छत्रपती संभाजी नगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे नेते आणि मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या या जागेवर मराठा आंदोलनाचे नेते विनोद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. त्यांनी त्यासाठी दोन, तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यावर बोलताना कोणामुळे उमेदवारी मिळाली नाही, हे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची संभाजीनगर लोकसभेसाठी मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. परंतु महायुतीमधील दोन आमदार आणि एका राज्यसभा सदस्याने माझ्या उमेदवारीला विरोध केल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला. संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णयाचा पुनर्विचार होईल, अशी आपणास अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचं गणित आहे. ती चर्चा करण्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलो. कोणतेही आश्वासन मिळावं यासाठी भेट नव्हती तर मतदार संघाची काय स्थिती आहे, यासाठी पुन्हा एकदा ती तपासली गेली पाहिजे यासाठी ही भेट होती. मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकतीने ही निवडणूक लढणार आहे, असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांची इच्छा होती. विनोद पाटील यांना तिकीट मिळावे मात्र महायुतीतील दोन आमदार आणि एक सन्माननीय राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे मला उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवारी जाहीर झाली आहे जनतेचा काय मत आहे ते जाणून घेतलं पाहिजे माझा पुनर्विचार झाला पाहिजे यासाठी मी भेटायला आलो आहे. मला इलेक्ट्रिव्ह वोट मिळेल, असे विनोद पाटील यांनी सांगितले.
मराठा समाज म्हणून मला निवडणूक लढवायची नाही. अठरापगड जातींना सोबत घेऊन मी निवडणूक लढणार आहे. एक युवक म्हणून माझ्याकडे विकासाचा व्हिजन आहे. त्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे. या निवडणुकीत प्रमुख तीन उमेदवार रिंगणात आहे. त्यांनी आजपर्यंत काय केले, छत्रपती संभाजी नगरच्या तरुणांमध्ये नैराश्याच वातावरण आहे. यामुळे अजूनही वेळ गेली नाही. महायुतीकडून उमेदवारीचा पुनर्विचार होरू शकतो, असे विनोद पाटील यांनी सांगितले.
संदीपान भुमरे हे माझ्या आजोबाच्या वयाच्या आहे. त्यांच्याबद्दल मला सन्मान आहे. मला त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही. पण मला जिल्ह्याचे युवकांचे प्रश्न पडण्यासाठी दिल्लीला जायचं आहे. माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याच्या तरुणांशी आहे. त्यासाठी मी लढतो आहे 100% मी निवडणूक लढणार आहे.