सोलापूर, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची चर्चा राज्यभरात सुरु होती. या आंदोलनामुळे राज्यभरातील सर्वच समाजात आंदोलनाची चर्चा होती. मराठा समाजातील लहान मुलांमध्ये आंदोलनाचे वारे चांगलेच भिनले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका चिमुकल्याने आरक्षणासंदर्भात जबरदस्त भाषण केले आहे. त्याच्या भाषणाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आवेशपूर्ण केलेल्या त्याचा भाषणाचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोलापूरच्या माढ्यातील कुर्डू गावतील शंभूराज बाळू मु॔गसे या शाळकरी विद्यार्थ्याचे भाषण चांगलेच व्हायरल झाले आहे. मराठा आरक्षणावर त्यांने जबरदस्त भाषण केले आहे. शंभूराज याने मनोज जरांगे-पाटलांसह मराठा आरक्षणावर आपले विचार मांडले आहे. शंभूराज मुगसे याचे शाळेत भाषण सुरु असताना उपस्थित विद्यार्थ्यामध्ये चैतन्य पसरले. विद्यार्थ्यांनीही एक मराठा लाख मराठ्यांचा जयघोष केला. या चिमुकल्या मुलाचे भाषण ऐकून इंटरनेटवर त्याचे कौतूक केले जात आहे.
शंभीराज याने जोरदार आवेशात भाषण केले आहे. त्याने आपल्या भाषणात म्हटले की, मराठा समाज स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. आम्ही काय पाप केले आम्हाला आरक्षण मिळत नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे. आम्ही मराठा समाजात जन्म घेतला म्हणून काय पाप केले का? आम्हाला मराठा समाजाचा अभिमान आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र आहे. कोणी कुत्र्याला दगड मारला तर तो बेशुद्ध होतो. परंतु मधमाशीच्या पोळ्याला दगड मारला तर काय होते. ते सर्वांना माहीत आहे. यामुळे मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न करु नका. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण द्या.
शनिवारी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले भावा आरक्षण मिळाले. आणखी एक जण म्हणाला, हा तर वाघ आहे.
हे ही वाचा…
मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला