मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, नवव्या दिवशी सोडलं उपोषण

| Updated on: Sep 25, 2024 | 5:22 PM

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाले आहे. नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोणीही अंतरावाली सराटी येथे येऊ नये असं आवाहन ही त्यांनी केले आहे. त्रास देणाऱ्यांना सरळ करणार. आरक्षण न दिल्यास सत्तेत बसून आरक्षण घेऊ. सलाईन घेऊन उपोषण करु शकत नाही. मागण्या मान्य झाल्या नाही तर दोष मला देऊ नका.स्वतच्या हाताने […]

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, नवव्या दिवशी सोडलं उपोषण
Follow us on

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाले आहे. नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोणीही अंतरावाली सराटी येथे येऊ नये असं आवाहन ही त्यांनी केले आहे. त्रास देणाऱ्यांना सरळ करणार. आरक्षण न दिल्यास सत्तेत बसून आरक्षण घेऊ. सलाईन घेऊन उपोषण करु शकत नाही. मागण्या मान्य झाल्या नाही तर दोष मला देऊ नका.स्वतच्या हाताने सरकार पाडून घेऊ नका. असे ही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलं आहे.

आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी काही दिवसांची मुदत दिली आहे. आचारसंहिता लागेपर्यंत राजकीय भाषा बोलणार नाही. पण त्यानंतर कोणी काय म्हटलं तर मी त्याला सोडणार नाही. फडणवीस साहेब तुमच्या हाताने सत्ता पाडू नका. मी काहीच येऊ देणार नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

श्रीमंत मराठे आपली पोर मोठी होऊ देणार नाहीत. शेतकरी मराठा चिखलात उन्हात काम करतो आणि आपलं लेकरु कधी नोकरीला लागेल याची वाट बघतो. प्रत्येक पक्षातील मराठा वाट बघतोय असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. आचासंहिता लागेपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर खचून जाऊ नका. सरकारने आपल्याला धोका दिला तर तुम्ही आपल्या लोकांना धोका देऊ नका. राजकारणाच्या नादाला लागू नका. अडाणी असला तरी चालेल पण आपला माणूस सभागृहात पाहिजे. आरक्षण देत नसाल तर सत्तेत जाऊ. मला बदनाम केलं जाईल. मला 4-5 दिवस तरी आरामाची गरज आहे. मला हॉस्पिटलला भेटायला येऊ नका, पुन्हा नंतर अंतरवलीमध्ये भेटू असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.