देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार, त्यांना पश्चाताप होणार…मनोज जरांगे यांचा पुन्हा फडणवीसांवर थेट हल्ला

| Updated on: Aug 16, 2024 | 7:32 AM

मी राजकीय भाषा बोलत आहे. कारण तुम्ही आरक्षण देत नाही. तुम्ही आरक्षण द्या, मी राजकीय भाषा बंद करतो. परंतु तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मग माझ्यापुढे पर्याय नाही. माझ्या समाजाचे मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकरा बाळांचे वाटोळे करणार असाल आता तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार, त्यांना पश्चाताप होणार...मनोज जरांगे यांचा पुन्हा फडणवीसांवर थेट हल्ला
मनोज जरांगे, देवेंद्र फडणवीस
Follow us on

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षणाचा विषय रखडल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार, त्यांना पश्चाताप करावा लागणार? असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे की गोरगरिबाला न्याय द्यायचा नाही, मग आता गोरगरिबांनी ठरवले आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. आता संघर्ष करायचा पण आता खुर्ची त्यांना द्यायची नाही. हीच भूमिका शेतकऱ्यांची आहे. सगळ्या जाती-धर्माच्या बांधवांची आहे. दलित मुस्लिमांची आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

काय म्हणाले मनोज जरांगे

तुम्हाला येत्या 20 तारखेपर्यंत खूप परिस्थिती बदललेले दिसेल. देवेंद्र फडणवीस यांनी काही गणित बांधली आहेत. ती फेल होणार आहेत. त्यांना पश्चाताप होणार आहे. मला हलक्यात घेऊ नका. फडणवीस साहेब तुम्हाला समजून घ्यायचे नसेल तर माझाही नाईलाज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले तर मराठे त्यांना डोक्यावर नाचतील. तुम्ही आरक्षण दिले नाही तर आम्ही तुमचे राजकीय गणित बिघडवणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी मला हसण्यावर घेऊ नये. नाहीतर त्यांचा बोऱ्या वाजेल, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

मला राजकारणात आणू नका…

मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका. मी राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल. मला व समाजाला राजकारणात जायचे नाही. मला त्यामध्ये ढकलू नका. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळे चुकणार आहेत. माझी राजकारणात यायची इच्छा नाही. मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही.
मी शेतकऱ्यांपासून 12 बलुतेदारांपर्यंतचे प्रश्न मांडत आहे. आता गोरगरीब मराठा शेतकऱ्यांचे राज्य आणल्याशिवाय मागे सरकणार नाही.

हे सुद्धा वाचा

…तर माझ्यापुढे पर्याय नाही

मी राजकीय भाषा बोलत आहे. कारण तुम्ही आरक्षण देत नाही. तुम्ही आरक्षण द्या, मी राजकीय भाषा बंद करतो. परंतु तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मग माझ्यापुढे पर्याय नाही. माझ्या समाजाचे मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकरा बाळांचे वाटोळे करणार असाल आता तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही.

तुम्हाला माझी भाषा कळत नाही. तुम्हाला आरक्षणावर मार्ग काढायचा नाही. सगे सोयरे बाबत अंमलबजावणी करता येत नाही. छगन भुजबळ यांनी काहीच कळत नाही. मराठा समाजाला दोनशे वर्षांपासून ओबीसी आरक्षण आहे. छगन भुजबळ आता ओबीसी आरक्षणामध्ये गेलेला आहे. छगन भुजबळ मला शिकवतो आणि म्हणतो मला खूप अनुभव आहे. कशाचा अनुभव आहे, असा हल्ला भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे यांनी केला.