एकदा नाद केला, पुन्हा प्रयोग करू नका…मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

| Updated on: Dec 22, 2023 | 1:19 PM

maratha reservation issue | आपण खानदानी मराठे आहोत, मी नाव सांगेन त्यांच्या अंगावर गुलाल पडू द्यायचा नाही. आरक्षणासाठी ते अडथळे ठरले आहे. आता विनाकारण नोटीस दिल्यामुळे मराठे आता मुंबईला जायचे म्हणतात. मुंबई आम्ही पाहायाची नाही का? असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

एकदा नाद केला, पुन्हा प्रयोग करू नका...मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
Follow us on

नजीर खान, सेलू, परभणी, दि.22 डिसेंबर | मराठ्याची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारकडून आता आम्हाला नोटीसा दिल्या जात आहेत. परंतु तुमच्या नोटीसीला आम्ही घाबरणार नाही. नोटीस देणे बंद करा, अन्यथा तुमचे फिरणे अवघड होईल. आम्ही अजून कुठे जायचे ते जाहीर केले नाही. तोपर्यंत आम्हाला नोटीसा येत आहेत. अंतरवलीत एकदा नाद केला, पुन्हा प्रयोग करू नका. आमच्या मुलांच्या हितासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

आम्ही मुंबई पाहायची नाही का ?

आम्हाला जायचे नाही. पण जायचे ठरले तर काय? मुंबई आमची नाही का? आम्ही मुंबई पाहायची नाही का? मुंबईतील शेअर मार्केट पाहायचे नाही का? मंत्र्यांचे बंगले कसे आहेत पाहू या? हिरो-हिरोईन यांचे बंगले पाहू द्या. जर कोणाला अटक केली तर सर्वच जण त्या पोलीस ठाण्यात जाऊन बसा. लाखोच्या संख्येने जाऊन बसा. सरकारने खेटायचे ठरवले तर खेटू द्या. सध्या एकही नेता मराठ्यांच्या बाजूला उभ राहायला तयार नाही. ज्याला मोठ केलं तोच म्हणतो, आरक्षण मिळू देणार नाही, सावध व्हा. जाता जाता पायाला हात लाऊन सांगतो, अशीच एकजूट ठेवा. आधी आपले पोर, जातीपेक्षा नेता मोठा नाही. आपल्या लेकरापेक्षा कोणी मोठा नाही. मला तुमच्या साथीची गरज आहे. पाठबळ हवेय आहे. मी मारायला भीत नाही. सरकारने मला शत्रू मानले.

हे सुद्धा वाचा

आता देवही आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही

तुमची शक्ती कमी होऊ देऊ नका. मग हे आरक्षण कसे देत नाही, हे पाहतो. तुम्हाला गाडीवर मराठा समाजाने बसवले. त्यांना आरक्षण दिले नाहीतर तुमच्या अंगी गुलाल लागणार नाही. मी त्यांच्यावर (भुजबळ) आता बोलत नाही. शिष्टमंडळ माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की त्यांच्यावर बोलू नका, मात्र ते आरक्षणावर बोलले तर मी बोलणार, असे आपण स्पष्ट सांगितले. सरकारने या अगोदर आपल्याला वेळ मागून घेतला. आता पुन्हा वेळ मागत आहे. परंतु आता वेळ देणार नाही. आता सावध व्हा, अशी संधी पुन्हा येणार नाही. आरक्षणाने मराठ्यांचा घात केला आणि मुले नोकऱ्यापासून वंचित राहू लागले. मराठा आरक्षणासाठी २०० पेक्षा जास्त जणांनी बलीदान दिले. आता त्यांचे बलीदान वाया जाऊ द्यायचे नाही. आता देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षण घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही.