साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांना शांतता रॅलीनंतर मराठा बांधवाना संबोधित करत असताना मनोज जरांगे यांनी भोवळ आली. जरांगे पाटील व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक खाली बसले. जरांग पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना उपचार घेण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. जरांगे पाटील यांना व्यासपीठावरुन खाली नेण्यात आलं. मंचावर बोलत असतानाच त्यांना चक्कर आली. आता त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाऊ शकतं. मंचावर त्यांचे हात थरथर होत होते.
मनोज जरांगे पाटील उद्या पुण्यात असणार आहे. अशक्तपणा असल्याने त्यांना चक्कर आल्याचं बोललं जात आहे. मनोज जरांगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील फोनवरुन लोकांना संबोधित करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांची तपासणी केली जाणार आहे. जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. पण या दरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्यांचं जरांगे यांनी म्हटलं होतं.
मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या अनेक महिन्यांपासून रॅली आणि सभा घेत आहेत. त्यांच्या या सभेला आणि रॅलीला मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. उपोषणानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मराठा आरक्षणासाठी दौरा सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी याआधीही म्हटलं होतं.
महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी माझी भूमिका आहे. असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना मराठी मराठी प्रांत करायचं. परप्रांतिय म्हणायचं आणि मराठ्यांना दांडगे हातात घ्यायला लावायचं. आता त्या मराठ्यांच्या पोरांना आता आरक्षण मिळायची वेळ आली तेव्हा भाजपचं ऐकून आमच्या विरोधात षडयंत्र करायचं आणि आमच्याविरोधात बोलायचं. या वेळेस राज ठाकरे यांना मराठ्यांची ताकद काय हे कळेल.