Manoj jarange patil | OBC पेक्षा EWS मध्ये मराठा समाजाला जास्त आरक्षण मिळेल, या प्रश्नावर मनोज जरांगेंच उत्तर काय?

| Updated on: Nov 10, 2023 | 11:04 AM

Manoj jarange patil | EWS मध्ये मराठा समाजाला 8.30 टक्के आरक्षण मिळू शकतं. तेच OBC मध्ये फक्त 3.50 टक्के आरक्षण मिळेल. देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्याकडे लक्ष वेधलं. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलय. स्वाक्षरीची रिस्क घ्यायला कोणी तयार नाही, त्यावर एकमत होत नाहीय हा सुद्ध मुद्दा आहे.

Manoj jarange patil | OBC पेक्षा EWS मध्ये मराठा समाजाला जास्त आरक्षण मिळेल, या प्रश्नावर मनोज जरांगेंच उत्तर काय?
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : “मुख्यमंत्र्यांनी कुणबी नोंदी तपासण्याच्या कामात लक्ष द्यावं. हे काम वेगात व्हावं. सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्याव यावर ठाम आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आम्हाला गाजर दाखवू नका. मुख्यमंत्र्यांनी, लिखित ठरलय तसा टाईमबाँड द्यावा. आम्हाला 24 डिसेंबरच्या आत आरक्षण हवं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. EWS मध्ये मराठा समाजाला 8.30 टक्के आरक्षण मिळू शकतं. तेच OBC मध्ये फक्त 3.50 टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलय. यावर मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला,
त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं.

“ओबीसीत लाभ कमी होणार असं नाहीय. आमच पूर्वीपासून, आमच गिळलेलं आह, ते बाहेर काढायचय. मराठा समाज ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या मुलांच आयुष्य उद्धवस्त झालय. काही कमी होणार नाही. आरक्षण कमी मिळणार नाही. ओबीसीत नोंदी सापडतील, त्याप्रमाणे मराठा समाजाला सरकट आरक्षण द्यावं ही मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

‘आम्हाला ओबीसीमध्ये आणि तुम्ही 75 टक्के….’

75 टक्के आरक्षण मर्यादा करा, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत, त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आम्हाला OBC मध्ये घ्या आणि तुम्ही 75 च 90 टक्के आरक्षण करा. काही अडचण नाहीय. आम्हाला गाजर दाखवू नका. आमच्या हक्काच आहे ते मिळालं पाहिजे” “आम्हाला अपेक्षित असलेलं काम आता सुरु आहे. आधी नोंदी असूनही नाही म्हटलं जात होतं. मुख्यमंत्र्यांकडे एकच विनंती आहे, मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी मनुष्यबळ वाढवाव, तरच 24 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होऊ शकतं. मराठवाड्यात आकडे वाढत नाहीयत, कारण मनुष्यबळ कमी आहे. अभ्यासक कमी आहेत, त्यामुळे मनुष्यबळ वाढवण्याची आमची मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘फराळ खा आणि कचाकचा सह्या करा’

सरकारी शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येत नाहीय, त्यावर तुम्ही सॉफ्ट भूमिका घेताय का? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “असं काही नाहीय. त्यांचा मला फोन आलेला. मुख्यमंत्री गडबडीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट झालेली नाही. दोन-चार मंत्री यायला तयार आहेत. आम्ही समजून घेतोय” स्वाक्षरीची रिस्क घ्यायला कोणी तयार नाही, त्यावर एकमत होत नाहीय. त्यामुळे शिष्टमंडळ अजून भेटीला आलेलं नाहीय या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले की, “मग त्यांना जड जाईल. फराळ खा आणि कचाकचा सह्या करा. आमच्या नादी लागू नका. सह्यांसाठी ते येत नसतील, तर त्यांनी सह्या लवकर कराव्या. दोन दिवस बोललो. पण अजून वेळ दिला. तुम्ही आडमुठी भूमिका घेत असाल, तर मग समजेलच”