Manoj jarange patil | “खुल्या वर्गातील जैन, वैश्य आणि ब्राह्मणांच्या अधिकारातल्या जागा शाबूत ठेवणं. त्यांच्यावर कुठलीही गदा येऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे. जे खरे मागास आहेत, लोहार भाऊ, तळपत्या उन्हाता काम करणारा वडार भाऊ, सुतार भाऊ असेल, जे वेगवेगळे जात समूह कष्टाच्या आधारावर सामाजिक मागास आहेत, त्यांच्या जागा, त्यांची गुणवत्ता विशिष्ट स्तरावर आणण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच जे संविधान आहे, त्यानुसार या घटकाच्या अधिकाराच्या रक्षणाची माझी जबाबदारी आहे” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
“माझ्या मराठा भावांना EWS च्या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी उभारलेलं हे आंदोलन होतं, असं मी समजतो. ते नोटीफिकेशन म्हणजे नोटीस आहे. उच्च न्यायालयात मागास आयोगापासून काय-काय चालू आहे, ते सांगण्यासाठी. त्या अधिकाराच्या रक्षणासाठी न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
‘त्या चाटूंना बोलण्याचा अधिकार नाही’
ते नोटीफिकेशन नाही, नोटीस आहे तुम्ही म्हणताय, मराठ्यांच्या तोंडाला पान पुसली असं तुम्हाला म्हणायच आहे का? या प्रश्नावर सदावर्ते यांनी अचानक रोहित पवार आणि संजय राऊत यांच नाव घेतलं व बोलताना त्यांची जीभ घसरली. “तो रोहित पवार आणि संजय राऊत यांनी स्वत:ची जागा तपासावी. माझ्यावर टीका करणाऱ्या त्या चाटूंना बोलण्याचा अधिकार नाही” असं म्हणाले.
‘टेन्शन घेऊ नका’
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करतायत असा आरोप त्यांनी केला. “मी स्वत: उपोषण केलय, किती विक झालोय हे सांगायची गरज नाही. खजूर, दूध हे लक्षात घेता वेगवेगळे स्टंट असतात, पॉलिटिकल स्टंट” अशी टीका त्यांनी केली. “ओबीसी, खुल्यावर्गातील तुमच्या अधिकाराच रक्षक म्हणून मी आहे, टेन्शन घेऊ नका” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.