मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात बरच काही घडतय. जालन्यात अतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, तिथेच नव्हे राज्याच्या अन्य भागातही बऱ्याच घडामोडी घडतायत. मराठा आरक्षणासाठी आंदोलक खूप वेगवेगळ्या पद्धतीची अभिनव आंदोलन करत आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात कुठे काय घडतय? अगदी मोजक्या पॉइंटमध्ये समजून घ्या. मराठा आंदोलनात समाजाचे कुठले, कुठले घटक उतरलेत, कशा पद्धतीने आंदोलनाचा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, ते जाणून घ्या.
देगलूर शिवसेना तालुका प्रमुखांनी दिला राजीनामा.आरक्षणाच्या मागणीसाठी कंधारमध्ये कॅडल मार्च.
भोर, मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वकील संघटनेचा पाठिंबा.
भोर, निगुडघर गावात मराठा आरक्षणासाठी, सकल मराठा समाजाकडून मुंडन आंदोलन आणि कॅण्डल मार्च.
पुणे, नांदेड सिटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून काढण्यात आली पदयात्रा.
भोर, राजापुर गावात मराठा आरक्षणाविषयी उपोषण.
भोर, मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला, केमिस्ट असोसिएशन पाठिंबा.
मराठा आंदोलन, खाजगी बसेस जाळपोळ यामुळे प्रवाशी कमी झाल्याने ट्रॅव्हल्सच्या तिकीटाच्या दरात दुप्पटीने वाढ. नागपूर, संभाजीनगरला जाणाऱ्या खाजगी बसेसच्या तिकीटाचे दर 3500 रुपये.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात आजवर 322 साखळी उपोषणे झालीय, 61 ठिकाणी निदर्शने तर मालेगावातील सोयगावात सकल मराठा समाजाकडून कॅन्डल मार्च. शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे महिलांचे साखळी उपोषण सुरू.
पुणे, सिंहगडा जवळील कोंढणपूर गावात, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आला कॅण्डल मार्च.
नांदगाव तालुक्यातील हिसवळ बुद्रुक येथे मराठा समाजाच्यावतीने गावातून कॅडल मार्च.
चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावातील तीन मराठा बांधवांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. तिन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत काहीशी खालावली असून त्यांना सलाईन लावण्यात येत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव मराठा बांधवांनी हातात मेणबत्त्या व मशाली घेऊन गावातून कॅन्डल मार्च काढला.
धाराशिव-जमावबंदी व शस्त्रबंदी कायम. स्थिती पूर्ववत, बससेवा बंद आज जेल भरो आंदोलन, तणावपूर्ण शांतता
मंत्री हसन मुश्रीफ यांची काल आकाशवाणी समोर गाडी फोडल्यानंतर आज पोलीस अलर्ट.
बुलढाणा- नांदुरा तरवाडी नेत्यांना गाव बंदीसाठी मराठा समाज आक्रमक ग्रामीण भागातील तरुणांचा रात्री गावात आगीचे टेंभे घेऊन पहारा.
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.
अहमदनगरला उपोषणाला बसलेल्या चार मराठा तरुणांची तब्येत खलवली. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा.
सिन्नर ला मराठा समाजाची ट्रॅक्टर रैली
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात असलेल्या दावनगाव इथे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते, ते आता प्रशासन आणि गावकऱ्याच्या विनंतीवरून मागे घेण्यात आले.
येवला आगाराची बससेवा पूर्णपणे ठप्प प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचे हाल.
हिंगोली- मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम राहावी म्हणून गिरगाव ग्रामस्थांची पाईदिंडी काढत टोकाई मातेला प्रार्थना.
आज येवला बाजार समितीतील कांदा, धान्य लिलाव बंद, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाचा निर्णय.
रिसोड शहरात महिलांचे साखळी उपोषण.
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तहसिलवर निदर्शने करीत मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.
मराठा आंदोलनामुळे एसटीला 20 कोटींचा फटका. राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक फटका, एसटी महामंडळाला आत्तापर्यंतसुमारे 17 ते 20 कोटींचं नुकसान.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात मराठा आंदोलकांचे आंदोलन. पुण्यातील नरवीर तानाजी चौकात आंदोलन.
सातारा: कातर खटाव येथील सुरू असलेल्या मराठा आंदोलनात ग्रामपंचायतीच्या 9 सदस्य आणि उपसरपंचाने राजीनामा देऊन आंदोलनाला दर्शवला पाठिंबा.
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील महाळुगे येथे सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी आढळून आली आहे. यात एकाची कुणबी तर दुसऱ्याची मराठा नोंद आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.