संजय सरोदे, बीड, दि. 21 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात समंत झाले. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली. कुणबी आणि मराठा एकच आहे, असा अध्यादेश काढा, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे गावे घ्या, अशा मागण्या त्यांनी पुन्हा केल्या. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करावी. अन्यथा २४ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. हे आंदोलन रोज असणार आहे.
आपण आपली गावे सांभाळयाची आहे. कोणी तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. गावागावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे. आता बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत. त्यांची काळजी घ्यायची आहे. आंदोलन २४ फेब्रवारीपासून रोज सकाळी १०.३० वाजता सुरु करा. दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन सुरु ठेवा. ज्याला ही वेळ जमणार नाही, त्यांनी दुपारी ४ ते सात वाजता आंदोलन करायचे आहे. मराठ्यांचे हे आंदोलन शेवटचे असणार आहे. संपूर्ण देश हे आंदोलन बघणार आहे. आंदोलना दरम्यान शांतता ठेवायची आहे. कोणाची गाडी फोडायची नाही, काही जाळपोळ करायची नाही. आंदोलन संपल्यावर आपल्या शेतावर जाऊन काम सुरु करायचे आहे. रोज रास्ता रोको करुन सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, यासाठी निवेदन द्यायचे आहे. अधिकारी आल्याशिवाय निवेदन इतर कोणाला देऊ नका. सोशल मीडियावर अधिकाऱ्यांना निवेदन देतानाचे फोटो टाका.
हे ही वाचा
ओबीसीतून आरक्षणासाठी मराठ्यांचा आता शेवटचा लढा, मनोज जरांगे आक्रमक