जालना : जालन्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील बोलले. मनोज जरांगे पाटील यांना याबद्दल विचारण्यात आलं. “इंटरनेट बंद केल्यावर लोकांचा रोष वाढणारच. आंदोलन खूप मोठ झालय. आरक्षण मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही. उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो” असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. तातडीने विधानसभेच अधिवेशन बोलवा. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करा. हे निर्णय लवकर घ्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.”मी, माझा मराठा समाज आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही. पूर्ण आरक्षणच हवं. अर्धवट आरक्षण नको. अर्धवट आरक्षण नाही घेणार. नेट बंद करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. पण नेटपेक्षापण मराठा समाज हुशार झालाय. काल रात्रीच हजारो लोक महाराष्ट्रातून इथे येऊन बसलेत. अशी काम करुन राज्यातील वातवरण दूषित करु नका. अर्धवट दिलेलं आरक्षण घेणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
काही कारस्थान दिसतय का? आंदोलन चिघळवायचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ते मला उठवू शकत नाहीत. त्यांचा डाव 100 टक्के दिसतोय. आंदोलन खूप मोठ झालय. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही” “उद्रेक आमच्याकडून होणार नाही. शांततेत आंदोलन सुरु राहील. आरक्षण दिल्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
सर्वपक्षीय बैठकीबद्दल विचारण्यात आलं, त्यावर ते म्हणाले की, “सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची ही दुसरी वेळ आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण का देत नाही?. आरक्षण देण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील? हे स्पष्टीकरण गरजेच आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण का देत नाही? हा प्रश्न आहे” सरसकट आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा आज संध्याकाळपासून पाणी बंद करणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. ते आता पाणी पीत असल्याने तब्येत थोडी बरी आहे.