ते मराठे नाहीच, फक्त यांनाच मराठा मोजतो… मनोज जरांगे यांचा पुन्हा घाणाघाती हल्ला

| Updated on: Jul 26, 2024 | 2:02 PM

manoj jarange patil: हैदराबादमध्ये देखील आठ हजार पुरावे सापडले आहे. राजकारण्यांनी एकदा तरी जातीच्या आणि लेकराच्या बाजूने न्यायासाठी उभे रहा. ही संधी गोरगरीब छोट्या छोट्या जातींना न्याय देण्याची आली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.

ते मराठे नाहीच, फक्त यांनाच मराठा मोजतो... मनोज जरांगे यांचा पुन्हा घाणाघाती हल्ला
manoj jarange patil
Follow us on

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आपल्या गावात परतले. गावात सुरू असलेल्या यात्रेला भेट दिली. गावातील ग्राम दैवत सय्यद बाबा पिराचे दर्शन घेतले. शुक्रवारी मनोज जरांगे यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकारणावर भाष्य केले. भारतीय जनता पक्षाचे नेते आशीष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली. शेलार यांनी प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्न करु नये. मराठ्यांना चॅलेंज करू नये. मी जर बिघडलो तर तुम्हाला तोंड बाहेर काढता येणार नाही, असा हल्ला चढवला. राजकीय भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील बोलायला लागल तेव्हा आम्ही सडेतोड उत्तर देऊ, असे आशिष शेलार म्हणाले होते. त्यावर जरांगे यांनी उत्तर दिले आहे.

ते मराठे नाहीच..फक्त मैदानावर असलेलेच मराठे

मागच्या दारातून गेलेल्यांना आम्ही मराठे समजत नाही. मैदानात असणाऱ्यांना मराठे म्हणून मोजतो, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. ते म्हणाले की, राजकारणाचे गणित वेळेवर केले जाते. राजकारणात काही गणित सांगयला नको. तो नियम मी पाळतो. बच्चू कडू म्हणतात ते खरे आहे. ते शेतकऱ्यांची भूमिका मांडणारे आहेत. हे आशिष शेलार यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. मराठ्यांना चॅलेंज करू नये. मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागले, असे समजू नका. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठापुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करीअर मराठा संपवून टाकेल.

ओबीसी रॅली भुजबळांच्या हट्टामुळे

ओबीसी यात्रेवर मनोज जरांगे पाटील यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला रॅली काढण्याचा अधिकार आहे. परंतु विनाकारण एखादा जातीच्या विरोधात रोष निर्माण करायचा टार्गेट निर्माण करायचा यासाठी रॅली नको. ही रॅली छगन भुजबळ यांच्या हट्टापायी आहे.

हे सुद्धा वाचा

मराठ्यांकडे खूप पुरावे

खूप काही असे पुरावे आहेत जे आता मराठ्यांसंदर्भात सापडले आहे. हैदराबादमध्ये देखील आठ हजार पुरावे सापडले आहे. राजकारण्यांनी एकदा तरी जातीच्या आणि लेकराच्या बाजूने न्यायासाठी उभे रहा. ही संधी गोरगरीब छोट्या छोट्या जातींना न्याय देण्याची आली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठे समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही? याबाबत त्यांनी बोलावे. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसेल तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावला.

29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र

29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडणूक लढवायची की नाही. मला राजकारणात जायचे नाही, पण आता पर्याय नाही. आपला समाज यांना मोठा करायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहे.