेल्या परंतु शाखेचा कोटा बसत नसलेल्या 19 विद्यार्थ्यांची यादी देखील पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करण्यात आली आहे.
या यादीमध्ये अत्यंत पारदर्शकपणे विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या आहेत. प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रथमच संधी मिळाली असल्याचे सोलापूर येथील डॉ. तन्वी शेंडे यांनी सांगितले. डॉ. तन्वी यांची इंग्लंड मध्ये मास्टर्स इन सोशल डेव्हलपमेंट प्रॅक्टिस या विषयात परदेश शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. मागील तीन वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या तन्वी यांनी देखील धनंजय मुंडे यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
प्रिय योगेश, खडतर कौटुंबिक परिस्थितीवर मात करत स्वतःच्या योग्यतेवर हे यश तू मिळवलं आहेस. आम्ही तर फक्त आमचं कर्तव्य निभावलं आहे. पुढील उच्च शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा. #ForeignScholarship https://t.co/RvU5CbABnD
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 13, 2021
इतर बातम्या :
राहुल गांधींसाठी राष्ट्रवादीची बॅटींग, थेट ट्वीटर इंडियाला घेरलं; विचारला कळीचा प्रश्न
2024मध्ये शिवसेनेचं काय होणार?, रामदास आठवलेंचं मोठं भाकीत; दिली ‘ही’ ऑफर
maid’s son and first girl in Meghwal community, will go abroad for education