मुंबई | 17 डिसेंबर 2023 : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरु आहे. शनिवार आणि रविवारी सुटीमुळे कामकाज होणार नाही. मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटी येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. छगन भुजबळ यांच्या भिवंडी एल्गार सभेआधी कल्याण डोंबिवलीत ओबीसी समाजाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकप्रकरणी पुढील सुनावणी सहा जानेवारी रोजी ठेवली आहे. राज्यभरात १६३ ठिकाणी समूह शाळा उभारण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे सादर केले आहेत. मुंबई शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान रविवारी राबवण्यात येणार आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
नागपूर | नागपुरातील उपकरण निर्मिती कारखाना स्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले.या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करून वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली.तसेच मुख्यमंत्र्यांनी जखमींवर उपचार करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या.
मुंबई | सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.तसेच राजावाडी रुग्णालय मुंबईकरांठी महत्त्वाचे आहे. या रुग्णालयाची क्षमता 1 हजार बेडपर्यंत वाढवण्याचा मानस असून अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल, अंसही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई | राज्यतील सर्व ग्रामपंचायती उद्या 18 डिसेंबरपासून 3 दिवस बंद असणार आहे. ग्रामपंचायत सरपंच , कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांच्या विविध मागण्यांसाठी सरपंचांसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी राज्यभरात कर्मचार्यांकडून काम बंद आंदोनल करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय होणार आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात अखिल भारतीय सरपंच परिषदेसह राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सर्व संघटना सहभागी होणार आहेत. तसेच 3 दिवसांच्या कामबंद आंदोलनानंतरही मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
धुळे | जिल्हा परिषदेच्या चिमठाणे-मेथी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. दुपारी साडे तीनपर्यंत मेथी गटात 40 टक्के मतदान झालं आहे. चिमठाणे गटात 44 टक्के मतदान झालं आहे. मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून मतदारांचा समिश्र प्रतिसाद आहे.
मराठ्यांच्या कुणबी 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. एका नोंदी असलेल्या आरक्षणाला चॅलेंज होत नाही. कायदा झाला तरी शिंदे समितीने काम सुरु ठेवावे, समितीला मुदत वाढ द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
नागपूर कारखान्यात स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत झालेल्यांच्या कुटुबियाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत वारसांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.
नागपूर येथील सोलर कंपनीच्या गेट समोर मॅनेजमेंट विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातंय. अनिल देशमुख बोलत सगळी परिस्थिती सांगत असताना नागरिकांनी कंपनी मॅनेजमेंट विरोधात घोषणा दिल्या.
जालना अंतरवली सराटी मधील दगडफेकीच्या घटनेतील व जाळपोळीच्या घटनेतील आरोपींना गेल्या दोन दिवसांपासून साधारण 12 ते 15 जणांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांच्या संदर्भाने तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात येत आहेत.
आंतरवाली सराटी प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. अंबड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे नोटीसच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
बैठकीच्या मंचावरील बैठकीचा बॅनर काढण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आणि जरांगे पाटील यांची सारखी उंची असलेला बॅनर काढण्यात आला. जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार काढण्यात आला बॅनर
जळगावातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता होणार नागपूर येथून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील नऊ रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा.
मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला होत आहे सुरुवात. बैठकीत राज्यातील सर्वच जिल्ह्यातून मराठा समाजातील समन्वयक, आमरण आणि साखळी उपोषणकर्ते, वकील, डॉक्टर, प्राध्यापक मराठा समाजातील तज्ञ उपस्थित.
नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये नऊ वाजताच्या सुमारात झालेल्या स्फोटावर मृतकांचा आकडा 9 वर पोहचला आहे. यामध्ये सहा महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाचे हदगाव मतदारसंघाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यानिमित्ताने भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद साधणार आहेत.
शेतकऱ्याला जगवणं आपलं कर्तव्य असल्याचं वक्तव्य आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये नऊ वाजताच्या सुमारात झालेल्या स्फोट मध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे. या ठिकाणी झालेल्या स्पोर्ट मध्ये आत मध्ये दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती समजत आहे. संरक्षण क्षेत्राशी निगडे तेही काही कंपन्यांना दारूगोळा सप्लाय करते.
मंगळवारी नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. बैठकीला नीतिश कुमार,ममता बॅनर्जी,अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या नाराजीवर होणारं बैठकीत चर्चा होणार असल्याचे कळते. उद्धव ठाकरे ,शरद पवार हे पण उपस्थित असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. संभाव्य जागावाटपावर, ५ राज्याच्या निवडणूक निकालावर बैठकीत चर्चा होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून जळगावच्या चाळीसगावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन केले. शासन निर्णयाप्रमाणे दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. जिल्हा सहकारी दूध संघाने शासनाच्या दरानुसार दुधाला 34 रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मराठा आरक्षणावर सोमवारी सभागृहात सरकार उत्तर दाखल करणार नाही. उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार भूमिका मांडणार आहे. मराठा आरक्षणावर उद्या सभागृहात चर्चा होईल. तर त्यावर मंगळवारी सरकार उत्तर दाखल करण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी यासाठी सरकारमधील दोन मंत्री त्यांच्याशी फोनवरुन संवाद साधणार आहेत.
स्टार्टअप्सने भारतीय अर्थव्यवस्थेला आणि तरुणाईला एक आत्मविश्वास दिला. स्टार्टअप्समध्ये भारताने जगातील अनेक देशांना मात दिली. युरोपातील अनेक देश तर कधीचेच पिछाडीवर गेले. भारताने स्टार्टअप्समध्ये तिसरे स्थान पटकावले. नितीन आणि निखील कामत या स्टार्टअपमध्ये सर्वाधिक कमाईचा मान नितीन आणि निखील कामत यांच्या शिरपेचात खोवला गेला. झिरोधा हे ब्रोकिंग एप तुम्ही वापरत असालच. त्याचे हे दोन्ही बंधू संस्थापक आहेत. त्यांची वार्षिक कमाई जवळपास 200 कोटींच्या घरात आहे
मराठा समाजाची जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बैठक होत आहे. या बैठकीसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ही बैठक सुरु होत आहे.
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे. सुधाकर बडगुजर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात ११ वाजता पुन्हा हजर होणार आहेत. शुक्रवारी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चौकशी केली होती.आज गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे चौकशी करणार आहेत.
सोने-चांदीच्या किंमतीला पुन्हा लगाम लागला. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीने ग्राहकांना बळ दिले. भाव उतरल्याने ग्राहकांनी जमके खरेदी केली. सलग तीन दिवस ग्राहकांची जणू दिवाळी होती. हा ट्रेंड असाच सुरु राहिल असे वाटत असताना 14 डिसेंबर रोजी गुरुवारी भावात वाढ झाली. शुक्रवारी पुन्हा दरवाढ झाली. शनिवारी मात्र मौल्यवान धातूने ग्राहकांना दिलासा दिला.
अमरावती राखीव मतदार संघाचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती येथे शिवमहापुराण कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये तथागत गौतम बुद्धांचा फोटो लावल्याने समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सचिन खरात यांनी केली.
देशात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या भाजपचा त्यांनी समाचार घेतला. राज्य सरकार भांडवलदार, उद्योगपतींची दलाली करत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटीमध्ये मराठा संघटनांची 11 वाजता बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाविषयीची भूमिका ठरेल. 24 डिसेंबरनंतर राज्य सरकारला थोडाही वेळ देणार नसल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला.
24 तारखेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील बैठक बोलावली आहे. 12 वाजेनंतर किंवा 3 वाजेपर्यंत बैठक सुरु होईल अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ‘आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण नाही दिलं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढील भूमिका काय असेल.. यावर चर्चा होणार आहे.’ असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
अंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील हे राज्यातील मराठा समाजातील साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते, स्वयंसेवक यांच्या सोबत 24 तारखेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बैठकीला येणाऱ्यांची नोंद घेतली जात आहे.
ठाण्यातील भिवंडीमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्याला कपिल पाटील, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेला सुरुवात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जागावाटपात मिळणाऱ्या संभाव्य जागेवर सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छचा मोहिमेत सहभागी झाले आहेत. ‘मुंबईतील फुटपाथ, रस्ते स्वच्छ करण्याचं काम सुरु आहे. 2 हजार लोक एकत्र येऊन काम करत आहेत. मोहिमेत शाळकरी मुलांसह, तरुणांचाही समावेश आहे…’ असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
धुळे नंदुरबार रस्त्यावर वावद गावाजवळ चार वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही. ट्रक, ट्रॅव्हल्स, एसटी बस आणि ॲपे रिक्षाचा अपघात झाला आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहतुक कोंडी देखील झाली आहे.
रत्नागिरीचा परशुराम घाट जलद वाहतूकीसाठी सज्ज झालेला आहे. परशुराम घाटातील दुसऱ्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. तब्बल चार वर्षांपासून परशूराम घाटातील ही कामं सुरू आहेत. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे.
देखभाल आणि दूरूस्तीच्या कामासाठी आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे .
ठाण्याच्या भिवंडीत आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला केंद्रिय मंत्री कपिल पाटील, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार आहेत. मंत्री छगण भुजबळसुद्धा या मेळआव्याला उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. दूपारी तीन वाजता या मेळाव्याला सुरूवात होणार आहे. या मेळाव्याला ओबीसी समाजाचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूरत डायमंड बोर्सचं उद्धाटन करणार आहेत. 3 हजार चारशे कोटी खर्च करून 35.54 एकर जमिनीवर बांधकाम करण्यात आलेलं आहे. यामुळे दीड लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. महिनाभरापूर्वी मुंबईचं डायमंड सार्केत हे सूरतला हलवण्यात आलं होतं. त्याचं सूरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते उद्धाटन आहे.
मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे. 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे आज मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. सकाळी जवळपास 11 वाजता या बैठकीला सुरूवात होईल अशी माहिती आहे.
मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या कामाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. पुनर्बांधणीचे काम सुरू झाल्यानंतर पाच वार्डात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नंदूरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात विक्रीसाठी घोडे दाखल. हा घोडेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. देश भरातून येथे घोडे प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी आणले जातात. 21 डिसेंबरपासून अश्व स्पर्धांचा थरार पाहायला मिळणार आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नागपूरमध्ये 19 डिसेंबरपासून 5 दिवस जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सरळ शेतकऱ्यांचा माल ग्राहकांना मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या पुढील तपासाची स्थिती काय आणि तो कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी विचारणा विशेष न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाला (ईओडब्ल्यू) केली. तसेच पुढील सुनावणीच्या वेळी ६ जानेवारी रोजी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. राज्यभरात १६३ ठिकाणी समूह शाळा उभारण्याचे प्राथमिक प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे-पाटलांनी 17 डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. 17 तारखेला मराठा समाजाची अंतरवली सराटी येथे बैठक बोलवण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढे आंदोलन कसं करायचं? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.