मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दरम्यान क्रांती चौक परिसरात दाखल झाली. याच क्रांती चौक परिसरात मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या संखेने जमलेल्या मराठा बाधवांसोबत संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रॅलीचा समारोप झाला. मनोज जरांगे पाटील यांची पुढची दिशा काय असणार याकडे सर्व मराठा बांधवांचं लक्ष लागलं होतं.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, ‘मी थांबून निर्णय घेत असतो. मी सर्व दिमागाने खेळत असतो. प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायचा नाही. बुद्धीचाही वापर करायचा असतो. फडणवीस, शिंदे, अजितदादा आणि महाजन यांनाही डावात हरवलं. सोपी गोष्ट नाही. भुजबळ आता काहीही बडबडताय. प्रत्येक वेळी सरकार फसलं. त्यांनी आपल्याला फसवण्याचं काम केलं. त्यांना मी जे वाटलो होतो, तसा मी नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे मला वेळ देत जा. एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून पाय पडला तर निघणार नाही. समाज फसला तर मी स्वतला आयुष्यभर माफ करणार नाही. मला तुमच्या जीवावर काहीच कमवायचं नाही. मला तुमची पोरं मोठी झालेली पाहायचे आहे.’
‘मी येडा आहे. पण आरक्षण दिलं ना मिळवून. भुजबळ पायावर चालत असेल मी डोक्यावर चालतो. पण माझ्यामुळे तुला औषधे सुरू केली ना
फडणवीस साहेब शिंदे साहेब आरक्षण द्या. ही गर्दी फक्त संभाजीनगराची आहे. राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल. सरकारला एकच संधी. २० तारखेला तारीखच जाहीर करणार आहे. २८८ उभे करायचे की पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. त्या दिवशी मराठ्यांनी अमूक अमूक मैदानावर यावं. २० तारखेला आमरण उपोषण सुरू करणार. पण उमेदवार पाडायची आणि मुंबईला कोणत्या तारखेला जायचं या दोन तारखा ठरवायच्या आहेत. एकदा जे ठरलं त्यात बदल नाही.’