मंत्रालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस, बाथरुममध्ये धुतल्या कपबश्या

| Updated on: Jul 22, 2024 | 9:29 PM

तुम्ही मंत्रालयात जात असाल आणि तिथे चहा पित असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण मंत्रालयात मुख्य इमारतीच्या बाथरुममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओदेखील आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मंत्रालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस, बाथरुममध्ये धुतल्या कपबश्या
मंत्रालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस, बाथरुममध्ये धुतल्या कपबश्या
Follow us on

मंत्रालयातून संपूर्ण राज्याचा गाडा हाकला जातो. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, निराधार अशा सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. राज्यातील सर्वसामान्य जनतेचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. तसेच राज्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून मंत्रालयात बसूनच मंत्री मोठमोठे निर्णय घेतात. आरोग्य खात्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला जातो. सर्वसामान्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी काळजी घेण्याचे प्रयत्न केला जातो. पण याच मंत्रालयाशी संबंधित एक शोकांतिका समोर आली. राज्यभरातील जनतेचा आरोग्याचा विचार करणाऱ्या मंत्रालयातच आरोग्याशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय?

मंत्रालयातील धक्कादायक प्रकास उघडकीस आला आहे. मंत्रालयात सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बाथरूममध्ये मंत्रालयीन शिपाई याने बाथरूममध्येच चहा पिलेली कपबशी धुतली. विशेष म्हणजे हा प्रकार वर्षानुवर्ष होत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारानंतर संबंधित खात्याचे अधिकारी आणि सामान्य प्रशासन विभाग काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

संबंधित व्हिडीओत एक मंत्रालयाचा कर्मचारी हा बाथरुममध्ये कपबशी धुताना दिसत आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने तो व्हिडीओ संबंधित कर्मचाऱ्याच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने बनवला आहे. या व्हिडीओत मंत्रालयीन कर्मचारी हा कपबशी धुताना स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे एवढं मोठं मंत्रालय असताना मंत्रालयीन कर्मचाऱ्यावर थेट बाथरुममध्ये कपबशी धुण्याची वेळ का यावी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.