अखेर मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार?

| Updated on: Nov 03, 2024 | 10:53 PM

"मोजक्याच जागा लढायचं ठरवलं आहे आणि त्या निवडून आणायचं सुद्धा ठरवलं आहे. आपण 15 ते 20 जागांवर लढायचं आहे आणि उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे आहे", असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अखेर मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार?
Manoj Jarange Patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे पाटील कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार? याबाबतची उत्सुकता आहे. मनोज जरांगे रात्री उमेदवारांची घोषणा करणार अशी चर्चा होती. पण मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांसोबत अद्याप चर्चा सुरु आहे. अजून अनेक मतदारसंघांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. असं असलं तरी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज रात्रीत किंवा उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार? याबाबतची भूमिका स्पष्ट केली. “मोजक्याच जागा लढायचं ठरवलं आहे आणि त्या निवडून आणायचं सुद्धा ठरवलं आहे. आपण 15 ते 20 जागांवर लढायचं आहे आणि उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“बीड मतदारसंघ लढवण्याचं ठरवलं आहे. केज, मंठा, परतूर, फुलंब्री हे मतदारसंघ लढवायचं ठरवलं आहे. बाकीचे नावं आले नाहीत तिथे पाडायचं आहे. कन्नड, हिंगोली, वसमत हे लढवायचे ठरवले आहे. पण त्याबाबत चर्चा सुरु आहे. परभणीतील पाथरी, गंगाखेड, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, धाराशिव आणि कळंब लढवण्याचं ठरवलं आहे. दौंड, पर्वती हे सुद्धा लढवण्याचं ठरवलं आहे. पार्थडी, कोपरगाव, पाचोरा, करमाळा, माढा, धुळे शहर, निफाड, नांदगाव या मतदारसंघांवर निवडणूक लढवायची आहे. पण त्याबाबत चर्चा सुरु आहे”, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

“एकूण 25 मतदारसंघांवर चर्चा झाली आहे. उमेदवार जाहीर करायचे राहिले आहेत. आज रात्री किंवा सकाळी उमेदवार जाहीर करु. सकाळी सात वाजेच्या आत आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत. कारण उद्या शेवटचा दिवस आहे. ज्या मतदारसंघाची नावे येणार नाहीत तर माझी राज्यभरातील मराठा समाजाला विनंती आहे की, तुमच्या मतदारसंघाचं नाव आलं नसेल तर आपले अर्ज काढून घ्या. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी लढायचं आहे. आपल्याला आपल्यासाठी दहा ते पाच असेनात, पण निवडून आणायचं आहे. गोरगरीब उमेदवाराला पैशाचा ताकदीवर दमदाटी केली तर आम्ही आमच्या मतदानातून तुम्हाला ताकद दाखवणार. दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचा उमेदवार पाडलाच म्हणून समजावं”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

‘या’ मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार

  • 1) केज, बीड जिल्हा
  • 2) परतूर, जालना जिल्हा
  • 3) फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
  • 4) बीड, बीड जिल्हा
  • 5) हिंगोली, हिंगोली जिल्हा
  • 6) पाथरी, परभणी जिल्हा
  • 7) हदगाव, जिल्हा नांदेड
  • 8) कळंब, जिल्हा धाराशिव
  • 9) भूम-परांडा, जिल्हा धाराशिव
  • 10) दौंड, जिल्हा पुणे
  • 11) करमाळा, जिल्हा सोलापूर
  • 12) निलंगा, जिल्हा लातूर
  • 13) पार्वती, जिल्हा पुणे