पुणे : पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा सुरु करण्याचा इशारा दिलाय. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये पुढचं मूक आंदोलन होणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. इतकंच नाही तर आपण मराठा आरक्षणाची ही लढाई संयमानं लढत आहोत. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाही, असंही संभाजीराजे यांनी म्हटलंय. (MP Sambhaji Raje Chhatrapati angry at the meeting of Maratha Kranti Morcha)
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही सामंज्यस्याची असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. तसंच मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलंय. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आजच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. आपल्याला असंच एकजुटीनं लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, असं आवाहनही संभाजीराजे यांनी केलंय.
पुण्यात आज मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. यात मराठा समाजाकडून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांचा ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयकांकडून विषयवार आढावा घेण्यात आला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती बोलण्यासाठी उभे राहिले असता. एका समन्वयकाने बोलण्यासाठी वेळ मागितला. त्यावेळी या बैठकीत काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप त्या समन्वयकाने केला. त्यावेळी संभाजीराजे यांनी सगळ्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली असल्याचं सांगत त्या समन्वयकाची समजूत काढत वातावरण शांत केल्याचं पाहायला मिळालं.
पुणे येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरू झालेली असून मराठा समाजाने सरकारकडे केलेल्या मागण्यांचा ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयकांकडून विषयवार आढावा घेतला जात आहे…#मराठा_आरक्षण pic.twitter.com/HprI68eEph
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 9, 2021
‘मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको. आम्ही आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला. ही बैठक काल तुळजापूरमध्ये पार पडली. जे आमदार खासदार मराठा समाजाला मदत करीत नाहीत हेटाळणी करतात त्यांना यापुढे विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आलाय.
पुणे येथे आयोजित मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीतील संबोधन…#मराठा_आरक्षणhttps://t.co/F1fkGNe3CN
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 9, 2021
संबंधित बातम्या :
MP Sambhaji Raje Chhatrapati angry at the meeting of Maratha Kranti Morcha