कुसुमाग्रजनगरी, नाशिकः नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितत गौरव करण्यात आला. या सन्मानाने मला अतिशय भरून आले आहे. या संमेलनाचा आवाका आणि परिस्थिती पाहून मला प्रथम काही सुचले असेल ते म्हणजे शासनाने मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, असे डोळे झाकून घोषित करावे, असे आवाहन यावेळी सत्काराला उत्तर देताना शहाणे यांनी केले. यावेळी कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, दादा गोऱ्हे, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, स्वानंद बेदरकर उपस्थित होते.
मूल्यावर आधारित काम
साहित्यिक मनोहर शहाणे म्हणाले की, माझ्या जडणघडणीत लक्ष्मीबाई टिळक आणि कवी कुसुमाग्रज यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. कुसुमाग्रज यांनी मला लिहिण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे माझा हा सन्मान मला प्रेरणा देणाऱ्या कुसुमाग्रज व लक्ष्मीबाई टिळक यांना अर्पण करतो. यावेळी त्यांनी आपल्या जीवनाचा संपूर्ण पट काही कथांमधून मांडला. यावेळी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर म्हणाले की, महाराष्ट्रात गावागावात जाऊन पुस्तके पोहचविणारी ग्रंथाली चळवळ असून ग्रंथालीने अद्याप पर्यंत 1200 पुस्तके प्रकाशित केले असून, त्यातील 800 पुस्तके ही नव लेखकांची असल्याचे त्यांनी सांगत हा पुरस्कार स्वीकारतांना आनंद होत असल्याचे सांगितले. आपले मूल्य कायम ठेऊन ग्रंथाली आपला प्रवास करत असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.
पुराणिक यांचा विशेष सन्मान
पाकिस्तान येथे असलेल्या मराठी भाषिकांशी दर सप्ताहात संवाद साधून मराठी भाषा रुजवीत असलेले दिलीप पुराणिक यांचा सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, माजी अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उदघाटन कार्यक्रम पाकिस्तानात ऑनलाइन बघितला गेला असल्याची माहिती प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी दिली.
Nashik| कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग; कवी आणि अभिनेता किशोर कदमांचे परखड वक्तव्य