मुंबई : कोरोना निर्बंध, तिसरी लाट, तसेच राज्यात नुकताच आलेला पूर या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ठाकरे त्यांनी पूर आल्यानंतर जीवितहानी तसेच मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी मोठ्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. (major measures need to be taken to prevent loss of life and property in rain and flood said cm uddhav thackeray )
यावेळी बोलताना “वेगळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन पुढे आलेलं संकट थोपवावं लागेल. नाहीतर असे संकटं भविष्यातही येत राहतील. सध्या आलेल्या पुरात 29 निवारा केंद्रांवर आपण 50 हजार नागरिकांची राहण्याची सोय केली होती. अशी संकटं पुन्हा पुन्हा येऊ नयेत त्यासाठी ज्या धोकादायक वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. ज्या गावांमध्ये पाणी घुसतं, तेथे व्यवस्थापन करण्यासाठी दूरगामी योजना आखावी लागेल. त्यासाठी सरकार पाऊल टाकत आहे. चिपळूण, महाडमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात आता पूर आला. हे सगळं विचित्र आहे. काही महिन्यांचा पाऊस एका दिवसात आला. पुरामुळे नद्या, धरणं ओसंडून वाहू लागले. धरणं भरल्यामुळे आपल्याला पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यानंतर सोडलेलं पाणी सांगली, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांतील गावांत गेलं. त्यानंतर चिपळून, महाड पाण्याखाली गेलं,” असं उद्धवन ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या हवामान बदलाची माहिती दिली. ग्लोबल वार्मिंगमुळे बर्फ वितळत असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यात दरडी कोसळण्याचे तसेच पूर येण्याचे प्रमाण वाढत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं. “हे दरवर्षीचं संकट आहे. पावसामुळे काही दरडी कोसळल्या. रस्ते खचून गेले. दरडीमध्ये रायगडमध्ये गावंच्या गावं दबले.तळीयेमध्ये मी गेले होतो. तिकडे सगळे चिखल साचलेला होता. यामध्ये मोठी जीवितहानी झाली. पूर येण्याचं, दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे,” असं ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या :
(major measures need to be taken to prevent loss of life and property in rain and flood said cm uddhav thackeray)