Manoj Jarange Patil : नव्या वर्षात मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, तारखेची केली घोषणा

| Updated on: Dec 17, 2024 | 12:01 PM

Manoj Jarange Patil : "राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांच्या एकजुटीचा सरकारने फायदा उचलला. पण जाणुन-बुजून आरक्षण दिलेलं नाही. सरकारला हात जोडून विनंती आहे की, आमच्या मागण्या तातडीने मान्य करा. महाराष्ट्रातला मराठा समाज शेतकरी आहे, कुणबी आहे" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : नव्या वर्षात मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, तारखेची केली घोषणा
Manoj Jarange Patil
Follow us on

राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार सत्तेवर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मराठा आरक्षण आंदोलनाच आव्हान असणार हे स्पष्ट झालय. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याच जाहीर केलं आहे. त्यांनी नव्या वर्षात कधीपासून आमरण उपोषण सुरु करणार, ती तारीख जाहीर केली आहे. “सरकारला वाईट वाटेल, पश्चाताप होईल, इतकं भयंकर आंदोलन होईल. मराठा समाजाच्या एकजुटीने सरकारचे डोळे विस्फारतील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी राज्यभरातील मराठ्यांना अंतरवली-सराटील एकत्र जमण्याच आवाहन केलं आहे.

“एकाही मराठ्याने घरी थांबायच नाही, सर्वांनी इथे यायचं. अंतरवली-सराटीत तुफान ताकदीने मराठ्यांनी एकत्र यायचं. जगात मराठ्यांच्या एकजुटीला तोड नव्हती” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली आहे. 25 जानेवारी 2025 पासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्यांना स्वेच्छेने उपोषणाला बसायच आहे, ते बसू शकतात. पण कोणावरही जबरदस्ती नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

सर्व ताकद इथेच दाखवायची

“महत्त्वाच म्हणजे यावेळी आमरण उपोषण फक्त अंतरवली सराटीतच होईल. कुठल्याही अन्य गावात साखळी उपोषण होणार नाही, मराठ्यांनी त्यांची सर्व ताकद अतरवली सराटीतच दाखवून द्यायची आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात स्थगित केलेलं उपोषण आंदोलन पुन्हा सुरु करतोय. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, त्याला एक वर्ष पूर्ण होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

एकजूट कायम आहे

“मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मागच्या 15-16 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. मराठ्यांची एकजूट कायम आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार आहे. भविष्यातही अनेक प्रश्न असल्याने मराठ्यांची एकजूट कायम राहील. मराठा समाज इतक्या ताकदीने एकजुटीने लढला, तरी अजून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही, म्हणून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पुन्हा एकदा आपल्या सात ते आठ मागण्यांचा पुनरुच्चार केला.