संजय सरोदे, मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. शेवटी मिळवले की नाही, दाखवले की नाही करुन…अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आणि विरोधकांना चोख उत्तर दिले. मिळू देणार नाही. कसे मिळू देणार नाही. मिळवले की नाही. सगे सोयऱ्यांचा अध्यादेश निघाला की नाही, असे शाब्दीक फटकारे मनोज जरांगे पाटील यांनी कोणाचे नाव न घेता लगावले.
मराठा आंदोलनाचा संघर्ष हा मोठा आहे. हे मराठ्यांचे यश आहे. हा मराठ्यांचा विजय आहे. या यशासाठी मराठा समाजाने खूप यातना सहन केल्या. काय माकडे खूप काही म्हणत होते. सगे सोयरे शब्द करता येणार नाही. काही जणांनी माझे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. ट्रॅपचा प्रयत्न झाला होता. खूप त्रास सहन केला. आरक्षण आंदोलनासाठी अनेक जण कारागृहात गेले. आंदोलनासाठी अनेकांचे बलिदान झाले. अखेर यश मिळाले. यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र आनंद साजरा करत आहे.
सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी मान्य केली. कुणबी नोंदी चार लाख जास्तीच्या मिळाल्या. मराठवाड्यासाठी गॅझेट निघाला. खूप वर्षानंतर यश मिळाले. आता संपूर्ण महाराष्ट्र आनंद साजरा करणार आहे. सर्वांचा फायदा होणार नाही. सगे सोरये शब्दासाठी रात्री दोन वाजेपर्यंत खलबते झाले. अखेर आमच्या वकिलांच्या टीमने सर्व मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एक मराठा लाख मराठा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून दाखवली. मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश प्राप्त झालेय. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानाला आज खऱ्या अर्थाने मनोज रंगे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिली.
हे ही वाचा…
मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला