Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा मोठा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला

| Updated on: Jan 27, 2024 | 11:55 AM

Maratha Reservation : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यानंतर आता वाशीमध्ये विजयी सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा मोठा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अभिजित पोते, नवी मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित विजयी सभा होणार आहे.

सर्व मागण्या मान्य, अध्यादेश मिळाला

मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

गुन्हे मागे घेतले जाणार

राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्याशी विरोध संपला

समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत. मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले मराठा आंदोलन आता संपल्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा…

मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला