गिरीश गायकवाड, मुंबई दि. 21 फेब्रुवारी 2024 | अध्यादेश, अधिनियम यामधील फरका मनोज जरांगे पाटील यांना माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून खालच्या भाषेत त्यांना बोलताना मी स्वत: पाहिले आहे. त्यांनी मराठा समाजातील अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या आहेत. जरांगे यांना अक्कल नाही. लोकांची ते फसवणूक करत आहेत. ते हेकेखोर आहेत, कोणत्याही शब्दावर अडून राहातो. सर्व प्रक्रियेत मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हे मनोज जरांगे याला माहिती नाही, असा हल्ला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात असलेले अजय महाराज बरासकर यांनी केला.
अजय महाराज बरासकर यांनी सांगितले की, मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशांसाठी काम करत नाही. मी कीर्तन करतो. त्याचे पैसे घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात खडखद होती. ती मी व्यक्त केली आहे. त्यानंतर मला अनेक फोन येत आहेत. गोळ्या घालून मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. परंतु माझे काम सत्य सांगणे आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही
१० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी समाजाची बैठक घेतली नाही? त्यावेळी लोकांनी विरोध केला. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. परंतु एक फोन आल्यानंतर जरांगे यांनी भूमिका बदलली. समाज अंतरवालीत गेला नाही. लोक आले नाहीत, त्यामुळे जरांगे संतापले होते. लोक जमा करता येत नाही, मी उपोषण कसे करु, असे जरांगे बोलल्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे.
अजय महाराज बरासकर म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे.
मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली. त्यानंतर मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही.
डॉक्टर संतोष यादव यांनी मराठवाड्यातील कुणबी नोंदी जमा केल्या. त्याला जरांगे पाटील म्हणतात, “तुम्ही सरकारच्या भाकरी खातात.” त्यांना खूप काहीतरी बोलला आहे. हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहेत. जरांगे यांच्यासंदर्भात अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, असे अजय महाराज यांनी सांगितले.
पहिली गुप्त मिटींग बीडला कन्हैया हॉटेलमध्ये झाली. त्याची माहिती उपलब्ध आहे. दुसरी गुप्त मिटींग रांजणगावला पहाटे चार वाजता झाली. तिसरी गुप्त मिटींग पुण्यातील औंध परिसरात झाली. त्यानंतर लोणावळ्याला झाली. पाचवी मिटींग वाशीला झाली आहे.
हे ही वाचा
मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको, २४ पासून असे असणार आंदोलन