पुणे : 14 ऑक्टोबर 2023 | अंतरावली सराटी येथे दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील यांची मोठी सभा झाली. गेले काही दिवस या सभेची मोठी तयारी करण्यात येत होती. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतुत्वाखाली सकल मराठा समाज अंतरावली सराटी येथे जनला होता. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी ‘नजर पुरत नाही इतका लांब मराठा जमलाय. इतकी गर्दी जमली. आता वर्ल्ड रेकॉर्डच झालाय. पण, या सरकारने आता काय केलं माहित आहे का? फेसबुक अकाऊंट बंद केलं असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला. पण, हा जनसागर बघा काय करेल. नेट न फेट बंद करून काय होणार आहे? मराठे तुमच्या पुढच्या आहेत. तुम्ही आमच्या लेकराला विष पाजत असाल तर कोणत्या कोपऱ्यात मराठा ढकलून देईल हे समजणारही नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांचे फेसबुक अकाऊंट बंद करण्याचा विधानावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संतापले आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध केलाय. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पोट तिडकीने भांडणारे नेते आहेत. प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे त्यासाठी झटणारे, त्याग देणारे आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी लाखोंच्या संख्येने समाज एकत्र करून दाखविला. एक मोठा संदेश दिला. शांततेत सभा घेतली. कुणालाही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली. पण काही महाशक्तीने ट्रोलरचा वापर करून त्यांचे फेसबुक पेज बंद. हे पाहून मनाला वाईट वाटले. महाराष्ट्रात सत्तेत असणारे लोक असे वागत असतील तर त्यांचा निषेध केला पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उगाच आडकाढी न आणता सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. सर्व पक्षांना सोबत घेऊन मार्ग कसा काढता येईल हे सरकारने पाहिले पाहिजे. पण, सरकारने फेसबुकला सांगून मनोज जरांगे पाटील यांचे फेसबुक पेज बंद केले. इंटरनेट बंद केला. काही सत्तेत असणारी लोक अशी वागत असतील तर त्या सर्वांचा निषेध केला पाहिजे अशा शब्दात आमदार रोहित पाटील यांनी आपला संताप व्यक्त केलाय.