रायगड : बुधवारी दुपारी किल्ले रायगडावरील (Raigad Fort) शिव समाधीसमोर राखसदृष्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यावरून वाद झाला. मराठा सेवक समिती(Maratha Sevak Samiti)च्या पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोळे (Pooja Zole) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना उघडकीस आणली.
पुस्तक पूजनाच्या नावाखाली प्रकार
सविस्तर वृत्त असं, की काही लोक पुस्तक पूजनाच्या नावाखाली बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या अस्थींचं किल्ले रायगडावर (Raigad Fort) विसर्जन करीत असल्याचा त्याचप्रमाणे ही राख चंदन आणि अत्तरामध्ये भिजवून शिव समाधीला लावत असल्याचा आरोप पूजा झोळे यांनी केलाय.
व्हायरल व्हिडिओनंतर संताप
या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे पुस्तक आणि राखसदृष्य पावडर जप्त केलं असून हे पावडर केमिकल अॅनालिसिससाठी पाठवलं आहे. शिवप्रेमींनी समाधीस्थळावर निर्माण झालेल्या या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल (Video Viral) केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय.